Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cockroach Janta Party: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘Withheld’ आणि ‘Suspend’ मध्ये फरक काय? जाणून घ्या सविस्तर

Difference Between Withheld And Suspend: 'कॉकरोच जनता पार्टी' (Cockroach Janta Party) चे एक्स अकाऊंट बॅन (Withheld) करण्यात आले आहे. मात्र यानंतर एका नव्या अकाऊंटसह सीजेपी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. या अकाऊंटवर अत्यंत कमी वेळात हजारो फॉलोवर्स देखील वाढले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 22, 2026 | 10:13 AM
Cockroach Janta Party: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘Withheld’ आणि ‘Suspend’ मध्ये फरक काय? जाणून घ्या सविस्तर

Cockroach Janta Party: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘Withheld’ आणि ‘Suspend’ मध्ये फरक काय? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • X वर नियमांचे उल्लंघन केल्यास अकाऊंट तात्पुरते किंवा कायमस्वरूपी Suspend केले जाते.
  • Withheld म्हणजे सरकार किंवा न्यायालयाच्या आदेशानंतर एखाद्या देशापुरते अकाऊंट किंवा पोस्ट ब्लॉक करणे.
  • Suspend झालेलं अकाऊंट जगभरात दिसत नाही, तर Withheld अकाऊंट इतर देशांमध्ये सुरूच राहते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर गेल्या काही दिवसांपासून ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) ची जोरदार चर्चा सुरु आहे. केवळ 6 दिवसांत कॉकरोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 19 मिलीअनचा टप्पा पार करण्यात आला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यानंतर सुरु झालेली ही कॉकरोच जनता पार्टी आज लाखो तरूणांचा आवाज बनली आहे. सीजेपीने बीजेपी आणि काँग्रेस सारख्या दिग्गज राजकीय पक्षांना मागे टाकत इंस्टाग्रामवर एक मोठा टप्पा पार केला आहे. दिवसेंदिवस इंस्टाग्रामवर सीजेपीचे फॉलोवर्स मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जेन-झीमध्ये सीजेपीची एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे.

काय सांगता! Cockroach Janta Party चे निम्म्याहून अधिक फॉलोअर्स पाकिस्तानी; भाजप नेत्याचा आकडेवारीसह खळबळजनक दावा

इंस्टाग्रामप्रमाणेच कॉकरोच जनता पार्टी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देखील ट्रेंडिंगमध्ये आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या एक्स अकाऊंटवरील फॉलोवर्सची संख्या वाढत असतानाच भारतात त्यांचे एक्स अकाऊंट बॅन (Withheld) करण्यात आले. यानंतर अगदी काही वेळातच एक्सवर ‘कॉकरोच इज बॅक’ या नावाने नवीन अकाऊंट सुरु करण्यात आलं. मात्र यादरम्यान अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की, एक्सवर बॅन (Withheld) आणि सस्पेंड यांच्यामध्ये काय फरक आहे? एक्स अकाऊंट कधी बॅन (Withheld) आणि सस्पेंड केलं जातं? याबाबत काय नियम आहेत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Cockroach Janta Party)

एक्सवर अकाऊंट सस्पेंड कधी होतं?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जेव्हा कंपनीला जाणवते की एखादे अकाऊंट नियम आणि अटींचे उल्लंघन करत आहे, त्यावेळी संबंधित अकाऊंटवर कारवाई करत अकाऊंट सस्पेंड केलं जाते. अशा परिस्थितीत, संबंधित अकाऊंट कंपनीकडूनच कायमस्वरूपी किंवा तात्पुरते निलंबित केले जाते. हा निर्णय पूर्णपणे एक्सचा असतो.

स्पॅम किंवा खोटे अकाऊंट सुरु करणे, लोकांमध्ये द्वेष पसरवणे, हिंसेला प्रोत्साहन देणं किंवा बाल सुरक्षा आणि कॉपीराइट नियमांचे उल्लंघन केल्यास अकाऊंट सस्पेंड केलं जाते. वारंवार नियम मोडल्यास एक्स अकाऊंट कायमस्वरूपी निलंबित केले जाऊ शकते. जेव्हा एक्सकडून एखादे अकाऊंट निलंबित केले जाते, तेव्हा संबंधित अकाऊंटच्या प्रोफाईलवर लिहीले जाते की, अकाउंट सस्पेंड. त्यानंतर हे अकाऊंट जगातील कोठूनही कोणालाही दिसत नाही.

मराठी तरुणाची डिजिटल क्रांती! ‘Cockroach Janta Party’मागचा चेहरा कोण? जाणून घ्या अभिजीत दिपके यांची कहाणी

एक्सवर अकाऊंट Withheld कधी होतं?

Withheld म्हणजेच अकाऊंट थांबवणे, हा एक देश-विशिष्ट निर्बंध आहे. जेव्हा एखाद्या देशातील सरकार किंवा न्यायालय कायदेशीर आदेश जारी करते, जेव्हा एक्स संबंधित अकाऊंट किंवा केवळ एखादे ट्विट फक्त तेवढ्याच देशापुरते थांबवतो. उर्वरित संपूर्ण जगात अकाऊंट आधीसारखेच सुरु राहते. भारतात आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत, सरकार किंवा न्यायालय ‘X’ ला नोटीस पाठवते.

एक्स या आदेशाचे पालन करत अकाऊंट केवळ भारतात बंद करतो. मात्र उर्वरित जगात हे अकाऊंट आधीसारखेच सुरु राहते. ज्या यूजरचे अकाऊंट Withheld होतं, त्याच्या प्रोफाईलवर भारतात असा मेसेज दिसतो की, ‘अकाउंट विदहेल्ड इन इंडिया इन रिस्पांस तो ए लीगल डिमांड’ म्हणजेच ‘कायदेशीर मागणीच्या प्रतिसादात भारतातील खाते रोखले आहे.’

💡

Frequently Asked Questions

  • Que: X वर ‘Withheld’ म्हणजे काय?

    Ans: ‘Withheld’ म्हणजे एखादे अकाऊंट किंवा पोस्ट विशिष्ट देशात कायदेशीर आदेशानंतर ब्लॉक करणे.

  • Que: X वर अकाऊंट ‘Suspend’ का केले जाते?

    Ans: नियमांचे उल्लंघन, स्पॅम, द्वेषयुक्त पोस्ट किंवा खोटे अकाऊंट चालवल्यास अकाऊंट Suspend केले जाऊ शकते.

  • Que: Withheld आणि Suspend मध्ये मुख्य फरक काय आहे?

    Ans: Suspend झालेलं अकाऊंट जगभरात बंद होतं, तर Withheld अकाऊंट फक्त एका देशापुरतं मर्यादित केलं जातं.

Web Title: Cockroach janta party what is difference between withheld and suspend on x platform tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • Social Media
  • Tech News

संबंधित बातम्या

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार
1

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

Social Media वर कमी फॉलोअर्स असूनही करते बक्कळ कमाई? जाणून घ्या २३ वर्षीय इन्फ्लुएंसरची भन्नाट आयडिया
2

Social Media वर कमी फॉलोअर्स असूनही करते बक्कळ कमाई? जाणून घ्या २३ वर्षीय इन्फ्लुएंसरची भन्नाट आयडिया

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
3

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास
4

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.