Raksha Bandhan 2025: असं गिफ्ट जे पाहून तुमची बहिण आनंदाने उड्या मारेल! लेटेस्ट आणि खास Smartwatch... किंमत 5 हजारांहून कमी
जर तुमच्या बहिणीला गॅझेटची आवड असेल आणि तुमची बहिण वेळेच्या बाबतीत काटेकोर असेल तर तिच्यासाठी स्मार्टवॉचपेक्षा चांगलं गिफ्ट असूच शकत नाही. स्मार्टवॉच केवळ योग्य वेळच सांगत नाही तर इतरही अनेक फीचर्स ऑफर करते. हेल्थ मॉनिटर्स, ब्लूटूथ कॉलिंग, असे अनेक अनोखे फीचर्स स्मार्टफोनमध्ये दिलेले असतात.
स्टायलिश लूक आणि हेल्थी ट्रॅ्किंगसारख्या स्मार्ट फीचर्सने सुसज्ज असलेलं स्मार्टवॉच पाहून तुमची बहिण आनंदाने उड्या मारू लागणार आहे. तसेच या स्मार्टवॉचची किंमत देखील 5 हजारांहून कमी आहे. त्यामुळे हे गिफ्ट तुमच्या बजेटमध्ये असणार आहे. डेली यूज, फिटनेस मॉनिटरिंग आणि स्मार्ट कनेक्टिविटीसाठी हे परफेक्ट गिफ्ट्स आहेत. या लिस्टमध्ये नॉइसपासून नथिंगपर्यंत अनेक खास स्मार्टवॉच ब्रँड्सचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
या स्मार्टवॉचची किंमत 3,999 रुपये आहे. या वॉचमध्ये 1.96-इंच AMOLED आणि 7 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी देण्यात आली आहे. या डिव्हाईसची चार्जिंग केवळ 2 तासांत फुल होते. या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग, व्हीओ२ मॅक्स, वर्कआउट विश्लेषण, रॅपिड हेल्थ ट्रॅकिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
या डिव्हाईसची किंमत 4,870 रुपये आहे. या डिव्हाईसमध्ये 1.32-इंच AMOLED डिस्प्लेसह ऑटो ब्राईटनेस देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचमधील स्पेशल फीचर्स म्हणजेच ३डी वॉर्मअप वाइड मोड, जेश्चर कंट्रोल. डिव्हाईसमध्ये इन-बिल्ट GPS सपोर्ट आणि प्रीमियम डिजाइनसह स्मूथ यूजर एक्सपीरियंस आहे.
या स्मार्टवॉचची किंमत 3,994 रुपये आहे. या वॉचमध्ये 2.01-इंच Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. कनेक्टिविटी फीचर्समध्ये ब्लूटूथ 5.3 कॉलिंग, डायनॅमिक आयलंड यांचा समावेश आहे. या स्मार्टवॉचमध्ये इन-बिल्ट ChatGPT आणि AI Health Tracker सारखे AI फीचर देण्यात आले आहेत. तसेच Always-on Display आणि इन-अॅप GPS देखील आहे.
या स्मार्टवॉचची किंमत केवळ 2,099 रुपये आहे. या वॉचमध्ये 1.97-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि SpO2, हृदय गती, महिला आरोग्य ट्रॅकिंग सारखे हेल्थ ट्र्रॅकिंग फीचर्स देण्यात आले आहेत.
या डिव्हाईसची किंमत केवळ 1,799 रुपये ठेवण्यात आली आहे. या वॉचमध्ये 600 निट्स ब्राइटनेससह 1.43-इंच HD AMOLED डिस्प्ले आहे. ब्लूटूथ कॉलिंग, एआय व्हॉइस असिस्टंट सारखे कनेक्टिविटी फीचर्स या स्मार्टवॉचमध्ये देण्यात आले आहेत. यामध्ये 120 पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत.
Tech Tips: स्मार्टफोन सतत गरम का होतो? काय आहेत कारणं आणि सोल्यूशन? टेक एक्सपर्टने काय सांगितलं?
या स्मार्टवॉचची किंमत केवळ 4,999 रुपये आहे. यामध्ये 1.96-इंच Super AMOLED डिस्प्ले आहे. या डिव्हाईसची बॅटरी 7 दिवसांपर्यंत चालते, असा दावा करण्यात आला आहे. वॉचमध्ये सिंगलसिंक ब्लूटूथ कॉलिंग, 110 हून अधिक स्पोर्ट्स मोड, 200 हून अधिक वॉच फेस फीचर्स देण्यात आले आहेत. Titan चा प्रीमियम लुक आणि रिलायबिलिटी हे या वॉचची सर्वात खास गोष्ट आहे.
या स्मार्टवॉचची किंमत केवळ 4,499 रुपये आहे. यामध्ये 1.43-इंच AMOLED डिस्प्ले आणि स्टेनलेस स्टील बॉडी देण्यात आली आहे. फंक्शनल रोटेटिंग डायल आणि अॅक्स-कट बेझल हे या वॉचमधील स्पेशल फीचर्स आहेत. हे स्मार्टवॉच Bluetooth Calling सपोर्ट आहे.