
फ्लिपकार्टचा Big Billion Days सेल कधीपासून? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
या पोस्टमध्ये ९ ऑक्टोबरपासून सेल सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. X वर एका युजरने फ्लिपकार्टच्या सेलचं पोस्टर टाकलं आहे. त्यात लिहिलंय की यावर्षीचा Big Billion Days 9 ऑक्टोबरला सुरू होईल. त्या पोस्टरमध्ये बँक ऑफर्स पण दिसत आहेत. Axis आणि ICICI बँकेच्या कार्डवर 10% सूट मिळणार आहे असं त्यात लिहिलंय. Flipkart Big Billion Days Sale Date Leaked:
सगळ्यांसाठी 9 ऑक्टोबरला सेल सुरू होईल, पण ज्यांच्याकडे Flipkart Plus आहे त्यांच्यासाठी एक दिवस आधीच म्हणजे 8 ऑक्टोबरला रात्रीपासूनच सेल ओपन होईल. नेहमीप्रमाणे प्लस वाल्यांना आधी शॉपिंग करता येते. चांगले फोन पटकन आउट ऑफ स्टॉक होतात त्यामुळे प्लस असलेल्यांना फायदा होतो.
या सेलमध्ये सगळंच स्वस्त असतं. पण लोक सगळ्यात जास्त मोबाईलसाठी थांबतात. Apple, Samsung, Motorola, Poco, Realme – सगळ्या ब्रँडचे फोन खूपच कमी किमतीत मिळतात. गेल्या वर्षी iPhone वर 20 हजाराची सूट होती, यावेळी पण iPhone 16 आणि 15 वर मोठी ऑफर असेल. फोन सोडून टीव्ही, फ्रिज, AC, वॉशिंग मशीन, लॅपटॉप, साउंडबार – घरासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू 75% पर्यंत डिस्काउंटला मिळतील. दिवाळीसाठी घरात काही नवीन घ्यायचं असेल तर हाच योग्य टाइम आहे. एक्सचेंज ऑफर पण असते, जुना फोन किंवा टीव्ही देऊन अजून सूट मिळते. No Cost EMI पण मिळणार आहे.
गेल्या वर्षी हा सेल 23 सप्टेंबरला लागला होता. प्लस आणि ब्लॅक मेंबर्ससाठी 22 सप्टेंबरलाच सुरू झाला होता. यावर्षी थोडा उशिरा येतोय कारण दिवाळी पण लेट आहे. पण ऑफर्स गेल्या वर्षीपेक्षा भारी असतील असं बोललं जातंय. गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये फ्लिपकार्टवर Freedom Sale होता. त्यात पण 10% इंस्टंट डिस्काउंट होता आणि बरेच नवीन फोन लॉन्च झाले होते. Amazon वर पण Freedom Sale झाला होता.आता ऑक्टोबरमध्ये Amazon चा पण Great Indian Festival सेल येणार आहे.
दोन्ही एकाच वेळी येतात. त्यामुळे दोन्ही साईटवर किंमत बघून जिथे स्वस्त मिळेल तिथून घेता येईल.एक सांगायचं झालं तर आता मोबाईल किंवा कोणतंही मोठं प्रोडक्ट घ्यायचा प्लॅन असेल तर थोडं थांबा. 9 ऑक्टोबर जवळच आहे. या सेलमध्ये नक्कीच हजारो रुपयांची बचत होईल.