AC Temperature New Rule: केंद्र सरकारने AC साठी लागू केले नियम! आता 20 डिग्रीहून कमी नाही होणार तापमान
देशभरातील हवामानाचा अंदाज लावणं फार कठीण आहे. कारण कधी सकाळी ऊन तर रात्री पाऊस, अशी परस्थिती भारतात निर्माण झाली आहे. या दमट वातावरणामुळे उष्णता प्रचंड वाढली आहे. उष्णतेच्या काळात लोकांचा सर्वात मोठा आधार म्हणजे एसी. आता केंद्र सरकारने एसीबाबतच काही घोषणा केल्या आहेत.
Samsung करणार मोठा धमाका! लवकरच लाँच करणार पहिला ट्राय-फोल्ड स्मार्टफोन, किंमतही आली समोर
एसीचा वापर करणाऱ्या लोकांसाठी केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी एक नवीन योजना सुरु करण्याचा विचार केला आहे. केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे की, आता एसीचं तापमान प्रमाणित केलं जाणार आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ऊर्जा संरक्षण, वीज वापरातील घट आणि पर्यावरण संतुलन लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
केंद्रीय मंत्री यांनी सांगितलं आहे की, आता नवीन एयर कंडीशनरचे कमीत कमी तापमान 20 डिग्री सेल्सियस आणि जास्तीत जास्त तापमान 28 डिग्री सेल्सियस असणार आहे. घरे आणि कार्यालयांव्यतिरिक्त, हे तापमान कार एसींसाठी देखील निश्चित केले जाईल. त्यांनी सांगितले की याचा उद्देश अनावश्यक वीज वापर कमी करणे आहे. याशिवाय सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी देखील मदत होणार आहे.
केंद्रीय ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे, तसेच हा नवीन नियम लागू करणे का गरजेचं आहे, याबाबत सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की, देशभरातील एअर कंडिशनरची संख्या सुमारे 10 कोटी आहे. आपल्या देशात दरवर्षी 1.5 कोटी नवीन एसी खरेदी केले जातात. जर एअर कंडिशनरचे तापमान एक अंश सेल्सिअसने कमी केले तर वीजेचा वापर 6 टक्के वाढू शकतो, असं संशोधनातून समोर आलं आहे. म्हणून, नवीन एअर कंडिशनरमध्ये अशी व्यवस्था केली जाईल की किमान तापमान 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि कमाल तापमान 28 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त करता येणार नाही. त्यामुळे वीजेचा वापर देखील वाढणार नाही.
केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सांगितलं आहे की, एसीचे तापमान स्टँडर्डाइजेशन करण्याची तरतूद आखली जात आहे. हे नियम लवकरच लागू केले जाणार आहेत. नवीन नियम लागू केल्यानंतर एसीचे तापमान 20 अंश ते 28 अंशांच्या दरम्यान असेल. याचा अर्थ असा की तुम्ही ते वातावरण थंड होण्यासाठी 20 अंशांपेक्षा कमी आणि वातावरण गरम होण्यासाठी 28 अंशांपेक्षा जास्त तापमानावर एसी सेट करू शकत नाही. हा एक प्रकारचा प्रयोग आहे आणि आम्ही तो पहिल्यांदाच सुरू करत आहोत.