Airtel ग्राहकांसाठी खुशखबर! आता YouTube वर जाहिरातींचा त्रास संपणार, असा आहे 200 रुपयांचा ओटीटी टॉप-अप प्लॅन
एअरटेलने घेतलेल्या या निर्णयामुळे यूजर्स यूट्यूब शॉर्ट्ससह जाहिरातमुक्त यूट्यूबचा आनंद घेऊ शकणार आहेत. तसेच, यूजर्सना बॅकग्राऊंड प्ले, ऑफलाइन डाऊनलोड आणि यूट्यूब म्युझिक प्रीमियमचा देखील लाभ मिळणार आहे. आता एअरटेल ग्राहक कार्यक्रम, चित्रपटांचे स्ट्रीमिंग, कंटेंट क्रिएटर्सचे व्हिडिओ, संगीत अशा सर्व गोष्टी एकाच ठिकाणी पाहू शकणार आहेत.
जारी करण्यात आलेल्या एका प्रेस नोटमध्ये एअरटेलने सांगितलं आहे की, त्यांच्या सध्याच्या प्रीपेड एंटरटेनमेंट पोर्टफोलियोमध्ये युट्यूब प्रिमियमचा समावेश केला जात आहे. टेलीकॉम सर्विस प्रोवाइडरचं असं म्हणणं आहे की, जे ग्राहक व्हिडीओ पाहणे, क्रिएटर्सना फॉलो करणं, गाणी ऐकणं आणि नवीन कंटेंट डिस्कवर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डेटा खर्च करतात, अशा ग्राहकांसाठी कंपनीचा हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.
ग्राहक एअरटेलच्या 200 रुपयांच्या ओटीटी टॉप-अपद्वारे युट्यूब प्रिमियमचा फायदा घेऊ शकतात. या टॉप-अपमध्ये यूजर्सना 30GB एडिशनल डेटा आणि दूसऱ्या एंटरटेनमेंट सर्विसचा ॲक्सेस मिळणार आहे. एअरटेलच्या सध्याच्या श्रेणीमध्ये आधीच प्राइम व्हिडिओ, जिओ-हॉटस्टार, झी5 प्रीमियम आणि सोनीलिव्ह यांसारख्या सेवांसह इतर 18 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.
Ans: एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांना YouTube Premium चे फायदे देण्यासाठी YouTube सोबत भागीदारी केली आहे.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, एअरटेलच्या २०० रुपयांच्या OTT टॉप-अपद्वारे YouTube Premium चा लाभ घेता येणार आहे.
Ans: या टॉप-अपमध्ये ३०GB अतिरिक्त डेटा आणि मनोरंजन सेवांचा ॲक्सेस मिळणार आहे.






