Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Facebook चे नवे Verified फीचर! आता समजणार समोरचा खरा माणूस की AI? कसं करणार काम? जाणून घ्या

फेसबुकवर वाढत्या AI-जनरेटेड प्रोफाइल्समुळे यूजर्ससमोर खरे आणि बनावट अकाऊंट ओळखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. हीच समस्या सोडवण्यासाठी मेटा आता सामान्य यूजर्ससाठी मोफत Facebook व्हेरिफाईड फीचर आणत असून, सेल्फी व्हिडिओद्वारे मानवी ओळख पडताळली जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 26, 2026 | 12:09 PM
Facebook चे नवे Verified फीचर! आता समजणार समोरचा खरा माणूस की AI? कसं करणार काम? जाणून घ्या

Facebook चे नवे Verified फीचर! आता समजणार समोरचा खरा माणूस की AI? कसं करणार काम? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • Facebook सामान्य यूजर्ससाठी मोफत व्हेरिफाईड बॅज आणत असून सेल्फी व्हिडिओद्वारे प्रोफाइल खऱ्या व्यक्तीचे आहे की नाही, याची पडताळणी केली जाणार आहे.
  • हा बॅज प्रोफाइल, मार्केटप्लेस, डेटिंग आणि ग्रुप्स मध्ये दिसणार असून भविष्यात फीड पोस्ट्स मध्येही दाखवण्याची मेटाची योजना आहे.
  • व्हेरिफाईड बॅज मिळाल्याने प्रोफाइल खऱ्या व्यक्तीचे असल्याचे स्पष्ट होईल, मात्र त्या व्यक्तीच्या वर्तनाची किंवा विश्वासार्हतेची हमी फेसबुक देणार नाही.
फेसबुकचे लाखो करोडो यूजर्स आहेत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात AI प्राफोईलचा देखील समावेश आहे. आपण एखाद्या नवीन युजरसोबत फेसबुकवर मैत्री करतो. मात्र आपल्याला समजत नाही की आपण ज्या व्यक्तीसोबत बोलत आहोत तो एखादा माणूस आहे की एआय जनरेटेड प्रोफाईल? यूजर्सची हीच समस्या लक्षात घेऊन आता फेसबुक एका नवीन फीचरवर काम करत आहे. या फीचरमध्ये यूजर्सना समजणार आहे की, आपण ज्या प्रोफाईल सोबत बोलत आहोत तो खरच एखादा माणूस आहे केवळ एक एआय जनरेटेड प्रोफाईल. यासाठी फेसबुकने फेसबुक व्हेरिफाईड लाँच केले आहे. हे एक फ्री वेरिफिकेशन बॅज आहे, ज्याला युजर्स एक सेल्फी व्हिडिओ चेक पूर्ण करून मिळवू शकता.

AI इन्फ्लुएंसर्सची क्रेझ वाढली! Myntra आणि Lenskart ब्रँड्सची पहिली पसंती ठरले वर्चुअल स्टार्स, सोशल मीडियाचे जग बदलणार?

नवीन बॅजचा उद्देश

आर्टिफिशियल इंटेलिजेंस टूल्सने फेक प्रोफाइल्स, रियलिस्टिक इमेजेस आणि ऑटोमेटेड संभाषण अधिक सोपे झाले आहे आणि यामुळे धोके देखील वाढले आहेत. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन आता फेसबुकने महत्त्वाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकचं असं म्हणणं आहे की, नवीन बॅजचा असा उद्देश आहे की ऑनलाइन संभाषण अधिक विश्वसनीय आणि सुरक्षित व्हावे. विशेषतः अशा ठिकाणी जिथे लोकं अनोळखी व्यक्तींसोबत मैत्री करतात आणि संभाषण करतात. (फोटो सौजन्य – AI Created) 

पूर्ण करावी लागणार ही प्रक्रिया

ट्रेडिशनल व्हेरिफिकेशन बॅज जे विशेषतः पब्लिक फिगर्स किंवा पेड सबस्क्रीप्शन संबंधित होते. या उलट आता कंपनी सामान्य यूजर्ससाठी फेसबुक व्हेरिफाइड बॅज घेऊन आली आहे. हे बॅज मिळवण्यासाठी युजर्सना एक छोटा सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागेल. यानंतर तुम्ही पाठवलेल्या व्हिडिओची तुमच्या प्रोफाईलसोबत तुलना केली जाईल, ज्यामुळे समजू शकते ही अकाउंट एखाद्या माणसाचे आहे की केवळ एआय जनरेटेड आहे.

