Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Scam Alert: IRCTC च्या नावाने सुरू आहे स्कॅम! गृह मंत्रालयाने जारी केला अलर्ट; तिकीट बुक करण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी

IRCTC द्वारे तिकीट किंवा हेलिकॉप्टर बुकिंग करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. गृह मंत्रालयाच्या I4C (भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र) ने आयआरसीटीसीच्या नावाने सुरू असलेल्या बनावट वेबसाइट्सबाबत अलर्ट जारी केला असून, नागरिकांनी बुकिंगपूर्वी वेबसाइटची सत्यता तपासण्याचे आवाहन केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 30, 2026 | 01:19 PM
Scam Alert: IRCTC च्या नावाने सुरू आहे स्कॅम! गृह मंत्रालयाने जारी केला अलर्ट; तिकीट बुक करण्यापूर्वी नक्की तपासा 'या' गोष्टी

Scam Alert: IRCTC च्या नावाने सुरू आहे स्कॅम! गृह मंत्रालयाने जारी केला अलर्ट; तिकीट बुक करण्यापूर्वी नक्की तपासा 'या' गोष्टी

Follow Us
Follow Us:
  • I4C ने IRCTC च्या नावाने सुरू असलेल्या बनावट हेलिकॉप्टर बुकिंग वेबसाइट्सबाबत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
  • सायबर गुन्हेगार फेक वेबसाइट्स आणि दिशाभूल करणाऱ्या लिंकद्वारे यात्रेकरूंची आर्थिक फसवणूक करत आहेत.
  • तिकीट बुक करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइट, यूआरएल आणि डोमेनची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे.
तुम्ही देखील प्रवासाच्या तिकीट बुक करण्यासाठी आयआरसीटीसीचा वापर करता का? तुमच्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. सायबर गुन्हेगारांनी आयआरसीटीसीच्या खोट्या वेबसाईट तयार केल्या असून आता या वेबसाईटद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे. खोट्या आणि बनावट वेबसाईटद्वारे भाविकांना हेलिकॉप्टर बुकींग आणि सर्विसच्या नावाखाली लुटले जात आहे. याबाबत आता गृह मंत्रालयाच्या सायबर सिक्योरिटी विंग I4C ने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच लोकांना तिकीट बुक करण्यापूर्वी वेबसाईट तपासण्याचा देखील सल्ला दिला आहे.

Upcoming Smartphones: टेक बाजारात होणार धमाका! जुलै महिन्यात लाँच होणार एकापेक्षा एक पावरफुल स्मार्टफोन्स; असे असू शकतात फीचर्स

बनावट आयआरसीटीसी वेबसाईटद्वारे केली जातेय लोकांची फसवणूक

I4C सायबर दोस्तने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लोकांना सावध राहण्यास सांगितलं आहे. सायबर दोस्तने सांगितलं आहे की, सायबर गुन्हेगार बनावट बुकिंग वेबसाईट आणि दिशाभूल करणाऱ्या लिंक्सद्वारे लोकांची फसवणूक करत आहे. बनावट बुकिंग वेबसाईट आणि दिशाभूल करणाऱ्या लिंक्सद्वारे लोकांना बनावट प्रवास सेवा, हेलिकॉप्टर बुकिंग आणि पेमेंट स्कॅमचे शिकार बनवले जात आहे. अशा परिस्थितीत लोकांनी सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच तुम्हाला अशा वेबसाईट आढळल्या तर तुम्ही सायबर क्राइम हेल्पलाइन नंबरवर तक्रार दाखल करू शकता. (फोटो सौजन्य: istock)

⚠️ सावधान! नकली websites के जरिए cyber fraud से बचें Cyber criminals fake booking websites और misleading links के ज़रिए लोगों को फर्जी यात्रा सेवाओं, helicopter bookings और payment scams का शिकार बना सकते हैं pic.twitter.com/HN1kjKqYQj — CyberDost I4C (@Cyberdost) June 28, 2026

हेलिकॉप्टर बुकींगच्या नावाखाली सुरु आहे लोकांची फसवणूक

सायबर गुन्हेगार खोट्या हेलिकॉप्टर बुकींगच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहे आणि त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत. खरं तर, 3 जुलैपासून ‘बाबा बर्फानी’ यांची तीर्थयात्रा असलेली अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेसाठी यात्रेकरूंची तिकीट बुक करण्याची लगबग सुरु आहे. याच परिस्थितीचा फायदा घेऊन, आता सायबर गुन्हेगार यात्रेकरूंना लक्ष्य करत आहेत आणि त्यांची फसवणूक करत आहे.

या आहेत बनावट वेबसाईट्स

I4C सायबर दोस्तने शेअर केलेल्या एक्स पोस्टमध्ये दोन खोट्या आणि बनावट वेबसाईट्सच्या नावांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये irctchelicopter.com आणि irctchellyatra.com यांचा समावेश आहे. या दोन वेबसाईटद्वारे लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे लोकांना या वेबसाईट्सपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तिकीट बुक करताना नेहमी अधिकृत वेबसाईटचा वापर करा. काही संशयास्पद आढळल्यास व्यवहार त्वरित थांबवा.

GTA 6 ची प्री-ऑर्डर बुकिंग सुरु! भारतात किती असणार किंमत? काय असणार खास? जाणून घ्या

तिकीट बुक करण्यापूर्वी तपासा ‘या’ गोष्टी

  • सरकारी वेबसाईटच्या शेवटी .gov.in लिहीलेले असते. त्यामुळे ज्या वेबसाईट्स सरकारी असल्याचा दावा करतात, पण त्यांच्या अखेरीस .gov.in लिहीलेले नसेल तर त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. तुमची फसवणूक होऊ शकते.
  • पर्यटन संबंधित बुकींग नेहमी संबंधित विभागाची वेबसाईट किंवा अधिकृत पोर्टलद्वारे करा.
  • बुकींग डिटेल्स एंटर करण्यापूर्वी सर्वात आधी यूआरएल तपासा. खोट्या आणि बनावट वेबसाईटच्या यूआरएलमध्ये तुम्हाला बऱ्याच चुका आढळतील.
  • कधीही सोशल मीडिया आणि गूगल द्वारे स्पॉन्सर्ड लिंकवर क्लिक करू नका आणि अशा लिंकवर विश्वास देखील ठेऊ नका.
  • स्वस्त ऑफर्स आणि तातडीची पुष्टी करणाऱ्या लिंकवर क्लिक करू नका, कारण हे सायबर गुन्हेगारांचे जाळ असते.
  • जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या सायबर स्कॅमबाबत संशय असेल तर तुम्ही हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करू शकता किंवा cybercrime.gov.in वेबसाईटवर रिपोर्ट करू शकता.

Web Title: Fake irctc websites target pilgrims government issues cyber warning to stay alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • cyber scam
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
2

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
4

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.