
BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप
बीएसएनएल पुन्हा एकदा त्यांच्या ग्राहकांसाठी बीएसएनएल फ्रीडम ऑफर 2.0 घेऊन आली आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला केवळ 1 रुपयांत नवीन सिम मिळणार आहे. यासोबतच यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 एसएमएस, 1 जीबी डेली डेटा मिळणार आहे. हा प्लॅन 24 दिवसांपर्यंत उपलब्ध असणार आहे. कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत बीएसएनएल फ्रीडम ऑफर 2.0 बद्दल माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
बीएसएनएल फ्रीडम 2.0 ऑफर केवळ नवीन सिम कार्ड खरेदी करणाऱ्या यूजर्सना मिळणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन ऑफरअंतर्गत बीएसएनएल सिम केवळ 1 रुपयांत उपलब्ध असणार आहे. हे सिम खरेदी करणाऱ्या यूजर्सना एक बीएसएनएल प्लॅन ऑफर केला जाणार आहे. या प्लॅनअंतर्गत यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉल (लोकल आणि नॅशनल), रोज 100 एसएमएस आणि डेली 1 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 24 दिवलांची आहे. मात्र या प्लॅनची व्हॅलिडिटी संपल्यानंतर बीएसएनएल सिम ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी यूजर्सना नवीन रिचार्ज प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. बीएसएनएल वेबसाईट आणि ॲपवर विविध रिचार्ज प्लॅनची माहिती देण्यात आली आहे. इथून तुम्ही तुमच्या गरजेनुसार नवीन रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकता.
Sometimes, a new beginning is all about taking that first step. With BSNL Freedom 2.0, get your SIM at just ₹1 and start your journey to better connectivity.#BSNLIndia #BSNLSelfCareApp #InternetForEveryone #DigitalLife #IndiaOnline #BSNLServices #SmartIndia… pic.twitter.com/vUFZE4AfUJ — BSNL India (@BSNLCorporate) August 31, 2026
कंपनीने एक्सवर पोस्ट शेअर करत या खास ऑफरबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजेच ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर या ऑफरचा फायदा घेऊन बीएसएनएल सिम खरेदी करायचे असेल तर घाई करावी लागणार आहे. कारण कंपनीची ही विशेष ऑफर 12 सप्टेंबर 2026 पर्यंत उपलब्ध असणार आहे.
जर तुम्हाला सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलच्या फ्रीडम 2.0 ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळील ऑथराइज्ड सिम रिटेल स्टोअरला भेट देऊ शकता. यानंतर तुम्ही या ऑफरअंतर्गत नवीन सिम खरेदी करू शकतात. नवीन सिम खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर असणं गरजेचा आहे.