जगभरातील नामांकित Google Chrome हा एक वेब ब्राउझर आहे. जगभरातील लाखो लोक याचा दैनंदिन आयुष्यात वापर करत असतात. यूजर्स इंटरनेट ब्राउझिंगसाठी याचा वापर करत असतात. प्रत्येक देशात याचे ऍक्टिव्ह यूजर्स आहेत, यावरूनच आपण याची लोकप्रियता ओळखू शकतो. गुगल क्रोम ब्राउझरमध्ये अनेक फीचर्स उपलब्ध आहेत, जे यूजर्ससाठी खूप फायदेशीर आहेत. त्यातच आता Google ने या ब्राउझरचे नवीन व्हर्जन जारी केली आहे, ज्यामध्ये अनेक नवनवीन फीचर्स पाहायला मिळणार आहेत.
काय आहे Google Chrome चे नवीन व्हर्जन
तुम्ही गुगल क्रोम वेब ब्राउझर वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गुगलने क्रोममध्ये काही नवीन फीचर्स लॉन्च केले आहेत. या फीचरचे नाव क्रोम 125 आहे. काही काळापूर्वी हे टेस्टिंगसाठी जारी करण्यात आले होते, परंतु आता हे सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे. तथापि, गुगलचे म्हणणे आहे की, हे अपडेट पुढील काही आठवड्यांत सर्व Windows, Mac आणि Linux ऑपरेटिंग सिस्टमवर येईल. गुगल क्रोमच्या या नवीन अपडेटमध्ये युजर्सना कोणत्या नवीन खास गोष्टी मिळत आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
[read_also content=”Google चे नवीन फिचर, स्मार्टफोन्सचा OTP आता अधिक सुरक्षित होणार Google चे नवीन फिचर, स्मार्टफोन्सचा OTP आता अधिक सुरक्षित होणार”]
Chrome 125 मध्ये काय खास आहे?
पेजच्या आतील गोष्टींना पोजिशन देणे (CSS Anchor Positioning)
गूगल क्रोमच्या नवीन फीचरनुसार आता तुम्ही वेबपेजचा एक भाग दुस-याशी कोणत्याही कोडिंगशिवाय कनेक्ट करू शकता. समजा तुम्हाला वेबसाइटवरील मजकुराशेजारी फोटो आणायचा असेल तर हे नवीन फीचर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.
कम्प्युटरचा परफॉर्मन्सची तपासणे (Compute Pressure API)
हे नवीन फिचर आपल्या कम्प्युटरवर चालणारे ॲप्स, विशेषत: व्हिडिओ कॉलिंग ॲप्स, आपला कम्प्युटर किती व्यस्त आहे ते सांगते. या नवीन फीचरच्या मदतीने ॲप्स त्यांचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील.
वेबसाइट्सना अधिक माहिती प्रदान करणे (स्टोरेज ऍक्सेस API (SAA) विस्तार)
या फीचरनुसार आता वेबसाइट्स केवळ कुकीजच (cookies) नव्हे तर याव्यतिरिक्तची अधिक माहिती देखील मिळवू शकतील, ज्यामुळे ते तुम्हाला अधिक चांगला अनुभव देऊ शकतील.
उत्तम ॲनिमेशन तयार करणे (CSS स्टेप्ड-व्हॅल्यू फंक्शन्स)
हे फिचर वेब डेव्हलपर्सना ॲनिमेशन तयार करण्यात मदत करेल. याशिवाय, Google Chrome 125 मध्ये असे अनेक अपडेट्स येत आहेत, जे युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.






