Apple Event 2026: रहस्याचा पडदा उठणार! 'या' दिवशी कंपनी करणार धमाका, स्वस्त iPhone 17e आणि मॅकबुकसह लाँच करणार हे गॅझेट्स
सर्वात महत्त्वाची आणि खास गोष्ट म्हणजेच, या ईव्हेंटच्या लाईव्ह स्ट्रिमिंगबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. म्हणजेच यूजर्स कंपनीचा हा ईव्हेंट ऑनलाईन पाहू शकतात की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. यामुळेच हा ईव्हेंट नियमित कीनोटपेक्षा अधिक प्रत्यक्ष प्रदर्शनाचा सल्ला दिला जातो. यूजर्स आगामी ईव्हेंटची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहेत. रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, कंपनीच्या त्यांच्या या वर्षातील पहिल्या ईव्हेंटमध्ये कमी किंमतीतील मॅकबूक, नवीन आयपॅड्स आणि स्वस्त आणि बजेट फ्रेंडली आयफोन 17e सादर करू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर असा अंदाज वर्तवला जात आहे की, 4 मार्च रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या ईव्हेंटमधील मुख्य आकर्षण आयफोन 17e असणार आहे. हे डिव्हाईस आयफोन 16e ची जागा घेणार आहे. स्वस्त आणि बजेट फ्रेंडली किंमतीत जास्त फायदे देणारी अॅपलची स्ट्रॅटेजी या आगामी आयफोनमुळे सुरु राहणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, फोनमध्ये 6.1 इंच OLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. एवढंचा नाही तर आयफोन 17e मध्ये नॉच स्टाइल नाही तर डायनामिक आइलँड डिझाईन देखील पाहायला मिळू शकते. जर हे सत्य असेल तर अॅपलच्या एंट्री-लेव्हल लाइनअपसाठी हा एक मोठा डिझाईन बदल असेल.
ईव्हेंटमध्ये केवळ स्वस्त आयफोनच नाही तर बजेट फ्रेंडली मॅकबुक देखील सादर केले जाण्याची शक्यता आहे. असं सांगितलं जात आहे की, यावेळी कंपनी एक नवीन एंट्री लेव्हल मॅकबुक सादर करणार आहे, जो सामान्य M सीरीज चिपऐवजी आयफोन क्लास A सीरीज प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. रिपोर्ट्समध्य़े सांगितलं जात आहे की, या मॉडेलमध्ये थोडा छोटा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. एल्युमिनियम बॉडी आणि नवीन कलर ऑप्शनमुळे डिव्हाईस चर्चेचा विषय ठरणार आहे. जर हे डिव्हाईस खरंच बजेट फ्रेंडली रेंजमध्ये सादर करण्यात आले, तर विद्यार्थ्यांसाठी हे खास गिफ्ट ठरू शकते. याव्यतिरिक्त, टॅब्लेटबद्दल बोलायचं झालं तर, कंपनी स्टँडर्ड आयपॅड आणि आयपॅड एअरचे रिफ्रेश्ड वर्जन सादर करू शकते. यावेळी चिप अपग्रेड केली जाण्याची शक्यता आहे.






