Jio VS Airtel: जिओचा 999 रुपयांचा प्लॅन की एअरटेलचा 899 रुपयांचा प्लॅन? डेटा आणि आणि ओटीटी फायद्यांमध्ये कोण आहे भारी?
जर तुमच्याकडे जिओचे सिम असेल आणि तुम्ही दिर्घकाळ व्हॅलिडीटी असलेला रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर 999 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 98 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना रोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. ही डेटा लिमिट संपल्यानंतर डेटा स्पीड 64Kbps होणार आहे. ही योजना ‘जिओ ट्रू 5G’ कव्हरेज असलेल्या क्षेत्रांमधील पात्र यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटा देखील देते. (फोटो सौजन्य: Pinterest)
डेटा फायद्यांव्यतिरिक्त तुम्हाला या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि डेली 100 एसएमएस देखील मिळणार आहेत. याशिवाय, रिचार्ज प्लॅनमध्ये तीन महिन्यांचे जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन आणि 50GB फ्री जीओएआयक्लॉउड स्टोरेज देखील मिळणार आहे. जिओ प्लॅनसोबतच 18 महिन्यांचे गुगल जेमिनी प्रो सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे, ज्याची किंमत 35,100 रुपये होणार आहे. यासोबतच 5TB क्लाउड स्टोरेज आणि दूसरे AI फीचर्स देखील मिळणार आहे.
दुसरीकडे, एअरटेलचा 899 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 84 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना रोज डेली 1.5GB हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps होणार आहे. सब्सक्राइबर्सना या प्लॅनसोबत, अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये 100 एसमएसचा फायदा देखील मिळणार आहे. मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक एसटीडी एसएमएससाठी 1.5 रुपये चार्जेस आकारले जाईल. या रिचार्ज प्लॅनमध्ये फ्री हेलो ट्यून्स देखील मिळणार आहे, ज्यामुळे यूजर्स कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय 30 दिवसांसाठी एक ट्यून सेट करू शकतात. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड 64 Kbps होणार आहे.
जर तुम्हाला पैशांची बचत करायची असेल तर तुम्ही एअरटेलच्या 899 रुपयांच्या प्लॅनची निवड करू शकता. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, रोज 1.5GB डेटा आणि 100 एसएमएस ऑफर केले जाणार आहेत. तर जिओच्या 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला बेसिक कॉलिंग आणि डेटा बेनिफिट्ससह एंटरटेनमेंट आणि AI फीचर्स ऑफर केले जाणार आहे.






