मिड-रेंज सेगमेंटचा नवा किंग? तगड्या फीचर्ससह नव्या Motorola स्मार्टफोनची भारतात एंट्री... परफॉर्मन्सने जिंकणार यूजर्सचं मनं!
नवा स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्याची किंमत 47,999 रुपये आहे. एवढंच नाही तर कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर 3 हजार रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट देखील देणार आहे. तसेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर एक्सचेंज बोनस देखील ऑफर केला जाणार आहे. स्मार्टफोनची पहिली विक्री 11 जून रोजी सुरु होणार आहे. ग्राहक फ्लिपकार्ट आणि मोटोरोला इंडियाच्या ऑनलाईन स्टोअरवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. पॅन्टोन चिकोरी कॉफी, पॅन्टोन स्टॉर्मी सी आणि पॅन्टोन झिनफंडेल या रंगांमध्ये नवा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Motorola )
मोटोरोलाच्या या नव्या डिव्हाईसमध्ये 6.8-इंच 1.5K एक्स्ट्रीम अमोलेड डिस्प्ले मिळणार आहे. हे डिव्हाईस 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 100 टक्के DCI-P3 कलर गॅमेट आणि HDR10+ सपोर्टसह लाँच करण्यात आले आहे. या फोनमध्ये 5,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील दिली आहे. डिव्हाईस वॉटर टच फीचरने सुसज्ज आहे. म्हणजेच तुम्ही ओल्या हातांनी देखील डिव्हाईसचा वापर करू शकता. कंपनीने असा दावा केला आहे की, या डिव्हाईसमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP68 + IP69 रेटिंग दिली आहे.
नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या या मोटोरोला स्मार्टफोनमध्ये 4nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 एक्सट्रीम चिपसेट दिला आहे. याबाबत असा दावा करण्यात आला आहे की, हे 3.4GHz ची पीक क्लॉक स्पीड ऑफर करू शकते. यासोबतच फोनमध्ये 12GB एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 256GB यूएफएस 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज दिले आहे.
फोटोग्राफीसाठी मोटोरोला एज 70 प्रो प्लसमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये सोनी एलवायटी-710 सेंसर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन वाला 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस, 3x पर्यंत ऑप्टिकल झूम, 50x पर्यंत डिजिटल झूम आणि OIS सपोर्ट देखील मिळणार आहे. याशिवाय या नव्या स्मार्टफोनमध्ये 112-डिग्री फील्ड ऑफ व्यू वाले 50-मेगापिक्सेल (f/2.0) चे अल्ट्रा-वाइड लेंस देखील मिळणार आहे, ज्यासोबत एक डेडिकेटेड 2-इन-1 लाइट सेंसर देखील फिट केला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 50-मेगापिक्सेल (f/1.9) चा कॅमेरा दिला आहे.
नव्या मोटोरोला स्मार्टफोनमध्ये 6,500mAh बॅटरी दिली आहे. जी 15W (वायरलेस) फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5W वायर्ड आणि वायरलेस रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करते.






