Galaxy a55 5g आणि Galaxy a35 5g केवळ 25,999 रूपयांच्या सुरूवातीच्या किमतीत उपलब्ध! सर्कल टू सर्च फीचरने सुसज्ज (फोटो सौजन्य - X)
Samsung या भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज Galaxy a55 5g आणि Galaxy a35 5g स्मार्टफोन्सच्या अभूतपूर्व किमतीची घोषणा केली. Galaxy a55 5g आणि Galaxy a35 5g मध्ये Samsung चे सर्वोत्तम फ्लॅगशिप मोबाइल इनोव्हेशन्स आहेत. या स्मार्टफोनमध्ये आता सर्कल टू सर्च विथ गुगल या AI वैशिष्ट्याचा देखील समावेश असणार आहे. लिमिटेड पीरियड ऑफर अंतर्गत Galaxy a55 5g स्मार्टफोन 33,999 रूपयांच्या निव्वळ सुरूवातीच्या किमतीमध्ये उपलब्ध असेल. तर Galaxy a35 5g स्मार्टफोन 25,999 रूपयांच्या सुरूवातीच्या किमतीमध्ये उपलब्ध असेल.
हेदेखील वाचा- Samsung लवकरच लाँच करणार डबल फोल्डेबल स्मार्टफोन! लाँचिंगपूर्वी डिटेल्स लिक
Galaxy a55 5g आणि Galaxy a35 5g अनेक प्रमुख वैशिष्ट्यांसह लाँच केले जाणार आहे. ज्यामध्ये गोरिला ग्लास विक्टस+, AI द्वारे सुधारण्यात आलेली कॅमेरा वैशिष्ट्ये, Samsung नॉक्स वॉल्ट, चार ओएस अपडेट्स आणि पाच वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स आहेत. तुम्ही क्रेडिट कार्ड्सचा वापर करून या स्मार्टफोनटची खरेदी करत असल्यास तुम्हाला डिस्काऊंट मिळणार आहे. ग्राहक या स्मार्टफोन्सची खरेदी करताना Galaxy a55 5g वर 6000 रूपये आणि Galaxy a35 5g वर 5000 रूपये आकर्षक बँक कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात. तसेच, ते जवळपास सहा महिन्यांपर्यंतच्या ईएमआयचा देखील लाभ घेऊ शकतात.
ग्राहक Galaxy a55 5g वर जवळपास 6000 रूपयांच्या आणि Galaxy a35 5g वर जवळपास 5000 रूपयांच्या अपग्रेड बोनसचा देखील आनंद घेऊ शकतात. पण, ग्राहक बँक कॅशबॅक किंवा अपग्रेड बोनस यापैकी एकाचाच आनंद घेऊ शकतात. या स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत बोलूया.
Galaxy a55 5g आणि Galaxy a35 5g सर्कल टू सर्च वैशिष्ट्यासह येतात, जे पारंपारिक शोध घेण्याच्या पद्धतींच्या तुलनेत डिस्कव्हरीचा परिवर्तनात्मक अनुभव देते. गुगलच्या सहयोगासह सादर करण्यात आलेले हे वैशिष्ट्य उपयुक्तता व सर्वोत्तमता सुधारण्यासाठी सतत विकसित होत आहे. Galaxy AI च्या सर्वात लोकप्रिय वैशिष्ट्यांपैकी एक सर्कल टू सर्च आहे. हे फीचर वापरकर्त्यांना हाताच्या बोटाने टेक्स्टभोवती सर्कल करत किंवा स्क्रिनवरील वस्तूवर स्क्रिबलिंग करत स्क्रिनवर शोध घेण्याची सुविधा देते.
ज्यासाठी अॅप्स स्विच करण्याची गरज भासत नाही. उदाहरणार्थ, वापरकर्त्यांना सोशल मीडिया पोस्टवर आवडणारे पोशाख दिसल्यास ते सर्कल टू सर्चचा वापर करत त्यांच्याभोवती सर्कल करत त्याच प्रकाराच्या उत्पादनांचा ऑनलाइन त्वरित शोध घेऊ शकतात. SAMSUNG Galaxy S24 सिरीजमध्ये सर्वोत्तम ठरलेले वैशिष्ट्य सर्कल टू सर्च दैनंदिन टास्क्समध्ये मदत करू शकते.
Galaxy a55 5g आणि Galaxy a35 5g डिवाईसेस Samsung.com, सॅमसंग स्टोअर्स आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून खरेदीसाठी उपलब्ध आहेत. Galaxy a35 5g ऑसम लिलाक, ऑसम आइस ब्ल्यू व ऑसम नेव्ही या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे, तर Galaxy a55 5g ऑसम आइस ब्ल्यू आणि ऑसम नेव्ही या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. Galaxy a55 5g ची मुळ किंमत 39,999 रूपये आहे. फोनची खरेदी करताना 6000 डिस्काऊंटसह फोनची किंमत 33,999 रूपये आहे. तर Galaxy a35 5g ची मुळ किंमत 30,999 रूपये आहे. फोनची खरेदी करताना 5000 डिस्काऊंटसह फोनची किंमत 25,999 रूपये आहे.
