Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Call of Duty Warzone Mobile Game अखेर बंद, कंपनीने केली घोषणा; काय आहे कारण? जाणून घ्या

Call of Duty Warzone Mobile Game: कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल गेम आता अधिकृतपणे बंद करण्यात आला आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून आधीच महिती देण्यात आली होती. कंपनीने हा गेम बंद करण्याचा निर्णय का घेतला जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 24, 2025 | 12:23 PM
Call of Duty Warzone Mobile Game अखेर बंद, कंपनीने केली घोषणा; काय आहे कारण? जाणून घ्या

Call of Duty Warzone Mobile Game अखेर बंद, कंपनीने केली घोषणा; काय आहे कारण? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

चिमुकल्यांपासून तरूणांपर्यंत सर्वांमध्ये अनेक बॅटल रॉयल गेम्स लोकप्रिय आहे. या गेम्समध्ये फ्री फायर, कॉल ऑफ ड्यूटी: वॉरझोन, पबजी मोबाईल, सिग्मॅक्स, फ्री फायर अ‍ॅडव्हान्स, यांसारख्या अनेक गेम्सचा समावेश आहे. खरं तर लोकांमध्ये या गेम्सची प्रचंड क्रेझ आहे. कारण हे बॅटल रॉयल गेम्स केवळ मनोरंजनाचं नाही तर पैसे कमावण्याचे देखील साधन आहे. गेमर्स लाईव्ह स्ट्रिमिंग करून युट्यूबद्वारे पैसे कमावतात. तुम्ही देखील या गेमर्सपैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे.

Google I/O 2025: ईव्हेंटमध्ये झाली Beam ची घोषणा, 3D व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचं स्वप्न लवकरच सत्यात उतरणार

कंपनीने अधिकृतपणे केली घोषणा

पॉपुलर बॅटल रॉयल गेम Call of Duty: Warzone Mobile कंपनीने अधिकृतपणे बंद केला आहे. अलीकडेच Activision ने याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. PUBG Mobile आणि भारतात BGMI या दोन लोकप्रिय गेम्सना टक्कर देण्यासाठी Call of Duty: Warzone Mobile लाँच करण्यात आला होता. मात्र केवळ एका वर्षातच कंपनीला हा गेम बंद करावा लागला आहे. कंपनीने अधिकृतपणे घोषणा केल्यामुळे हा Call of Duty Warzone Mobile आता Google Play Store आणि Apple App Store वरून हटविण्यात आला आहे. यामुळे आता युजर्स हा गेम डाऊनलोड करू शकत नाहीत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

काय आहे कारण?

Activision ने दिलेल्या माहितीनुसार, Warzone Mobile चा परफॉर्मेंस कंपनीच्या अपेक्षेनुसार नव्हता. तर PC आणि कंसोलवर Call of Duty सीरीजने यशाचं शिखर गाठलं होतं. मात्र मोबाईल वर्जनला तितकी लोकप्रियता मिळाली नाही. यासोबतच कंपनी आधीपासूनच Call of Duty Mobile चालवत आहे, जो लाखो लोक खेळत आहेत. अशा परिस्थितीत लोकप्रियता नसलेला गेम सुरु ठेवणं अधिक खर्चीक ठरलं असतं. त्यामुळे कंपनीने अखेर हा गेम बंद करण्याचा निर्णय घेतला.

जे आधीच गेम खेळत होते त्यांच्याबद्दल काय?

जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये किंवा आयफोनमध्ये आधीच Warzone Mobile इंस्टॉल केला असेल तर तुम्ही हा गेम खेळू शकता. मात्र हा गेम आता Google Play Store आणि Apple App Store वर डाऊनलोडसाठी उपलब्ध नाही. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या गेममध्ये आता अपडेट, सीजन किंवा कोणताही नवीन कंटेट दिला जाणार नाही. तसेच, गेममधील खरेदी देखील बंद करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही गेममध्ये पैसे गुंतवले असतील तर ते आता वापरले जाऊ शकत नाही. Activision ने हे पैसे परत करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.

Google I/O 2025: उद्यापासून सुरु होणार गुगलचा सर्वात मोठा ईव्हेंट! अपडेटेड Gemini पासून Android 16 पर्यंत, कोणत्या घोषणा होणार?

पैशांचं काय होणार?

अ‍ॅक्टिव्हिजन म्हणते की जर तुम्ही 15 ऑगस्टपूर्वी तुमच्या अ‍ॅक्टिव्हिजन खात्याने कॉल ऑफ ड्यूटी मोबाइलमध्ये लॉग इन केले तर तुम्हाला वॉरझोन मोबाइलमध्ये असलेल्या बॅलन्सच्या दुप्पट मूल्य मिळेल. चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही गेमच्या स्टोरीलाइन आणि गेमप्लेमध्ये फारसा फरक नाही, ज्यामुळे यूजर्ससाठी ट्रांजिशन सोपे होईल.

Web Title: Call of duty warzone mobile game is closed what is the reason behind it tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 12:23 PM

Topics:  

  • online games
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत
1

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर
2

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या
3

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव
4

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.