WhatsApp चा मोठा निर्णय! 13 वर्षांहून कमी वयाच्या यूजर्ससाठी आणलं नवं सुपरविजन फीचर, प्रायव्हसी नियम होणार अधिक कठोर
WhatsApp Update: काय सांगता! आता 3 नाही तर 20 चॅट्स होणार Pin… केवळ या यूजर्सना मिळणार प्रीमियम फीचर
व्हॉट्सअॅपचं असं म्हणणं आहे की, पेरेंट-मॅनेज्ड अकाऊंटमध्ये प्रायव्हसी नियम अधिक कठोर केले जाणार आहेत. ज्यामुळे मुलांच्या सुरक्षेवर कोणताही परिणाम होणार नाही. पेरेंट-मॅनेज्ड अकाऊंट एक प्रकारचे व्हॉट्सअॅप अकाऊंट आहे, जे विशेषत: 13 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या यूजर्ससाठी तयार करण्यात आले आहेत. याबाबत एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, हे अकाऊंट्स पालक बनवतात आणि कंट्रोल करतात आणि हे अकाऊंट्स पालकांच्या अकाऊंटसोबत जोडलेले असतात.
व्हॉट्सअॅपने दिलेल्या माहितीनुसार, पेरेंट-मॅनेज्ड अकाऊंटमध्ये स्टँडर्ड अकाऊंटच्या तुलनेच जास्त कठोर प्रायव्हसी डिफॉल्ट आणि मर्यादित फंक्शनॅलिटी असणार आहे. हे अकाऊंट प्रायव्हेट मेसेज आणि व्हॉईस कॉलिंगपर्यंत मर्यादित असणार आहेत. यामुळे छोटे यूजर्स केवळ कुटूंब आणि विश्वसनीय संपर्कांसोबत जोडले जाऊ शकतात. यशिवाय मुलं कोणत्या ग्रुपमध्ये सहभागी होत आहेत, यावर देखील लक्ष केंद्रित केले जाऊ शकते.
पॅरेंट मॅनेज्ड अकाऊंट्समधील यूजर्सना स्टेटस अपडेट्स, चॅनल्स किंवा मेटा AI फीचर्सचा सपोर्ट मिळणार नाही. याशिवाय वन-टू-वन चॅट्समध्ये डिसअपीयरिंग मेसेज देखील डिसेबल आहे. अनोळखी नंबरवरून येणारे मेसेज रिक्वेस्ट फोल्डरमध्ये फिल्टर केले जाऊ शकतात. हा फोल्डर केवळ पॅरेंट पिनचा वापर करून एक्सेस केला जाऊ शकतो. जेव्हा त्यांचे मूल संपर्क जोडते, ब्लॉक करते किंवा ब्लॉक करते तेव्हा पालकांना देखील याबाबत सूचित केले जाते. यामुळे त्यांचा मुलगा किंवा मुलगी व्हॉट्सअॅपवर काय करत आहेत, या अॅक्टिव्हीटीवर नजर ठेवली जाऊ शकते.
व्हॉट्सअॅपचं असं म्हणणं आहे की, ज्या पालकांना त्यांच्या मुलांसाठी व्हॉट्सअॅप अकाऊंट तयार करायचे आहे, असे पालक रजिस्ट्रेशन प्रोसेसदरम्यान पॅरेंट-मॅनेज्ड अकाऊंट तयार करू शकतात. साइन-अपदरम्यान, पालकांना प्री-टीन यूजरची जन्मतारीख एंटर करून पॅरेंट-मॅनेज्ड अकाऊंट सेटअप करण्याचा पर्याय दिसणार आहे. सेटअप प्रक्रियेसाठी पालक आणि मुलाचे फोन दोन्ही आवश्यक असतील जेणेकरून अकाऊंट लिंक करता येतील. या प्रक्रियेदरम्यान पालकांना त्यांची ओळख व्हेरिफाय करण्याचा पर्याय देखील मिळू शकतो. येत्या काही महिन्यात हे फीचर सर्वत्र रोलआऊट केलं जाणार आहे.






