Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला ईवो वॉल्ट ईव्हेंट... प्रीमियम गन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स
ईवो वॉल्ट ईव्हेंट फ्री फायर मॅक्समध्ये 2 एप्रिलपासून सुरु झाला आहे. हा ईव्हेंट गेममध्ये पुढील महिनाभर सुरु राहणार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स स्पिन करून ईव्हो गन स्किन क्लेम करू शकणार आहेत. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना एमपी 40 क्रोमासोनिक आणि स्कार मेगालोडॉन अल्फा सारख्या गन स्किन मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. ज्यामध्ये इवो गन स्किन आणि इतर रिवॉर्ड्स मोफत मिळणार आहेत. हे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य – YouTube)