व्हेरिफिकेशन प्रोसेस

ही व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्णपणे मोफत आहे आणि यामध्ये सहसा केवळ काही मिनिटांचाच वेळ लागणार आहे. वापरकर्त्यांनी फेसबुकच्या ‘विश्वास आणि सुरक्षा’ निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे; यामध्ये फसवणूक, घोटाळे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कपटपूर्ण वर्तनाचा कोणताही पूर्व-इतिहास नसणे समाविष्ट आहे. हे पिक्चर 18 वर्ष आणि त्यावरील यूजर्ससाठी उपलब्ध असणार आहे. हे फीचर फेसबुक व्हेरिफाइड पेजेस किंवा प्रोफेशनल मोडचा वापर करणाऱ्या प्रोफाईलसाठी उपलब्ध केले जाणार नाही.

फीड पोस्ट्सपर्यंत बॅजची दृश्यमानता वाढवण्याची फेसबूकची योजना

एकदा अकाऊंट व्हेरिफाय झाल्यानंतर व्यक्तीची ओळख जाणून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी हा बॅज दिसेल. यूजर्स हा बॅज प्रोफाइल्स, फेसबुक मार्केटप्लेस लिस्टिंग्स, डेटींग प्रोफाइल्स आणि ग्रुपसमध्ये पाहू शकणार आहेत. भविष्यात फीड पोस्ट्सपर्यंत या बॅजची दृश्यमानता वाढवण्याची फेसबूकची योजना आहे.

कंपनीचं असं म्हणणं आहे की, यूजर्सना केवळ एकदाच व्हेरिफिकेशन पूर्ण करावे लागणार आहे. यानंतर कोणत्याही सब्सक्रिप्शन चार्जशिवाय बॅज फेसबुक सपोर्टेड सेक्शन्समध्ये दिसणार आहे. उदाहरणार्थ, मार्केटप्लेस सूची पाहणारी, डेटिंगवर संभाव्य जोडीदाराशी चॅट करणारी किंवा ग्रुप चर्चेत सामील होणारी व्यक्ती हे पाहू शकेल की अकाऊंट धारकाने ह्यूमन वेरिफिकेशन पूर्ण केले आहे की नाही.

Jio VS Airtel: जिओचा 999 रुपयांचा प्लॅन की एअरटेलचा 899 रुपयांचा प्लॅन? डेटा आणि आणि ओटीटी फायद्यांमध्ये कोण आहे भारी?

फेसबुकने काय सांगितलं?

लक्षात ठेवा की, बॅज हे सिद्ध करत असला की अकाऊंट एका खऱ्या व्यक्तीचे आहे, तरी फेसबुकने स्पष्ट केलं आहे की, याचा अर्थ असा नाही की, प्लॅटफॉर्म त्या यूजरचे समर्थन करते किंवा त्याच्या व्यवहाराची हमी देते. व्हेरिफाईड अकाऊंट्सना देखील फेसबुकच्या कम्युनिटी स्टँडर्ड्स आणि कॉमर्स पॉलिसीचे पालन करावे लागणार आहे. फेसबूकचं असं म्हणणं आहे की, फेसबुक व्हेरिफाईड बॅजचा अर्थ असा आहे की, एखादे प्रोफाईल एका खऱ्या व्यक्तीचे आहे, ज्याने सेल्फी वेरिफिकेशन पूर्ण केले आहे आणि आमच्या विश्वास व सुरक्षिततेच्या मानकांची पूर्तता केली आहे.

Web Title: Facebook free verified badge for users how it helps identify real people and ai profiles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • Facebook
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

UPI मध्ये मोठा बदल! आता इंटरनेटशिवायही करता येणार डिजिटल पेमेंट? जाणून घ्या कसं
1

UPI मध्ये मोठा बदल! आता इंटरनेटशिवायही करता येणार डिजिटल पेमेंट? जाणून घ्या कसं

AI इन्फ्लुएंसर्सची क्रेझ वाढली! Myntra आणि Lenskart ब्रँड्सची पहिली पसंती ठरले वर्चुअल स्टार्स, सोशल मीडियाचे जग बदलणार?
2

AI इन्फ्लुएंसर्सची क्रेझ वाढली! Myntra आणि Lenskart ब्रँड्सची पहिली पसंती ठरले वर्चुअल स्टार्स, सोशल मीडियाचे जग बदलणार?

WhatsApp Update: व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव बदलणार! iPhone यूजर्सना मिळणार नवं अपडेट, आता iMessage सारखा असणार चॅटचा लूक
3

WhatsApp Update: व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव बदलणार! iPhone यूजर्सना मिळणार नवं अपडेट, आता iMessage सारखा असणार चॅटचा लूक

Jio VS Airtel: जिओचा 999 रुपयांचा प्लॅन की एअरटेलचा 899 रुपयांचा प्लॅन? डेटा आणि आणि ओटीटी फायद्यांमध्ये कोण आहे भारी?
4

Jio VS Airtel: जिओचा 999 रुपयांचा प्लॅन की एअरटेलचा 899 रुपयांचा प्लॅन? डेटा आणि आणि ओटीटी फायद्यांमध्ये कोण आहे भारी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.