Father's Day 2025: यंदाच्या फादर्स डे ला आपल्या वडीलांना करा खुश, गिफ्ट करा हे Useful Gadgets
Father’s Day 2025 Marathi News: यंदा 15 जून रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी मुलं त्यांच्या वडीलांना भेटवस्तू देतात. आपल्या वडीलांना कामी येतील आणि त्यांच्या रोजच्या जीवनात उपयोगी पडतील, अशा भेटवस्तू तुम्ही देखील शोधत आहात का? तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. आता आम्ही तुम्हाला अशा काही गॅझेट्सबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही तुमच्या वडीलांना गिफ्ट देऊ शकते. हे असे गॅझेट्स जे तुमच्या वडीलांना त्यांच्या रोजच्या जीवनात फायद्याचे ठरणार आहेत. चला तर मग अशा काही फायदेशीर गॅझेट्सबद्दल आपण जाणून घेऊया.
11 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच झाला हा नवीन 5G Smartphone, AI फीचर्स आणि 120Hz डिस्प्लेने सुसज्ज
यंदाच्या फादर्स डे ला तुम्ही तुमच्या वडीलांना स्पीकर गिफ्ट करू शकता. गॅडप्रो चा हा CYBER 200H स्पीकर तुमच्या वडीलांना गिफ्ट देण्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे. हे डिव्हाईस बिल्ट-इन ट्विन सबवूफर्स आणि 24W स्पीकरसह येते. याची साऊंड क्वालिटी देखील कमाल आहे. तुम्ही हा स्पीकर कंपनीच्या वेबसाईटवरून 1,999 रुपयांना खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य: Pinterest)
तुमचं बजेट कमी असेल तरी चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही कमी बजेटमध्ये देखील एक उत्तम गिफ्ट तुमच्या वडीलांसाठी खरेदी करू शकता. इन्फायरचा हा पोर्टेबल स्पीकर 12W साउंड आउटपुट आणि 8 तासांचा प्लेबॅक टाइम ऑफर करतो. यासबोतच या पोर्टेबल स्पीकरमध्ये टीडब्ल्यूएस फंक्शन, मोबाईल होल्डर आणि टाईप सी चार्जिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. अॅमेझॉन आणि कंपनीच्या वेबसाईटवरून हा स्पिकर 749 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
प्रोमेटचे हेडफोन्स हायब्रिड अॅक्टिव नॉइस कँसलेशनसह येतात. यामध्ये डिटॅचेबल मॅग्नेटिक एलसीडी टच स्क्रीन कंट्रोलकर देखील देण्यात आला आहे, ज्यामुळे याचा वापर करणं अत्यंत सोपं होतं. हे हेडफोन्स 50 तासांचा प्लेबॅक टाईम ऑफर करतात. हे डिव्हाईस डुअल मोड कनेक्टिविटीला सपोर्ट करतात. अॅमेझॉनवरून तुम्ही हे हेडफोन्स 6,999 रुपयांना खरेदी करू शकता.
यंदा फादर्स डे निमित्त तुम्ही तुमच्या वडीलांना पावर बँक देखील गिफ्ट करू शकता. या पावर बँकच्या मदतीने फोन अगदी सहज चार्ज केला जाऊ शकतो. हे डिव्हाईस 10,000 mAh ची पावर बँक 22.5W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि एक यूएसबी आउटपुट, एक माइक्रो यूएसबी इनपुट, टाइप सी (इनपुट और आउटपुट) सह येते. हे डिव्हाईस तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवरून 1,299 रुपयांना खरेदी करू शकता.
WWDC 2025: Apple CarPlay साठी लाँच केले 3 नवीन फीचर्स, लाईव्ह अॅक्टिव्हिटीजसह होणार हे मोठे बदल
या पावर बँकचा आकार फार छोटा आहे. हे खिशात अगदी सहज राहू शकते. हे डिव्हाईस 20,000 mAh ची पावर बँक 22.5W सुपर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे डिव्हाईस तुम्ही 1,599 रुपयांना खरेदी करू शकता.