Upcoming Smartphone: सॅमसंग Galaxy S25 Edge पेक्षा स्लिम असणार Galaxy S26 Edge? पावरफुल बॅटरीसह करू शकतो एंट्री
Samsung Galaxy S26 Edge बाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. या स्मार्टफोनची डिझाईन कशी असेल, या स्मार्टफोनची किंमत किती असणार, तो कधी लाँच केला जाणार आहे, याबाबत युजर्समध्ये प्रचंड उत्सुकता लागली आहे. आता या आगामी स्मार्टफोनच्या डिझाईन आणि बॅटरीबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. असं सांगितलं जात आहे की, Samsung Galaxy S26 Edge हा आगामी स्मार्टफोन अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या Galaxy S25 Edge पेक्षा स्लिम असणार आहे. तसेच एका लीकमध्ये स्मार्टफोनच्या अचूक थिकनेसचा देखील खुलासा करण्यात आला आहे.
Galaxy S25 Edge हा स्मार्टफोन 13 मे रोजी लाँच करण्यात आला होता. हा स्मार्टफोन त्याच्या स्लिम डिझाईनसाठी प्रमोट करण्यात आला होता. मात्र आता असं सांगितलं जात आहे की, आगामी स्मार्टफोन या स्मार्टफोनपेक्षा स्लिम असणार आहे. यासोबतच फोनची बॅटरी क्षमता पुन्हा एकदा ऑनलाइन समोर आली आहे, जी अलीकडील लीकशी जुळते. असे म्हटले जात आहे की Galaxy S26 Edge मध्ये सिलिकॉन-कार्बन बॅटरी असेल, ज्यामुळे कंपनी पातळ बॉडीमध्ये मोठी बॅटरी बसवू शकेल. फोन पावरफुल बॅटरी आणि स्लिम डिझाईनने सुसज्ज असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
X वर टिप्स्टर Ice Universe ने दावा केला आहे की, Samsung Galaxy S26 Edge ची थिकनेस 5.5mm असणार आहे. जर हे खरं असेल तर आगामी Samsung Galaxy S26 Edge हा Galaxy S25 Edge पेक्षा स्लिम असणार आहे. Galaxy S25 सीरीजमधील सर्वात स्लिम मॉडेलची थिकनेस 5.8mm आहे.
यापूर्वी देखील या टिप्स्टरने Galaxy S26 Edge बाबत असंच सांगितलं होतं की तो सर्वात स्लिम स्मार्टफोन असणार आहे. मात्र त्याच्या अचूक जाडीबाबत माहिती देण्यात आली नव्हती. मात्र आता या टिप्स्टरने Galaxy S26 Edge ची अचूक जाडी किती असणार याबाबत माहिती दिली आहे. याशिवाय स्मार्टफोनच्या बॅटरीबाबत देखील हिंट देण्यात आली आहे. टिप्स्टरने दिलेल्या माहितीनुसार, Galaxy S26 Edge मध्ये 4,200mA h बॅटरी दिली जाणार आहे, जी आधीच्या Galaxy S Edge मॉडेलच्या 3,900mAh बॅटरीपेक्षा मोठी आहे.
एका लिकमध्ये सांगण्यात आलं आहे की, या आगामी स्मार्टफोनमध्ये 4,400mAh बॅटरी दिली जाऊ शकते. ही बॅटरी अल्ट्रा मॉडेलइतकी मोठी नसली तरी, ते त्याच्या मागील मॉडेलपेक्षा चांगले अपग्रेड आहे. Galaxy S25 Edge, ज्यामध्ये लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. तर आगामी S26 Edge मध्ये सिलिकॉन-कार्बन बॅटरीचा वापर केला जाणार आहे. ज्यामुळे डिझाईन आणखी स्लिम होऊ शकते. परंतु सॅमसंगने अद्याप या फोनचे कोणतेही स्पेसिफिकेशन किंवा लाँच डेट निश्चित केलेले नसल्यामुळे, सध्या तरी या आगामी स्मार्टफोनबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. काही रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, Galaxy S26 Edge मध्ये 50MP अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा दिला जाऊ शकतो, जो यापूर्वीच्या 12MP अल्ट्रा-वाइड लेंसपेक्षा अपग्रेड असणार आहे.