Dussehra AI Image by Gemini (सौ. Gemini)
Google Gemini AI Dussehra Photos: दसरा जवळ आल्याने सणांचा उत्साह आता सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. यंदा दसऱ्याला गुगल जेमिनी एआय (Google Gemini AI) च्या मदतीने दसऱ्याच्या थीमवर आधारित फोटो तयार करून नेटकरी इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. क्रिएटिव्ह प्रॉम्प्टचा वापर करून यूजर्स भगवान श्रीरामाच्या धनुष्य-बाणापासून ते रावणाच्या पुतळ्यापर्यंत सर्व गोष्टी त्यांच्या फोटोंमध्ये समाविष्ट करत आहेत.
लोकांनी त्यांच्या कल्पनांना डिजिटल रूप देण्यासाठी गुगल जेमिनीचा वापर सुरू केला आहे. काहीजण स्वतःला भगवान रामाच्या रूपात पाहत आहेत, तर काही दसऱ्याच्या संध्याकाळी आतषबाजी आणि दिव्यांच्या प्रकाशात उभे असलेले दिसत आहेत. AI ने तयार केलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि लोक ते मोठ्या उत्साहात शेअर करत आहेत.
तुम्हीसुद्धा दसऱ्याच्या थीमवर आधारित तुमचे स्वतःचे फोटो बनवू शकता. यासाठी गुगलचे जेमिनी नॅनो बनाना एआय (Gemini Nano Banana AI) फोटो एडिटिंग टूल सर्वात लोकप्रिय होत आहे. या टूलच्या मदतीने लोक रावण दहन, आतषबाजी, पारंपरिक पोशाख आणि धार्मिक भावनांना फोटोंमध्ये अप्रतिमरीत्या साकारत आहेत.
प्रॉम्प्ट १:
“Create a detailed, Dussehra-inspired image of me set in a mythological context featuring Lord Ram… Behind me is a massive burning effigy of Ravana, showcasing his fiery heads…” (अर्थ: ‘माझ्या एका फोटोमधून, पौराणिक संदर्भाने प्रेरित दसऱ्याची प्रतिमा तयार करा, ज्यात भगवान राम आहेत… माझ्यामागे रावणाचा एक मोठा जळणारा पुतळा आहे, ज्यात त्याचे जळणारे डोके दिसत आहेत…’)
प्रॉम्प्ट २:
“Using this photo, create a vibrant Dussehra gathering featuring me and my friends dressed in colourful kurtas and lehengas… with firecrackers and Ravana burning in the background…” (अर्थ: ‘या फोटोचा वापर करून, दसऱ्याचा एक आनंदी सोहळा तयार करा, ज्यात मी आणि माझे मित्र रंगीत कुर्ते आणि लेहेंगा घातलेले आहोत… तसेच, आतषबाजी आणि रावणाचा पुतळा मागे जळत आहे…’)
प्रॉम्प्ट ३:
“Make a portrait of Dussehra festivities using the woman in this image at the centre. She is holding a diya… Ravana burning in the background but out of focus…” (अर्थ: ‘या फोटोतील महिलेला केंद्रस्थानी घेऊन दसऱ्याच्या उत्सवाचे चित्र तयार करा. ती एक दिवा हातात धरलेली आहे… मागे रावणाचा पुतळा जळत आहे, पण तो अस्पष्ट (आउट ऑफ फोकस) आहे…’)
प्रॉम्प्ट ४:
“Make a Dussehra-inspired festive photo with Ravana in the backdrop and a night scene with bright lights… showing Raavan right behind him but keep the overall look realistic…” (अर्थ: ‘रावणाच्या पुतळ्याच्या पार्श्वभूमीवर दसऱ्याचा एक फोटो तयार करा, ज्यात रात्रीचे दृश्य आणि तेजस्वी दिवे आहेत… रावणाचा पुतळा अगदी मागे दाखवा पण एकूण स्वरूप वास्तववादी ठेवा…’)
आजचे Google Doodle का आहे खास? क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ठरतंय सरप्राईज
प्रॉम्प्ट ५:
“Turn this picture into a Dussehra-inspired photo… change the backdrop to Dussehra-style festivities, with Ravana in the background, people and children enjoying the festivities…” (अर्थ: ‘या चित्राला दसऱ्याच्या थीमवर आधारित फोटोमध्ये बदला… पार्श्वभूमी दसऱ्याच्या उत्सवासारखी बदला, ज्यात मागे रावणाचा पुतळा आहे आणि लोक व मुले उत्सव साजरा करत आहेत…’)
दसरा हा भारतीय संस्कृती आणि चांगल्याचा वाईटावर विजय यांचा प्रतीक आहे. यंदा एआय तंत्रज्ञानाने या सणाला अधिक खास बनवले आहे. Google Gemini सारख्या एआय फोटो एडिटिंग टूल्सने तरुणांना त्यांच्या भावना नवीन पद्धतीने व्यक्त करण्याची संधी दिली आहे. यामुळे सण आणि तंत्रज्ञानाचा हा संगम सोशल मीडियाला अधिक रंगीत आणि सर्जनशील बनवत आहे.