Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग… फॉलो करा या स्टेप्स

BSNL Phone Setting: मोबाईलमध्ये नेटवर्क नसल्यामुळे कॉलिंगमध्ये अडचणी येतात, पण बीएसएनएल यूजर्ससाठी आता यावर सोपा उपाय उपलब्ध आहे. कंपनीच्या VoWiFi (वॉइस ओवर वाय-फाय) सेवेमुळे वाय-फायच्या मदतीने नेटवर्क नसतानाही कॉल आणि मेसेजची सुविधा वापरता येणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 02, 2026 | 02:57 PM
नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग... फॉलो करा या स्टेप्स

नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग... फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • बीएसएनएल च्या VoWiFi सेवेमुळे मोबाईल नेटवर्क नसतानाही वाय-फायच्या मदतीने कॉलिंग आणि मेसेजिंग करता येते.
  • ही सेवा देशभरातील सर्व बीएसएनएल टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध असून फोनच्या सेटिंगमध्ये वायफाय कॉलिंग सुरू करावे लागते.
  • VoWiFi वापरण्यासाठी बीएसएनएलचे 4G/5G रेडी सिम कार्ड आणि सक्रिय वाय-फाय कनेक्शन आवश्यक आहे.
भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) सतत त्यांची सर्विस सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामुळे त्यांच्या यूजर्सना चांगला अनुभव मिळावा आणि नवीन यूजर्स देखील जोडले जावेत. आता कंपनीच्या अशाच एका सर्विसबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यावर्षीच्या सुरुवातीला सरकारी टेलीकॉम कंपनीने भारतात VoWiFi सर्विस लाँच केली होती. यामध्ये यूजर्सना नेटवर्कशिवाय किंवा लो नेटवर्कमध्ये देखील कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाते.

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत

मोबाईलमध्ये नेटवर्क नाही तरीही कॉल करता येणार!

भारत संचार निगम लिमिटेडने सुरु केलेली ही सर्विस देशभरातील सर्व टेलीकॉम सर्कलमध्ये उपलब्ध आहे. यासाठी यूजर्सना त्यांच्या फोनच्या सेटिंगमध्ये काही बदल करावे लागणार आहेत. या बदलानंतर यूजर्स नेटवर्क नसताना देखील कॉलिंगच्या सुविधेचा फायदा घेऊ शकणार आहे. फोनमधील सेटिंग ऑन केल्यानंतर यूजर्स त्यांच्या फोनवर कॉल आणि मेसेज रिसीव्ह करू शकणार आहेत. तसेच यूजर्स त्यांच्या फोनवरून कॉल देखील करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

काय आहे बीएसएनएलची वॉइस ओवर वाय-फाय सर्विस?

बीएसएनएलची ही सर्विस वॉइस ओवर वाय-फाय (VoWiFi) आहे. यामध्ये यूजर्सना त्यांच्या फोनमध्ये मोबाईल नेटवर्क नसले तरी देखील कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. पण यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहेस की, फोन वाय-फाय नेटवर्कला कनेक्ट असणं गरजेचं आहे. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया अनेक वर्षांपासून आपल्या यूजर्सना ही सेवा देत आहेत. बीएसएनएलने या वर्षाच्या सुरुवातीला ही सेवा सुरू केली. बीएसएनएलची व्हीओवायफाय सेवा सुरू करणे खूप सोपे आहे. तुम्ही तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनवर ती सहजपणे सुरू करू शकता. कंपनीने गेल्यावर्षी सुमारे 1 लाख नवीन 4G/5G मोबाईल टॉवर संपूर्ण देशभरात लावले आहेत. हे मोबाईल टॉवर्स सरकारी टेलीकॉम ऑपरेटरचे नेटवर्क इंफ्रास्ट्रक्टर सुधारण्यासाठी लावण्यात आले आहेत.

बीएसएनएल व्हीओवायफाय सेवा सुरु करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

बीएसएनएल व्हीओवायफाय सेवा वापरण्यासाठी तुमच्याकडे बीएसएनएल 5G रेडी सिम कार्ड असं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे बीएसएनएलचे जुने सिमकार्ड असेल तर ते त्वरित बदला आणि 4G/5G सिम कार्ड खरेदी करा. यासाठी तुम्हाला कोणतेही जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

Huawei ने दिलं डबल सरप्राईज! 50MP प्रायमरी कॅमेऱ्यासह झाली दोन नव्या स्मार्टफोन्सची एंट्री… किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

  • नवीन सिम फोनमध्ये लावल्यानंतर सेटिंग्स ओपन करा.
  • इथे तुम्हाला नेटवर्क आणि इंटरनेट पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला बीएसएनएल सिम ऑप्शनवर टॅप करा.
  • इथे तुम्हाला पुढील पेजवर बीएसएनएलवर टॅप करावे लागेल.
  • खाली स्क्रॉल करा आणि वायफाय कॉलिंग ऑप्शनवर टॅप करा.
  • यानंतर यूज वायफाय कॉलिंग ईनेबल करा.
अशा प्रकारे, तुमच्या फोनमध्ये बीएसएनएलची VoWiFi कॉलिंग सेवा सुरू होईल आणि तुम्ही नेटवर्क नसलेल्या किंवा कमी नेटवर्क असलेल्या भागातही वायफायच्या मदतीने कॉलिंग सेवेचा लाभ घेऊ शकाल.
💡

Frequently Asked Questions

  • Que: BSNL म्हणजे काय?

    Ans: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही भारत सरकारच्या मालकीची दूरसंचार कंपनी आहे.

  • Que: BSNL कोणत्या सेवा पुरवते?

    Ans: BSNL मोबाईल नेटवर्क, ब्रॉडबँड, फायबर इंटरनेट, लँडलाइन आणि एंटरप्राइझ कम्युनिकेशन सेवा पुरवते.

  • Que: BSNL चे 4G आणि 5G नेटवर्क उपलब्ध आहे का?

    Ans: BSNL देशभरात 4G सेवा विस्तारत आहे आणि 5G सेवांवरही काम करत आहे.

Web Title: Bsnl users can make calls without network follow these step by step process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • Tech News

संबंधित बातम्या

जगातील पहिला Agentic AI स्मार्टफोन लाँच! फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत करणार सर्व कामं
1

जगातील पहिला Agentic AI स्मार्टफोन लाँच! फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत करणार सर्व कामं

Ajio चं इंस्टाग्राम अकाऊंट झालं Hacked? यूजर्सना गेले अतरंगी मेसेज! पोस्ट शेअर करत कंपनीने केलं स्पष्ट
2

Ajio चं इंस्टाग्राम अकाऊंट झालं Hacked? यूजर्सना गेले अतरंगी मेसेज! पोस्ट शेअर करत कंपनीने केलं स्पष्ट

काय आहे सरकारची नवी MPMS स्कीम? स्मार्टफोनची किंमत होणार कमी? जाणून घ्या सविस्तर
3

काय आहे सरकारची नवी MPMS स्कीम? स्मार्टफोनची किंमत होणार कमी? जाणून घ्या सविस्तर

OpenAI चे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच! Codex Micro ने सर्वांनाच केलं आकर्षित; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
4

OpenAI चे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच! Codex Micro ने सर्वांनाच केलं आकर्षित; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.