11 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच झाला हा नवीन 5G Smartphone, AI फीचर्स आणि 120Hz डिस्प्लेने सुसज्ज
तुम्ही नवीन आणि स्वस्त स्मार्टफोनच्या शोधात आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्मार्टफोन कंपनी itel ने त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 11 हजार रुपयांहून कमी आहे. त्यामुळे स्वस्त आणि चांगल्या स्मार्टफोनच्या शोधात असाल तर itel ने लाँच केलेला नवा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे.
itel ने भारतात नवीन एंट्री-लेवल स्मार्टफोन Itel ZENO 5G+ लाँच केला आहे. हा नवीन लेटेस्ट बजेट AI फोन आहे. ज्यामध्ये Ask AI, ट्रांसलेटर, टेक्स्ट जनरेटर, ग्रामर आणि स्मार्ट समराइजेशन सारखे अनेक AI टूल्स देण्यात आले आहेत. itel ने लाँच केलेला नवा स्मार्टफोन 50MP AI रियर कॅमेरा, IP54 रेटिंग, 5000mAh बॅटरी आणि अनेक खास फीचर्सनी सुसज्ज आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि त्याच्या इतर स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
The all-new ZENO 5G has finally landed in the Zeno Universe 💫
We’re talking lightning-fast 5G speed and top-notch durability with IP54 water & dust protection because life (and adventures!) happens. But that’s not all!! The real magic begins with our very own AI voice… pic.twitter.com/w9YjW153F3
— itel India (@itel_india) June 10, 2025
itel ZENO 5G+ ची किंमत 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी 10,299 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ग्राहक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवरून खरेदी करू शकतात. इथे या स्मार्टफोनच्या खरेदीवर 1000 रुपयांचं कूपन डिस्काऊंट देण्यात आलं आहे. यामुळे स्मार्टफोनची किंमत 9,299 रुपये होऊ शकते.
itel ZENO 5G+ मध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्याला 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज ऑप्शनसह जोडण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन 5G 10 SA आणि NSA बँड्सला सपोर्ट करतो. फोनमध्ये 6.7-इंच HD+ डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP AI रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
itel ZENO 5G+ मध्ये IP54 रेटिंग आहे, जो डस्ट आणि वॉटर प्रोटेक्शन ऑफर करते. फोनला पावर देण्यासाठी कंपनीने 5000mAh बॅटरी दिली आहे. जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनचं सर्वात खास फीचर म्हणजे याचं पर्सनल AI असिस्टेंट AIVANA आहे. जे युजर्सना त्यांच्या बऱ्याच कामात मदत करणार आहे.