Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आई शपथ! आता इंधनानंतर मोबाइल डेटा वापरणे महागणार? सरकार 1 GB डेटावर ‘इतका’ टॅक्स लावण्याच्या तयारीत

mobile data tax India: केंद्र सरकार मोबाइल डेटाच्या वापरावर नवीन टॅक्स लावण्याच्या तयारीत आहे. १ रुपया प्रति GB टॅक्स लावल्यास सरकारला २२,९०० कोटींचा महसूल मिळू शकतो.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 13, 2026 | 05:12 PM
आता इंधनानंतर मोबाइल डेटा वापरणे महागणार? (Photo Credit- X)

आता इंधनानंतर मोबाइल डेटा वापरणे महागणार? (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • आई शपथ!
  • आता इंधनानंतर मोबाइल डेटा वापरणे महागणार?
  • सरकार 1 GB डेटावर ‘इतका’ टॅक्स लावण्याच्या तयारीत
Mobile Data Tax India 1 Rupee Per GB DoT Study: जर तुम्ही दररोज मोठ्या प्रमाणात मोबाइल डेटा वापरत असाल, सोशल मीडियावर रील्स पाहत असाल किंवा ऑनलाइन गेमिंगचे शौकीन असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. येणाऱ्या काळात इंटरनेट वापरासाठी तुम्हाला खिशाला अधिक कात्री लावावी लागू शकते. केंद्र सरकार (Central Goverment) मोबाइल डेटाच्या वापरावर नवीन ‘डेटा टॅक्स’ (Data Tax) लावण्याच्या पर्यायावर गंभीरपणे विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे.

दूरसंचार विभागाला (DoT) सविस्तर अभ्यासाचे आदेश

मिळालेल्या माहितीनुसार, दूरसंचार क्षेत्राच्या (Telecom Sector) एका आढावा बैठकीत मोबाइल डेटावर कर लावण्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. यानंतर, दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. डेटावर कर लावणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का आणि तो लागू करण्यासाठी कोणते मॉडेल वापरता येईल, याची तपासणी सध्या सुरू आहे.

1 रुपया प्रति GB टॅक्सचा पर्याय?

सध्या ज्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे, त्यामध्ये वापरकर्त्यांनी वापरलेल्या प्रत्येक 1 GB डेटावर 1 रुपया कर आकारण्याचा पर्याय विचारात घेतला जात आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर ग्राहक जितका जास्त डेटा वापरतील, तितका जास्त टॅक्स त्यांच्या बिलात किंवा रिचार्जमध्ये जोडला जाईल.

YouTube करतंय मोठं प्लॅनिंग! पत्रकार आणि राजकीय नेत्यांना मिळणार हे खास टूल, कसं करणार कामं? जाणून घ्या सविस्तर

सरकारी तिजोरीत होणार हजारो कोटींची भर

भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या मोठी आहे आणि डेटाचा वापरही जगात सर्वाधिक आहे. जर 1 रुपया प्रति GB या दराने कर लागू केला, तर सरकारला दरवर्षी सुमारे 22,900 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, हा अद्याप केवळ एक प्रस्ताव असून त्यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

भारतात मोबाइल डेटा स्वस्त, पण आधीच 18% GST

भारत हा जगातील अशा देशांपैकी एक आहे जिथे मोबाइल इंटरनेटचे दर सर्वात स्वस्त आहेत. यामुळेच व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. सध्या मोबाइल रिचार्ज आणि पोस्टपेड बिलांवर ग्राहक 18 टक्के GST भरत आहेत. जर हा नवीन डेटा टॅक्स लागू झाला, तर तो विद्यमान GST व्यतिरिक्त असेल, ज्यामुळे सामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडू शकते.

अंतिम निर्णय कधी?

सध्या सरकारने केवळ या प्रस्तावाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यास सांगितले आहे. या अभ्यासाअंती मिळणाऱ्या अहवालात या कराचे फायदे आणि तोटे या दोन्ही बाजू तपासल्या जातील. त्यानंतरच सरकार अधिकृत भूमिका स्पष्ट करेल. सध्या तरी या विषयावर सरकारकडून कोणतेही अधिकृत परिपत्रक काढण्यात आलेले नाही.

WhatsApp चा मोठा निर्णय! 13 वर्षांहून कमी वयाच्या यूजर्ससाठी आणलं नवं सुपरविजन फीचर, प्रायव्हसी नियम होणार अधिक कठोर

Web Title: Government considering new tax on mobile data usage 1 rupee per gb marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • central goverment
  • internet
  • Social Media
  • Tech News

संबंधित बातम्या

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव
1

boAt Projector Launch: टीव्हीला पर्याय? boAt ची CineHead F1 सिरीज बाजारात; मिळणार घरच्या घरी सिनेमागृहाचा अनुभव

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत
2

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत
3

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स
4

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.