Father’s Day 2025: आपल्या बाबांना गिफ्ट करा हे जबरदस्त कॅमेरा स्मार्टफोन्स, किंमत 25,000 हून कमी
Father’s Day 2025 Marathi News: 15 जून रोजी म्हणजेच उद्या फादर्स डे साजरा केला जाणार आहे. फादर्स डे ला आपल्या वडीलांना काय गिफ्ट द्यावं, याबाबत अजूनही अनेकांच्या मनात गोंधळ आहे. तुम्ही देखील अशाच गिफ्टच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता आम्ही तुम्हाला अशा 5 स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, जे यंदाच्या फादर्स डे ला तुम्ही तुमच्या वडीलांना गिफ्ट करू शकता. हे स्मार्टफोन्स आकर्षक डिझाईन, स्टाइलिश कॅमेरा, बॅटरी आणि परफॉर्मेंस सर्वच बाबतीत उत्तम आहेत. या स्मार्टफोनची किंमत देखील 25 हजारांहून कमी आहे. चला तर मग या स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊया.
Father’s Day 2025: यंदाच्या फादर्स डे ला आपल्या वडीलांना करा खुश, गिफ्ट करा हे Useful Gadgets
या स्मार्टफोनची किंमत 24,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये आकर्षक डिझाईन आणि प्रीमियम लुक देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.77 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे आणि हा स्मार्टफोन Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसरवर आधारित आहे. फोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 50MP(2x) टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. शिवाय 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
या स्मार्टफोनची किंमत 24,928 रुपये आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. यामध्ये MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 50MP चा प्रायमरी आणि 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा आहे. फोनमध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनची किंमत 22,999 रुपये आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.5 इंच Super AMOLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये Exynos 1380 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 13MP कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनची किंमत 23,999 रुपये आहे. या फोनमध्ये 6.7 इंच AMOLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 6500mAh बॅटरी देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनची किंमत 20,990 रुपये आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.77 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसरवर आधारित आहे. फोनमध्ये 50MP डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 7300mAh बॅटरी देण्यात आली आहे.