Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात आल्यानंतर Sundar Pichai यांची मोठी घोषणा! Google भारतात करणार १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

गुगल आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी भारतात पुढील ५ वर्षांत तब्बल १५ अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे १.२५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची ऐतिहासिक घोषणा केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 18, 2026 | 09:22 PM
भारतात आल्यानंतर Sundar Pichai यांची मोठी घोषणा! (Photo Credit- X)

भारतात आल्यानंतर Sundar Pichai यांची मोठी घोषणा! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • भारतात गुंतवणुकीचा महापूर!
  • सुंदर पिचाईंकडून १.३५ लाख कोटींची घोषणा
  • ‘एआय’ क्रांतीसाठी गुगलचा मोठा मास्टरप्लान
Google AI hub India: जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘गुगल’ने (Google) भारतासाठी आपल्या तिजोरीचे दरवाजे उघडले आहेत. गुगल आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी भारतात पुढील ५ वर्षांत तब्बल १५ अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे १.२५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची ऐतिहासिक घोषणा केली आहे. नवी दिल्लीत आयोजित ‘एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये (AI Impact Summit) त्यांनी ही माहिती दिली. या गुंतवणुकीचा मुख्य भर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या विस्तारावर असणार आहे.

पंतप्रधान मोदींशी चर्चा आणि ‘एआय’वर भर

सुंदर पिचाई यांनी बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी भारतातील वाढत्या डिजिटल क्षमतेचे कौतुक केले आणि देशात एआय परिसंस्था (AI Ecosystem) मजबूत करण्यासाठी गुगल पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सांगितले. “भारत ही केवळ गुगलसाठी बाजारपेठ नसून ती तांत्रिक नवकल्पनांचे जागतिक केंद्र आहे,” असे मत पिचाई यांनी यावेळी व्यक्त केले.

At the AI impact summit our message is clear: we believe India is going to have an extraordinary trajectory with AI, and we want to be a partner. To help, we have launched new America-India Connect subsea cable routes building on our $15B investment in India’s infrastructure,… pic.twitter.com/pb0xH9XbgX — Sundar Pichai (@sundarpichai) February 18, 2026

भारत-अमेरिका कनेक्टिव्हिटीसाठी ‘सब-सी’ केबल मार्ग

या समिटमध्ये पिचाई यांनी ‘भारत-अमेरिका कनेक्ट इनिशिएटिव्ह’चे अनावरण केले. याअंतर्गत समुद्रतळाखालून (Sub-sea cable) एक नवीन हायस्पीड केबल मार्ग तयार केला जाणार आहे. यामुळे भारत आणि अमेरिका दरम्यान सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी मिळेल. या नवीन मार्गामुळे केवळ एआय ऑपरेशन्स वेगवान होणार नाहीत, तर दोन्ही देशांतील विविध लोकेशन्स थेट जोडली जाऊन रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास ‘गुगल डीपमाइंड’चे सीईओ डेमिस हसाबीस यांनी व्यक्त केला.

एआय क्षेत्रात भारताची ऐतिहासिक झेप! बंगळुरूत उभारली जाणार देशातील पहिली Humanity AI City, काय म्हणाले केंद्रीय मंत्री? जाणून घ्या

विशाखापट्टणम होणार गुगलचे ग्लोबल ‘एंट्री पॉईंट’

गुगलच्या या व्यापक योजनेचा एक भाग म्हणून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एक भव्य ‘इंटरनॅशनल सब-सी लँडिंग स्टेशन’ उभारले जाणार आहे. हे स्टेशन गुगलच्या जागतिक नेटवर्कसाठी भारतातील मुख्य प्रवेशद्वार ठरेल. येथून भारत केवळ अमेरिकेशीच नाही, तर सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेशी देखील जोडला जाईल. याशिवाय, देशांतर्गत कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी चार अतिरिक्त फायबर रूट्स जोडले जाणार आहेत.

कौशल्य विकासासाठी नवीन उपक्रम

केवळ पायाभूत सुविधाच नाही, तर मानवी संसाधनांच्या विकासासाठीही गुगलने मोठी पावले उचलली आहेत. भारतात ‘एआय प्रोफेशनल सर्टिफिकेट प्रोग्राम’ सुरू करण्याची घोषणा पिचाई यांनी केली. या कार्यक्रमाद्वारे लाखो तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात प्रगत प्रशिक्षण देऊन त्यांना जागतिक दर्जाचे ‘एआय मास्टर्स’ बनवले जाईल.

डेटा सेंटर आणि रिसर्च पार्टनरशिप

गुगलची ही १.२५ लाख कोटींची गुंतवणूक भारतातील डेटा सेंटरची क्षमता आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आमूलाग्र बदलून टाकेल. “आम्ही सरकारी संस्था आणि स्थानिक संशोधन केंद्रांशी भागीदारी करणार आहोत. यामुळे राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये एआय सायन्स मॉडेल्सचा वापर करणे सुलभ होईल,” असेही पिचाई यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे भविष्यात नेटवर्क आऊटेजच्या समस्या कमी होतील आणि एआय सर्व्हिसेसची व्याप्ती वाढेल.

भारत बनणार टेक लीडर? पंतप्रधान Narendra Modi च्या भाषणाने वाढली उत्सुकता! म्हणाले, तंत्रज्ञान माणसांसाठी, त्यांची जागा…

Web Title: Google to invest rs 125 lakh crore in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 09:22 PM

Topics:  

  • ai
  • AI Hub
  • google
  • Sundar Pichai
  • Tech News

संबंधित बातम्या

BSNL vs Vi: Vi मोठा धक्का! व्होडाफोन आयडिया सोडून BSNL ला सरकारने केलं आपलंसं, 4200 कर्मचाऱ्यांना Sim बदलण्याचे आदेश
1

BSNL vs Vi: Vi मोठा धक्का! व्होडाफोन आयडिया सोडून BSNL ला सरकारने केलं आपलंसं, 4200 कर्मचाऱ्यांना Sim बदलण्याचे आदेश

Passport Apply online : पासपोर्ट काढणं झालं सोपं! एजंटशिवाय मोबाईलवरून स्वतः करा अर्ज, काही मिनिटांत काम होईल पूर्ण, जाणून घ्या…
2

Passport Apply online : पासपोर्ट काढणं झालं सोपं! एजंटशिवाय मोबाईलवरून स्वतः करा अर्ज, काही मिनिटांत काम होईल पूर्ण, जाणून घ्या…

Social Media Ban : आता ‘या’ देशात सोशल मीडियावर बंदी! वापरल्यास तब्बल 21 कोटींचा दंड, कारण काय?
3

Social Media Ban : आता ‘या’ देशात सोशल मीडियावर बंदी! वापरल्यास तब्बल 21 कोटींचा दंड, कारण काय?

Meta ला टक्कर देण्यासाठी बाजारात येतोय Apple Smart Glasses, लाँचपूर्वीच लीक झाली माहिती
4

Meta ला टक्कर देण्यासाठी बाजारात येतोय Apple Smart Glasses, लाँचपूर्वीच लीक झाली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.