फोटो सौजन्य सोशल मिडिया
Does @temple really monitor blood flow to the brain, or just the scalp?
In our second validation study, we tested Temple BrainFlow against time-domain NIRS, one of the few technologies that can separate brain blood volume changes from scalp blood volume changes. We had 60… pic.twitter.com/vEJqxGPiXu
— Deepinder Goyal (@deepigoyal) September 25, 2026
झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल आपल्या पोस्ट मध्ये असे म्हटले आहे की, Temple चिपची ही आमची दुसरी पडताळणी आहे,या दुसऱ्या पडताळणीच्या आभ्यासात आम्ही Temple चिपच्या ब्रेनफ्लोची तुलना टाइम-डोमेन NIRS शी केली आहे. जे मेंदूतील रक्ताच्या प्रमाणातील बदल आणि टाळूतील रक्ताच्या प्रमाणातील बदल वेगळे करू शकणाऱ्या काही मोजक्या तंत्रज्ञानांपैकी एक आहे. असे मत झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी केले. या चाचणी मध्ये जवळ-जवळ 60 जणावर प्रयोग करण्यात आला आहे.या मध्ये डोके खाली झुकवणे, उभे राहून खाली बसणे आणि उभे राहून पाठीवर झोपणे अशा क्रिया या चाचणी मध्ये करण्यात आल्या आहेत.
या चाचणी मध्ये ब्रेनफ्लोचे प्रमाण 84 ते 91 ऐवढ्या रक्तप्रवाहाचे निदान करण्यात आले आहे. सर्वात लक्षणीय परिणाम डोके खाली झुकवण्याच्या आव्हानातून आले असून जिथे Temple चा मेंदूशी असलेला सहसंबंध 91 इतका आहे. तर टाळूशी असलेला सहसंबंध फक्त 49 एवढा आहे.
मेंदूतीत होणाऱ्य मुख्य रक्तप्रवाह (सेरेब्रल ब्लड फ्लो) दिर्घायुष्यासाठी प्रयत्न करणारे लोक आधीपासून करत असलेल्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देतात. एरोबिक व्यायामाने तो वाढतो आणि VO2max त्याच्याशी थेट संबंधित असतो.तर थंडीच्या संपर्कात आल्याने तो वाढतो. ध्यानाने तो वाढतो. या मध्ये चांगली झोप मिळते, जास्त वेळ बसल्यास ते कमी होते. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास ते कमी होते. तुमचे शरीर प्रत्यक्षात किती चांगल्या प्रकारे कार्य करत आहे आणि वृद्ध होत आहे, हे दर्शवणाऱ्या सर्वात संवेदनशील आणि एकात्मिक बायोमार्करपैकी हे एक आहे.
हे Temple चिप मनगटावर न बांधता कपाळावरील एका बाजूला लावले जाते. हे सामान्यता एका स्मार्टवॉचसारखे आहे. ते केवळ हार्ट रेट किंवा पावले मोजत नाही, तर हे मेंदूतील रक्तप्रवाह आणि शरीराची चयापचय मागणी रिअल-टाईममध्ये ट्रॅक करते. याची किंमत मार्केटमध्ये याची अंदाजे किंमत 72, 000 ते 80, 000 हजारांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.
boAt ने आणले AI ईयरबड्स! Google Gemini मुळे आता इअरफोन स्वतःहून सगळं करणार; काय आहे CREST फीचर?