हेदेखील वाचा- Samsung Galaxy A06 स्मार्टफोन लाँच; 6.7 इंच डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज
Galaxy a55 5g आणि Galaxy a35 5g मध्ये अनेक आकर्षक वैशिष्ट्यांसह गॅलॅक्सीच्या फ्लॅगशिप कॅमेरा इनोव्हेशन्समधून प्रेरित फोटोग्राफी क्षमता आणि आकर्षक 6.6-इंच स्क्रिन डिस्प्ले आहे. जो व्हिजन बूस्टरसह वापरकर्त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाशी जुळून जातो. Galaxy a55 5g मध्ये 50 मेगापिक्सल मेनसह ओआयएस आणि 12 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. तर Galaxy a35 5g मध्ये 50 मेगापिक्सल मेनसह ओआयएस आणि 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5 मेगापिक्सल मॅक्रो आहे.
Galaxy a55 5g मध्ये 32 मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरा आहे, तर Galaxy a35 5g मध्ये 13 मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरा आहे. तसेच डिवाईसेसमध्ये व्हीडीआयएसमुळे ४के स्टेबिलायझेशन + अॅडप्टिव्ह व्हीडीआयएस (व्हिडिओ डिजिटल इमेज स्टेबिलायझेशन) आणि ओआयएस (ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन) अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये देखील आहेत. जी चालता-फिरता फोटो व व्हिडिओ सुस्पष्टपणे कॅप्चर होण्याची खात्री देतात. Galaxy a55 5g वरील सुधारित नाइटोग्राफी वैशिष्ट्य अंधुक प्रकाशात देखील सुस्पष्टपणे फोटो कॅप्चर होण्याची खात्री देते. दोन्ही डिवाईसेसमध्ये सुपर एएमओएलईडी डिस्प्ले आहेत, जे फुल एचडी क्लेअरिटी आणि सर्वोत्तम व्युइंग अनुभव देतात.
हे डिवाईसेस आयपी 67 प्रमाणित आहेत, म्हणजेच ते 1 मीटर फ्रेश वॉटरमध्ये जवळपास 30 मिनिटे टिकून राहू शकतात. तसेच, हे डिवाईसेस धूळ व वाळूला विरोध करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत, ज्यामुळे कोणत्याही स्थितीसाठी अनुकूल आहेत. Galaxy a55 5g आणि Galaxy a35 5g चे नकळतपणे पडल्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षणासाठी पुढील व मागील बाजूस गोरिला ग्लास विक्टस+ संरक्षण आहे.
4 एनएम प्रोसेस तंत्रज्ञानावर निर्माण करण्यात आलेले नवीन एक्झिनॉस 1480 प्रोसेसर Galaxy a55 5g ला शक्ती देते, तर Galaxy a35 5g 5 एनएम प्रोसेस तंत्रज्ञानावर निर्माण करण्यात आलेल्या एक्झिनॉस 1380 प्रोसेसरसह अपग्रेड करण्यात आला आहे. हे पॉवर-पॅक स्मार्टफोन्स विविध एनपीयू, जीपीयू व सीपीयू अपग्रेड्ससह 70 टक्क्यांहून अधिक मोठ्या कूलिंग चेम्बरसह येतात.
Galaxy a55 5g आणि Galaxy a35 5g मध्ये सॅमसंग नॉक्स वॉल्ट आहे. सॅमसंग नॉक्स वॉल्ट डिवाईस एन्क्रिप्शन कीजचे देखील संरक्षण करते, ज्यामुळे डिवाईसवर स्टोअर करण्यात आलेल्या वापरकर्त्यांच्या खाजगी डेटाचे एन्क्रिप्ट होते. योग्य लॉक स्क्रिन क्रेडेन्शियल्स असलेले वापरकर्ते डिवाईस हरवला किंवा चोरी झाला तरी त्यांचा डेटा मिळवू शकतात. अधिक सुरक्षिततेसाठी Galaxy a55 5g आणि Galaxy a35 5g मध्ये ऑटो ब्लॉकर आहे, जे कार्यान्वित केल्यास अनऑथोराइज्ड स्रोतांकडून अॅप इन्स्टॉलेशन्सना ब्लॉक करू शकते, संभाव्य मालवेअर ओळखण्यासाठी अॅप सुरक्षितता तपासते आणि यूएसबी केबलशी कनेक्टेड असताना डिवाईसमधील संभाव्य मालिशियस कमांड्स व सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन्सना ब्लॉक करते.