सावधान! बनावट WhatsApp मुळे तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे (Photo Credit- Ai)
वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी मेटाने नुकतेच एक नवीन ‘स्कॅम आणि फ्रॉड प्रोटेक्शन टूल’ (Scam & Fraud Protection Tool) रोल आऊट केले आहे. हे टूल तुमचे व्हॉट्सॲप खाते दुसऱ्या कोणत्याही नवीन डिव्हाइसमध्ये लॉग-इन होताच तत्काळ वॉर्निंग सिस्टम ॲक्टिव्हेट करते. या सुविधेची माहिती देतानाच कंपनीने बनावट व्हॉट्सॲप आवृत्तींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
मेटाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, इटलीतील ‘Asigint’ नावाच्या कंपनीने व्हॉट्सॲपची एक बनावट आवृत्ती तयार केली आहे. या ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत 200 हून अधिक अँड्रॉइड आणि आयफोन युजर्सना लक्ष्य करण्यात आले आहे. सायबर गुन्हेगार ‘सोशल इंजिनीअरिंग’च्या मार्गाचा अवलंब करून लोकांना या जाळ्यात अडकवत आहेत.
अवघ्या काही मिनिटांचा खेळ! Oracle च्या ऑटोनॉमस डेटाबेसमुळे 12000 भारतीयांनी नोकऱ्या का गमावल्या?
बनावट व्हॉट्सॲपमुळे होणारे धोके:
मेटाने स्पष्ट केले आहे की, त्यांचे अधिकृत व्हॉट्सॲप पूर्णपणे सुरक्षित असून त्यात कोणतीही त्रुटी नाही. मात्र, सुरक्षिततेसाठी खालील गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे:
1. अधिकृत स्टोअर: व्हॉट्सॲप नेहमी Google Play Store (अँड्रॉइडसाठी) किंवा Apple App Store (आयफोनसाठी) वरूनच डाऊनलोड करा.
2. प्ले प्रोटेक्ट: अँड्रॉइड युजर्सनी आपल्या फोनमध्ये ‘Play Protect’ फिचर नेहमी इनेबल ठेवावे.
3. थर्ड पार्टी स्टोअर्स टाळा: युरोपियन युनियनमधील नियमांमुळे ॲपलने थर्ड पार्टी मार्केटप्लेसची परवानगी दिली असली, तरी अनोळखी प्लॅटफॉर्मवरून ॲप्स घेणे टाळावे.
अनेकदा व्हॉट्सॲप अपडेट करण्याच्या नावाखाली किंवा ‘पिंक व्हॉट्सॲप’, ‘व्हॉट्सॲप गोल्ड’ अशा नावांनी लिंक्स पाठवल्या जातात. अशा कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. यामध्ये धोकादायक ‘मालवेअर’ किंवा ‘व्हायरस’ असू शकतात, जे तुमच्या फोनमधील डेटा चोरण्याचे काम करतात.






