WhatsApp Update: आता रिमाइंडरची गरज नाही! मीटिंग, वाढदिवस, शुभेच्छा… ठराविक वेळी अॅप आपोआप पाठवेल तुमचा मेसेज
लेटेस्ट बीटा अपडेटद्वारे माहिती मिळाली आहे की, कंपनी लवकरच एक असं फीचर रोलआऊट करण्याच्या तयारीत आहे, ज्याच्या मदतीने यूजर्स त्यांचे मेसेज शेड्यूल करू शकणार आहेत. म्हमजेच तुम्ही सेट केलेल्या वेळी मेसेज आपोआप सेंड होणार आहे. तुम्ही मेसेज टाईप करून तारीख आणि वेळ निवडू शकता, त्यानंतर तुम्ही सेट केलेल्या वेळी आपोआप मेसेज सेंड केला जाईल. समजा तुम्ही 12 वाजता वेळ सेट केली आहे. तर त्या व्यक्तिला 12 वाजताच आपोआप मेसेज सेंड केला जाणार आहे. अनेकदा असं होतं की तुम्हाला एखाद्या व्यक्तिला ठराविक वेळेत मेसेज करायचा असतो पण तुम्ही विसरता आणि नंतर पश्चाताप होतो. मात्र आता असं होणार नाही. तुम्ही आधीच मेसेज सेंड करण्यासाठी तारीख आणि वेळ सेट करू शकणार आहात. (फोटो सौजन्य – Pinterest)
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे फीचर यूजर्सना मेसेज टाईप केल्यानंतर एक तारीख आणि वेळ सेट करण्याचा पर्याय देणार आहे. यानंतर ठरवलेल्या वेळी आपोआप मेसेज सेंड केला जाणार आहे. यासाठी यूजरला पुन्हा अॅप उघडण्याची किंवा कोणतेही अतिरिक्त काम करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही शेड्यूल केलेले मेसेज डेडिकेटेड सेक्शनमध्ये दिसणार आहे. ज्यामुळे चॅटची माहिती स्क्रीनमध्ये अगदी सहज एक्सेस केली जाऊ शकते. येथून, यूजर्स किती मेसेज शेड्यूल केले आहेत ते देखील पाहू शकतील आणि आवश्यक असल्यास, ते सहजपणे मॅनेज करू शकतील किंवा हटवू शकतील.
या नवीन फीचरची खास गोष्ट म्हणजेच जर तुम्ही वेळेपूर्वीच शेड्यूल केलेला एखादा मेसेज डिलीट केला तर रिसीव्हरला त्याबाबत कोणतीही नोटिफिकेशन जाणार नाही. याचं कारण म्हणजे मेसेज सेंड होण्यापूर्वीच डिलीट करण्यात आला. यामुळे रिसीव्हरला याबाबत कोणतीही माहिती मिळत नाही. रिपोर्टमध्ये असे म्हटले जात आहे की हे फीचर पर्सनल चॅट आणि ग्रुप चॅट दोन्हीमध्ये काम करेल.






