Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! डिजिटल अरेस्टमध्ये वापरले जाणारे ‘डिव्हाइस आयडी’ होणार ब्लॉक, व्हॉट्सअ‍ॅपला दिले ‘हे’ निर्देश

स्कॅम, फ्रॉड आणि डिजीटल अरेस्ट सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत असते. यासाठी वेळोवेळी अलर्ट देखील जारी केला जात असतो. आता केंद्री सरकारने याबाबत कठोर निर्णय घेतला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 22, 2026 | 09:45 AM
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! डिजिटल अरेस्टमध्ये वापरले जाणारे 'डिव्हाइस आयडी' होणार ब्लॉक, व्हॉट्सअ‍ॅप दिले 'हे' निर्देश

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! डिजिटल अरेस्टमध्ये वापरले जाणारे 'डिव्हाइस आयडी' होणार ब्लॉक, व्हॉट्सअ‍ॅप दिले 'हे' निर्देश

Follow Us
Follow Us:
  • ‘डिजिटल अरेस्ट’ सारख्या स्कॅममध्ये वापरले जाणारे ‘डिव्हाइस आयडी’ होणार ब्लॉक
  • गृह मंत्रालयाच्या उच्चस्तरीय आंतर-विभागीय समितीने व्हॉट्सअ‍ॅपला दिले निर्देश
  • व्हॉट्सअ‍ॅपनेही सूचना लागू करण्यास संमती
स्कॅम, फ्रॉड, खोटे मेसेज, बनावट लिंक आणि डिजीटल अरेस्टसारख्या घटनांमध्ये गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे सर्व स्कॅम सहसा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे केले जातात. विशेषत: डिजीटल अरेस्ट. लोकांना फसवण्यासाठी, घाबरवण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी स्कॅमर्स बनावट पोलीस किंवा सरकारी अधिकारी बनवून लोकांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे व्हिडीओ कॉल करतात. यानंतर स्कॅमर्स लोकांना खोट्या गुन्हांमध्ये अडकवून डिजीटल पद्धतीने नजर कैदेत ठेवतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी प्रयत्न करतात. यालाच डिजीटील अरेस्ट म्हणतात. आता याच घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आहे.

Free Fire Max: स्पिन करा आणि जिंका प्रिमियम रिवॉर्ड्स, गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची धमाकेदार एंट्री

येत्या काळात हॉट्सअ‍ॅपवर ‘डिजिटल अरेस्ट’ सारख्या स्कॅममध्ये वापरले जाणारे ‘डिव्हाइस आयडी’ ब्लॉक केले जाऊ शकतात. याशिवाय, स्काईपप्रमाणे सुरक्षा फीचर्स लागू करणे आणि धोकादायक एपीके फाइल्स ओळखून त्या ब्लॉक करणे यांसारखी वैशिष्ट्‌येही आणली जाऊ शकतात. गृह मंत्रालयाच्या उच्चस्तरीय आंतर-विभागीय समितीने व्हॉट्सअ‍ॅपला निर्देश दिले आहेत. डिजिटल अरेस्टसारख्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर काही फीचर्स असणे आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे. व्हॉट्सअ‍ॅपनेही या सूचना लागू करण्यास संमती दर्शवली असून काही फीचर्सवर काम सुरू झाले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या समितीच्या तिसऱ्या बैठकीत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. (फोटो सौजन्य – Pinterest) 

३० दिवसांत मागवला प्रस्ताव

व्हॉट्सअ‍ॅपला या नवीन फीचर्सबाबत ३० दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आहेत. याशिवाय, डिजिटल अरेस्ट प्रकरणांमध्ये वापरले जाणारे डिव्हाइस आयडी ब्लॉक करण्यासाठी नवीन यंत्रणेबाबत ४५ दिवसांच्या आत स्वतंत्र प्रस्ताव देण्यास सांगण्यात आले आहे. डिजिटल अरेस्ट स्कॅममध्ये स्कॅमर स्वतःला बनावट पोलीस किंवा तपास यंत्रणेचे अधिकारी म्हणून भासवतात आणि पीडित व्यक्तीला घाबरवून विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करायला लावतात. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता, गेल्या वर्षी २८ नोव्हेंबर रोजी दूरसंचार विभागाने एक नवीन नियम जारी केला होता. त्याअंतर्गत व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, सिग्नल आणि स्नॅपचॅट सारख्या अ‍ॅप्सना वापरकत्यांचे खाते एका सक्रिय सिम कार्डशी जोडण्याचे निर्देश दिले होते. व्हॉट्सअ‍ॅप हा नियम पुढील ४ ते ६ महिन्यांत लागू करू शकते.

गॅस-तेलनंतर आता इंटरनेटचा बळी? युद्धामुळे कसा खंडित होऊ शकतो तुमचा डेटा? जाणून घ्या

पाच नवीन फीचर्स येणार

डिवाइस ब्लॉक करणे: डिजिटल अरेस्ट करणाऱ्या आरोपींच्या उपकरणांची (डिवाइस) ओळख पटवून त्यांचे आयडी ब्लॉक करणे.

सुरक्षा फीचर्स: स्काईपप्रमाणे अनेक संरक्षणात्मक फीचर्स व्हॉट्सअ‍ॅपवर लागू करणे.

डेटा सुरक्षा : डिलीट केलेल्या अकाउंटचा वापरकर्ता डेटा किमान १८० दिवसांपर्यंत सुरक्षित ठेवणे.

धोकादायक फाइल्सवर बंदी : धोकादायक एपीके फाइल्स ओळखून त्या ब्लॉक करणारी यंत्रणा विकसित करणे.

एआयचा वापर: बनावट कंटेंट ओळखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) आणि मशीन लर्निंग सिस्टम अधिक मजबूत करणे.

Web Title: Device id which is use for digital arrest may block government give these instruction to whatsapp tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • tech updates
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे
1

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा? अर्ज करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स
2

भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा? अर्ज करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

टायपिंगची गरज संपली! गुगल क्रोममध्ये येतंय ‘Select From Screen’ AI फीचर… यूजर्सचा अनुभव होणार आणखी मजेदार
3

टायपिंगची गरज संपली! गुगल क्रोममध्ये येतंय ‘Select From Screen’ AI फीचर… यूजर्सचा अनुभव होणार आणखी मजेदार

ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका! ‘हे’ लोकप्रिय OPPO स्मार्टफोन झाले महाग; खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
4

ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका! ‘हे’ लोकप्रिय OPPO स्मार्टफोन झाले महाग; खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.