फोटो सौजन्य - pinterest
फ्लिपकार्टने त्यांच्या ग्राहकांसाठी GOAT सेलची घोषणा केली आहे. हा सेल 20 जुलैपासून सुरु झाला असून 25 जुलै ही या सेलची शेवटची तारीख आहे. तुम्ही स्मार्ट टिव्ही किंवा स्मार्ट फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का, तर मग फ्लिपकार्टचा हा GOAT सेल तुमच्यासाठी आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, मोबाइल ॲक्सेसरीज आणि होम अप्लायन्सेसवर भरगोस डिस्काऊंट दिलं जात आहे. फ्लिपकार्टने GOAT सेलची घोषणा केल्यानंतर ग्राहकांमध्ये प्रंचड उत्सुकता होती. आता अखेर हा सेल सुरु झाला आहे. त्यामुळे भरगोस डिस्काऊंट आणि बँक ऑफर्ससह तुम्ही खरेदी करु शकता.
हेदेखील वाचा- ‘या’ कंपन्या ठप्प झाल्या तर जगावर होईल मोठा परिणाम!
फ्लिपकार्ट नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन आणि खास सेल घेऊन येत असतो. त्यामुळे ग्राहकांना आकर्षक डिल आणि भरगोस डिस्काऊंटमध्ये मनसोक्त शॉपिंग करत येते. असंच आता फ्लिपकार्ट त्यांच्या ग्राहकांसाठी GOAT सेल घेऊन आला आहे. सेलमध्ये ग्रहकांना अनेक नवनवीन गोष्टी स्वस्त दरात उपलब्ध होत आहेत. या संधीचा फायदा घ्या आणि आत्ताच शॉपिंगला सुरुवात करा. फ्लिपकार्टच्या GOAT सेलमध्ये ग्राहकांना विविध कॅटेगरीतील प्रोडक्टसवर विशेष डिस्काऊंट दिलं जात आहे. फ्लिपकार्टच्या GOAT सेलमध्ये, स्मार्टफोन, मोबाइल ॲक्सेसरीज, TWS, लॅपटॉप, टीव्ही आणि एसीच्या खरेदीवर तुम्ही मोठी बचत करू शकता. तुम्ही तुमचे गॅझेट अपग्रेड करण्याचा विचार करत असाल किंवा घरात नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्टचा GOAT सेल तुमच्यासाठी आहे. फ्लिपकार्टच्या GOAT सेलमध्ये ग्राहकांना Axis Bank, HDFC बँक आणि IDFC FIRST बँकने पेमेंट केल्यास विशेष सुट मिळणार आहे.
स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर ऑफर
फ्लिपकार्टच्या GOAT सेलमध्ये iPhone 15, Vivo, Redmi, POCO, Nothing आणि OnePlus सारख्या ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर भरगोस डिस्काऊंट देण्यात आलं आहे. ग्राहक मोठ्या डिस्काऊंटसह स्मार्टफोन आणि लॅपटॉपची खेरदी करू शकतात. यासोबतच इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवरही भरघोस सूट मिळत आहे.
गृहोपयोगी वस्तूंवर सूट
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला स्मार्ट टीव्ही आणि होम अप्लायन्सेसवरही मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट मिळत आहे. फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही, वॉशिंग मशीन, आरओ, प्रिंटर, मिक्सर इत्यादींवर भरगोस डिस्काऊंट मिळत आहे. ज्यांना त्यांच्या घरासाठी नवीन वस्तू घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.
हेदेखील वाचा- AI कंपनी Krutrim ने ओलासाठी आणलं नवीन रोडमॅप!
POCO F6
फ्लिपकार्टच्या GOAT सेलमध्ये POCO च्या नवीन स्मार्टफोनवर भरगोस डिस्काऊंट मिळत आहे. Flipkart च्या Goat Sale मध्ये, ग्राहक त्याचे 8+256GB व्हेरिएंट 3,250 रुपयांच्या च्या सवलतीनंतर 29,999 रुपयांऐवजी केवळ 26,749 रुपयांमध्ये POCO F6 खरेदी करू शकतात. तर POCO X6 Pro बद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहक 4,250 रुपयांच्या मोठ्या सवलतीनंतर12+512GB व्हेरिएंट 24,749 रुपयांना खरेदी करू शकतात.
Nothing Phone 2
Nothing Phone 2 भारतात 49,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता सेलमध्ये या फोनवर भरगोस डिस्काऊंट मिळत आहे. Nothing Phone 2 चा 8GB + 128GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 29,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर फोनच्या Nothing Phone 2 च्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 36,999 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. तुम्ही फ्लिपकार्टवर ॲक्सिस बँक कार्डद्वारे 5 टक्के कॅशबॅक मिळवू शकता.