Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flip vs Fold Phone: स्टायलिश फ्लिप की मोठ्या स्क्रीनचा फोल्ड? कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट? जाणून घ्या दोन्हीतील फरक

फोल्डेबल स्मार्टफोनची लोकप्रियता सध्या झपाट्याने वाढत आहे. Flip आणि Fold या दोन्ही प्रकारच्या फोनमध्ये वेगवेगळे फीचर्स आणि डिझाईन दिले जात असल्यामुळे यूजर्समध्ये मोठी उत्सुकता आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 10, 2026 | 02:39 PM
Flip vs Fold Phone: स्टायलिश फ्लिप की मोठ्या स्क्रीनचा फोल्ड? कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट? जाणून घ्या दोन्हीतील फरक

Flip vs Fold Phone: स्टायलिश फ्लिप की मोठ्या स्क्रीनचा फोल्ड? कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट? जाणून घ्या दोन्हीतील फरक

Follow Us
Follow Us:
  • Flip फोन कॉम्पॅक्ट आणि स्टायलिश डिझाईनसाठी ओळखले जातात.
  • Fold फोन मोठ्या स्क्रीन आणि मल्टिटास्किंगसाठी फायदेशीर ठरतात.
  • Fold स्मार्टफोन सामान्यतः Flip फोनपेक्षा अधिक महाग असतात.
सध्या तरुणांमध्ये फोल्डेबल स्मार्टफोनची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सामान्य स्मार्टफोन खरेदी करण्यापेक्षा हल्ली अनेकजण फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करण्याला प्राधान्य देतात. फोल्डेबल स्मार्टफोनचे मुख्य दोन प्रकार असतात. यामध्ये फ्लिप फोन आणि फोल्ड फोन यांचा समावेश आहे. हे दोन्ही एका अनोख्या डिझाईनने सुसज्ज असतात. मात्र या दोन्ही फोनमध्ये काही फरक असतो. हाच फरक आता जाणून घेऊया.

स्मार्ट रिंगनंतर आता Smart Earrings ची चर्चा; कानातलेच ठेवणार हार्ट रेट, झोप आणि हेल्थवर नजर… अशी आहे नवी टेक्नॉलॉजी

फ्लिप फोन

सर्वात आधी फ्लिप फोनबद्दल जाणून घेऊया. फ्लिप फोनचे डिझाईन जुन्या क्लॅमशेल फोनसारखे आहे. हा फोन वर – खाली फोल्ड केला जातो. जेव्हा तुम्ही हा फोन बंद करता म्हणजेच फोल्ड करता तेव्हा तो खूप छोटा दिसतो आणि कॉम्पॅक्ट होतो. यामुळे हा फोन खिशात ठेवणं देखील सोपं होतं. उदाहरणार्थ, Samsung Galaxy Z Flip सीरीज याच कॅटेगरीमध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये एक छोटा आउटर डिस्प्ले देखील दिला जातो. जिथे तुम्ही नोटिफिकेशन, कॉल किंवा वेळ पाहू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)

फोल्ड फोन

फोल्ड फोनबद्दल बोलायचे झाले तर याचे डिझाईन डाव्या किंवा उजव्या बाजूने उघडते. जेव्हा तुम्ही हा फोन पूर्णपणे उघडता तुम्हाला एका छोट्या टॅब्लेटसारखी मोठी स्क्रीन दिसू लागते. Samsung Galaxy Z Fold हा याच कॅटेगरीमधील फोन आहे. हा फोन मल्टीटास्किंगसाठी एक चांगला पर्याय मानला जातो. कारण यामध्ये तुम्ही एकाच वेळी अनेक अ‍ॅप वापरू शकता.

वापर आणि स्क्रीन आकार

फ्लिप आणि फोल्ड या दोन्ही फोनमधील फरक त्यांचा वापर आणि स्क्रीन आकारात असतो. फ्लिप फोन जास्त स्टायलिश आणि पोर्टेबल असतात. तर फोल्ड फोन जास्त प्रोडक्टिव्हिटी आणि मोठ्या स्क्रीनसाठी ओळखले जातात. फ्लिप फोन सामान्य यूजर्ससाठी योग्य ठरतात. हे एक ट्रेंडी आणि हाताळण्यासाठी सोपं डिव्हाईस आहे. तर फोल्डेबल फोन अशा यूजर्ससाठी डिझाईन करण्यात आले आहेत, ज्यांना मोठी स्क्रीन पाहीजे. व्हिडीओ पाहण्यासाठी, गेम खेळण्यासाठी किंवा ऑफीसचं काम करण्यासाठी मोठी स्क्रीन फायद्याची ठरू शकते.

किंमत

किंमतीबद्दल बोलायचं झालं, फोल्ड फोन सामान्यत: फ्लिप फोनपेक्षा महाग असतात. कारण यामध्ये मोठी स्क्रीन आणि अ‍ॅडव्हांस टेक्नोलॉजी असते. फ्लिप फोन परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध असतात आणि यूजर्स बजेट किंमतीत फ्लिप फोन खरेदी करू शकतात.

Flipkart Sale 2026: केवळ 19,949 रुपयांत घरी आणा हा Vivo स्मार्टफोन! 7200mAh आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… अशी आहे ऑफर

जर तुम्हाला स्टाईल आणि पोर्टेबिलिटी पाहिजे असेल तर फ्लिप फोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. याव्यतिरिक्त, जर तुम्हाला मोठी स्क्रीन आणि मल्टिटास्किंग करायचे असेल तर फोल्ड फोन एक चांगला पर्याय ठरू शकतो. दोन्ही फोन आपापल्या परीने खास आहेत आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही योग्य फोनची निवड करू शकता.

Web Title: Flip vs fold smartphones know the key differences before buying tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
1

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
2

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
3

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
4

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.