ग्रुप फोटो असो किंवा सेल्फी.. अनेकदा असं घडतं की आपल्याला एखादा क्लिक करायचा असतो. पण हा फोटो क्लिक करण्यासाठी आपल्या आजूबाजूला कोणीच नसते. अशावेळी फोन एखाद्या ठिकाणी ठेऊन टाईमर लावून फोटो क्लिक करावा लागतो. टाईमर सेट करून फोटो क्लिक करण्यासाठी पुन्हा जागेवर जाऊन उभं राहणं फार कंटाळवाणे वाटते. यासाठी आयफोनमध्ये एक फीचर देण्यात आले आहे, ज्यामुळे तुम्ही फोनला हातही न लावता केवळ व्हॉईस कमांड देऊन फोटो क्लिक करू शकता. आयफोनमधील व्हॉईस कंट्रोल फीचरचा वापर करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. (फोटो सौजन्य: Pinterest)
Tech Tips: आता iPhone बनेल रिमोट कॅमेरा! फक्त आवाजाने क्लिक करा फोटो, ही ट्रिक वापरा

पहिल्यांदा व्हॉईस कंट्रोल फीचरचा वापर करत असाल तर फोन स्थिर वायफाय नेटवर्कने कनेक्ट असणं गरजेचं आहे. फीचर सेटअप करण्यासाठी सर्वात आधी आयफोन सेटिंग ओपन करा. आता अक्सेसिबिलिटी सेक्शनमध्ये जा. इथे फिजीकल अँड मोटार कॅटेगरीअंतर्गत व्हॉईस कंट्रोल निवडा. आता सेटअप व्हॉईस कंट्रोलवर टॅप करा. आता तुमची आवडती भाषा निवडा आणि कंटीन्यूवर क्लिक करा. सेटअप पूर्ण झाल्यावर, स्क्रीनवर काही कमांड्स दिसतील. या फिचरबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही मोठ्याने बोलू शकता.

व्हॉईस कंट्रोल चालू झाल्यानंतर तुम्हाला कॅमेऱ्याचा वापर करण्यासाठी हातांचा वापर करण्याची गरज नाही. कॅमेरा चालू करण्यासाठी केवळ ओपन कॅमेरा असे मोठ्याने बोला. तर फ्रंट आणि रिअर कॅमेऱ्यादरम्यान स्विच करण्यासाठी टॅप कॅमेरा चूजर कमांड द्या.

व्हॉईस कंट्रोल केवळ फोटो क्लिक करण्यासाठी नाही तर कॅमेऱ्याच्या दुसऱ्या पर्यायासाठी देखील वापरले जाऊ शकते. जसे, स्वाईप लेफ्ट आणि स्वाईप राईट वापरून कॅमेरा मोड देखील बदलू शकता.

या फीचरअंतर्गत तुम्ही 'फ्लॅश' वापरून फ्लॅश सुरू किंवा बंद करू शकता. तुम्ही झूम इन किंवा झूम आऊट करू शकता आणि 'लाईव्ह फोटो' वैशिष्ट्य सुरू किंवा बंद करू शकता.

व्हॉईस कंट्रोल करण्यासाठी हेय सिरी बोलण्याची आवश्यकता नाही.






