Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काउंटडाउन सुरू… या दिवशी भारतात लाँच होणार Fire-Boltt चा पहिला स्मार्टफोन! Flipkart वर झाली घोषणा

भारतीय टेक ब्रँड Boltt आता स्मार्टफोन बाजारात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीचा पहिला स्मार्टफोन 25 ऑगस्ट रोजी भारतात लाँच होणार असून Flipkart वर त्याचा अधिकृत लुक आणि लाँच डेटची माहिती समोर आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 05, 2026 | 12:06 PM
काउंटडाउन सुरू... या दिवशी भारतात लाँच होणार Fire-Boltt चा पहिला स्मार्टफोन! Flipkart वर झाली घोषणा

काउंटडाउन सुरू... या दिवशी भारतात लाँच होणार Fire-Boltt चा पहिला स्मार्टफोन! Flipkart वर झाली घोषणा

Follow Us
Follow Us:
  • Boltt चा पहिला स्मार्टफोन 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता भारतात लाँच होणार आहे.
  • फ्लिपकार्टवरील मायक्रोसाइटमधून फोनचा पहिला अधिकृत लुक आणि लाँच डेट समोर आली आहे.
  • हा स्मार्टफोन 20 हजार रुपयांखाली येण्याची शक्यता असून यूनिसोक T7250 चिपसेट आणि अँड्रॉईड 16 मिळू शकतो.
भारतातील टेक ब्रँड Boltt आता स्मार्टफोनच्या जगात पाऊल ठेवणार आहे. कंपनीने त्यांच्या पहिल्या स्मार्टफोनची घोषणा केली असून येत्या काहीच दिवसांत कंपनीचा हा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार आहे. त्यामुळे आता स्मार्टफोन मार्केटमध्ये होणाऱ्या फायरबोल्टच्या एंट्रीसाठी सर्वचजण प्रचंड उत्सुक आहेत. कंपनीने आधीच त्यांचा हा नवा स्मार्टफोन Boltt ब्रँडअंतर्गत लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. लाँचिंगसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना आता फ्लिपकार्टवर स्मार्टफोनसाठी एक मायक्रोसाईट जारी करण्यात आली आहे. यामध्ये कंपनीने स्मार्टफोनची लाँच डेट कंफर्म केली आहे. तसेच, स्मार्टफोनच्या डिझाईनचा पहिला अधिकृत लुक देखील शेअर केला आहे.

गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! boAt च्या निवडक हेडफोन्ससह मिळणार Spotify Premium सब्स्क्रिप्शन, असा घ्या ऑफरचा फायदा

फ्लिपकार्टवर मायक्रोसाईट जारी

फ्लिपकार्टवर शेअर करण्यात आलेल्या मायक्रोसाईटवरून अशी माहिती मिळाली आहे की, कंपनीचा पहिला Boltt स्मार्टफोन 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाणार आहे. लिस्टिंगमध्ये दावा करण्यात आला आहे की, हे हँडसेट कमीत कमी डिस्ट्रेक्शन आणि स्मूद डेली-टू-डे ऑपरेशनवर फोकस करण्यासाठी क्लीन सॉफ्टवेयर अनुभव देणार आहे. प्रमोशनल पेजवर Boltt फोनच्या फ्रंच डिझाईनचा अर्ली लुक दिसत आहे. डिस्प्लेच्या मध्यभागी सेल्फी कॅमेऱ्यासाठी होल-पंच कटआउट दिला आहे. खालील बेजल इतर बाजूंच्या तुलनेत थोडा जाड दिसत आहे. फोनच्या उजव्या कडेला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम कीज आहेत, आणि त्याची फ्रेम सपाट डिझाइनची असून ती ब्राउन रंगात फिनिश केलेली दिसते.  (फोटो सौजन्य: Flipkart) 

20 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच होण्याची शक्यता

कंपनीने अद्याप त्यांच्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केलेला नाही. काही जुन्या रिपोर्ट्समध्ये असे संकेत मिळत आहेत की, कंपनीचा पहिला स्मार्टफोन बजेट फ्रेंडली प्राईज सेगमेंटमध्ये लाँच केला जाणार आहे. कंपनी त्यांचा पहिला स्मार्टफोन 20 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच करण्यावर अधिक भर देत आहे.

जर कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन या किंमतीत लाँच केला तर त्यांची थेट स्पर्धा एचएमडी, लावा, सँमसंग, वनप्लस, ओप्पो आणि वीवोसारख्या ब्रँड्ससोबत केली जाऊ शकते. फायरबोल्टने यापूर्वी घोषणा केली होती की, त्यांच्या स्मार्टफोन लाईनअपमध्ये Evo आणि Ace सीरीज समाविष्ट आहे, ज्यामध्ये भारतीय बाजारांसाठी 4G आणि 5G असे दोन्ही मॉडेल्स तयार केले जात आहेत. कंपनीचं म्हणणं आहे की, हे स्मार्टफोन्स भारतातच मॅन्युफॅक्चर केले जात आहेत.

50MP कॅमेऱ्यासह नव्या Poco स्मार्टफोनची भारतात एंट्री! पावरफुल बॅटरीसह मिळणार हे खास फीचर्स… जाणून घ्या किंमत

असे असू शकतात आगामी स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स

समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, कंपनीचा पहिल्या स्मार्टफोन Boltt Evo 4G या नावाने लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गीकबेन्चवर देखील पाहायला मिळाला आहे. बेंचमार्क लिस्टिंगकडून असे संकेत मिळत आहेत की, या डिव्हाईसमध्ये 4GB रॅम आणि अँड्रॉईड 16 सह यूनिसोक T7250 चिपसेट दिला जाऊ शकतो.

Web Title: Boltt first smartphone launch on august 25 in india microsite live on flipkart tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
2

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
3

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
4

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.