Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI ला कधीही विचारू नका हे 10 प्रश्न, चुकीच्या प्रतिसादांमुळे धोक्यात येऊ शकते तुमची सुरक्षा

चॅटजीपीटी असो किंवा मेटा AI... आपण या AI चॅटबोट्सना रोज शेकडो प्रश्न विचारतो. पण असे काही विषय आणि काही प्रश्न आहेत, ज्याबाबत चॅटजीपीटी किंवा मेटा AI ला विचारण अत्यंत धोकादायक ठरू शकतं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 01, 2025 | 11:28 AM
AI ला कधीही विचारू नका हे 10 प्रश्न, चुकीच्या प्रतिसादांमुळे धोक्यात येऊ शकते तुमची सुरक्षा

AI ला कधीही विचारू नका हे 10 प्रश्न, चुकीच्या प्रतिसादांमुळे धोक्यात येऊ शकते तुमची सुरक्षा

Follow Us
Follow Us:

आपण AI ला रोज अनेक प्रश्न विचारत असतो. जसं की मेल कसा टाईप करायचा ते छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहितीपर्यंत… AI आपल्याला वेगवेगळ्या विषयावरील माहिती देतो. विद्यार्थी असो किंवा ऑफीसला जाणारा नोकरदार वर्ग AI सर्वांसाठी फायद्याचा आहे. चॅटजीपीटी, मेटा आणि जेमिनीसारखे अनेक AI सध्या उपलब्ध आहेत. या AI चा वापर वेबसाईट किंवा अ‍ॅपवरून केला जाऊ शकतो. हे AI अनेकदा गुगलसारख्या पारंपारिक सर्च इंजिनपेक्षा जलद आणि अधिक अनुकूल उत्तरे प्रदान करतात.

BSNL Flash Sale LIVE: सरकारी टेलिकॉम कंपनीचा सेल सुरु! स्वस्तात मिळणार 400GB डेटा, असा घ्या लिमिटेड ऑफरचा फायदा

हल्ली लोकं गुगलचा वापर करण्यापेक्षा AI चा वापर करण्याला अधित प्राधान्य देतात. मात्र असं असलं तरी देखील असे काही विषय आहेत, ज्याबाबत AI ला माहिती विचारण धोकादायक ठरू शकतं. एआय सिस्टम डेटा-चालित असतात आणि काही मर्यादांमध्ये काम करतात. त्यामुळे AI ने दिलेली माहिती प्रत्येकवेळी योग्य असेलच असं नाही. AI विशिष्ट परिस्थितीत अत्यंत विश्वासार्ह असू शकतात, परंतु अचूक नाहीत. आता आम्ही तुम्हाला असे काही प्रश्न सांगणार आहोत, जे AI ला विचारणं धोकादायक ठरू शकतं. AI च्या चुकीच्या प्रतिसादांमुळे महत्त्वपूर्ण धोके निर्माण होऊ शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

संवेदनशील माहिती

अतिशय वैयक्तिक किंवा संवेदनशील माहिती AI ला विचारू नये. जसं की “माझ्या बँक खात्याचा पासवर्ड काय असावा?” किंवा “माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वैयक्तिक माहिती सांगा.” गोपनीयता आणि सुरक्षिततेच्या धोक्यांमुळे एआयने वैयक्तिक डेटा हाताळण्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

बेकायदेशीर अ‍ॅक्टिव्हिटी

बेकायदेशीर अ‍ॅक्टिव्हिटीसंबंधित प्रश्न एआयला विचारणं धोकादायक ठरू शकतं. जसं की “सिस्टम कशी हॅक करायची?” एआय नैतिक आणि कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते आणि बेकायदेशीर अ‍ॅक्टिव्हिटीसाठी मदत करणार नाही.

कायदेशीर सल्ला

वैद्यकीय किंवा कायदेशीर सल्ला एआयकडून घेऊ नये. “मला हा आजार आहे, त्याचा उपचार काय आहे?” किंवा “माझ्या बाबतीत कायदेशीर सल्ला द्या”असे प्रश्न एआयला विचारू नये. कारण एआय हा डॉक्टर किंवा वकिल नाही. विशिष्ट वैद्यकीय किंवा कायदेशीर समस्यांसाठी व्यावसायिक सल्ला घ्यावा.

अनिश्चित घटनांबद्दलचे भाकित

भविष्यात काय होणार आहे, हे एआयला विचारणं आणि त्याप्रमाणे निर्णय घेणं धोकदायक ठरू शकतं. जसं की “२०२६ मध्ये शेअर बाजार कसा कामगिरी करेल?” याच कारण म्हणजेच एआय भविष्यातील घटनांचा अचूक अंदाज लावू शकत नाही, फक्त उपलब्ध डेटाच्या आधारे अंदाज देऊ शकते.

रिअल-टाइम माहिती

अपडेट न केलेली रिअल-टाइम माहिती एआयला विचारू नका. जसं की “सध्या दिल्लीत हवामान कसे आहे?” कारण एआयकडे रिअल-टाइम माहिती मर्यादित असू शकते.

गुंतागुंतीचे प्रश्न

खूप गुंतागुंतीचे किंवा अस्पष्ट प्रश्न विचारल्यास एआय त्याची चुकीची उत्तर देऊ शकतो. जसं की “जीवनाचा अर्थ काय आहे?”

गृहीतकांवर आधारित प्रश्न

चुकीच्या किंवा पक्षपाती गृहीतकांवर आधारित प्रश्न एआयला विचारू नका. उदाहरण: “एखादा विशिष्ट गट नेहमीच चुकीचा का असतो?” एआयला विचारू नका. कारण हे प्रश्न पक्षपात वाढवू शकतात. एआयचे उद्दिष्ट निःपक्षपाती, तथ्य-आधारित उत्तरे देणे आहे.

Price Dropped: डिल मिस करू नका! 1.29 लाखांचा Samsung फोन झाला स्वस्त, असा घ्या सुवर्णसंधीचा फायदा

हानिकारक हेतू

अनैतिक किंवा हानिकारक हेतू असलेले प्रश्न एआयला विचारणे धोकदायक ठरू शकतं. जसं की, “एखाद्याला इजा करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे?” कारण एआय नैतिक तत्त्वांचे पालन करते आणि हानिकारक हेतूंना समर्थन देत नाही.

तांत्रिक प्रश्न

अत्यंत तांत्रिक प्रश्न एआयला विचारू नका. जसं की “क्वांटम क्रिप्टोग्राफीसाठी कोड कसा लिहायचा?” याच कारण म्हणजे अत्यंत विशिष्ट तांत्रिक प्रश्नांसाठी एआयपेक्षा तज्ञांचे ज्ञान आवश्यक असू शकते.

डेटा स्रोतांबद्दल प्रश्न

एआयच्या अंतर्गत कामकाजाबद्दल किंवा डेटा स्रोतांबद्दल प्रश्न विचारू नका. जसं की “तुमच्या डेटासेटमध्ये काय आहे?” किंवा “तुमचा अल्गोरिथम कसा काम करतो?” कारण एआय मॉडेल्सची अंतर्गत कार्यपद्धती गुंतागुंतीची असते आणि सामान्य वापरकर्त्यासाठी ती सामान्यतः उपयुक्त नसते.

Web Title: Do not ask this question to artificial intelligence tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 11:28 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • chatgpt
  • Tech News

संबंधित बातम्या

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव
1

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!
2

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!

WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल… भारतीय यूजर्ससाठी आलं नवं फीचर, असा करा वापर
3

WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल… भारतीय यूजर्ससाठी आलं नवं फीचर, असा करा वापर

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत
4

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.