Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Telegram च्या अडचणी वाढल्या! पायरेटेड चित्रपट हटवण्यासाठी सरकारने दिला 15 दिवसांचा अल्टिमेटम

Telegram Updates: ऑनलाइन पायरसीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने टेलिग्रामविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिग्रामला 15 दिवसांत पायरसीविरोधी यंत्रणा मजबूत करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 04, 2026 | 02:29 PM
Telegram च्या अडचणी वाढल्या! पायरेटेड चित्रपट हटवण्यासाठी सरकारने दिला 15 दिवसांचा अल्टिमेटम

Telegram च्या अडचणी वाढल्या! पायरेटेड चित्रपट हटवण्यासाठी सरकारने दिला 15 दिवसांचा अल्टिमेटम

Follow Us
Follow Us:
  • केंद्र सरकारने टेलिग्रामला 15 दिवसांत पायरसीविरोधी प्रणाली मजबूत करून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
  • प्लॅटफॉर्मवरील पाइरेटेड चित्रपट, ओटीटी कंटेंट आणि कॉपीराइट उल्लंघन करणारा मजकूर हटवण्यासाठी सक्रिय यंत्रणा विकसित करण्यास सांगितले आहे.
  • वारंवार पाइरेटेड कंटेंट शेअर करणारे चॅनेल, ग्रुप, बॉट आणि संबंधित नेटवर्कवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
Notice to Telegram: भारत सरकारने अलीकडेच मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपला नोटीस दिली होती. त्यानंतर सरकारने टेलिग्रामला देखील नोटीस जारी करत यूजरनेमसंबंधित प्रश्नांची उत्तरं मागितली होती. यानंतर आता भारत सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला असून टेलिग्रामच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतातील ऑनलाइन पायरसीला आळा घालण्यासाठी आता सरकारने टेलिग्रामविरोधात कठोर भुमिका घेतली आहे.

WhatsApp Update: iPad वर व्हॉट्सॲप वापरणे झाले आणखी सोपे! QR कोड स्कॅन करण्याची गरज संपली, असं वापरा नवं फीचर

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामला नोटीस जारी केली असून 15 दिवसांत त्यांची पायरसीविरोधी प्रणाली अधिक मजबूत करणं आणि यावर करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारचं असं म्हणणं आहे की, या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पाइरेटेड चित्रपट, ओटीटी कंटेट आणि मोठ्या प्रमाणात कॉपीराइट कंटेंट शेअर केला जात आहे. यामुळे फिल्म इंडस्ट्री आणि क्रिएटर इकोनॉमीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागत आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

सरकारने काय म्हटलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयाने टेलिग्रामला स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, कंपनीने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले पाइरेटेड चित्रपट आणि कॉपीराइटचे उल्लंघन करणारे ऑडिओ-व्हिडीओ कंटेट ओळखणे, त्याची तक्रार करणे, त्यावर प्रवेश बंद करणे आणि असा कंटेट काढून टाकण्यासाठी एक मजबूत पद्धत तयार करावी. याशिवाय सरकारचं असं मत आहे की, केवळ तक्रार प्राप्त झाल्यानंतर कंटेट हटवणं पुरेसे नाही. प्लॅटफॉर्मला स्वत: अशा कंटेटची ओळख पटवावी लागेल आणि वेळीच असा कंटेट हटविण्यासाठी महत्त्वाची पाऊलं उचलावी लागणार आहेत.

टेलिग्रामची तक्रार निवारण प्रणाली

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिग्रामकडे त्यांच्या तक्रार निवारण प्रणालीबद्दल संपूर्ण माहिती मागितली आहे. सरकारला जाणून घ्यायचे आहे की, चित्रपट निर्माता, ओटीटी प्लॅटफॉर्म, ब्रॉडकास्टर आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था पाइरेटेड कंटेंटची तक्रार कशा पद्धतीने दाखल करतात आणि या तक्रारींवर किती वेगाने कारवाई केली जाते.

वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

सरकारने टेलिग्रामला अशा यूजर्स आणि नेटवर्कच्या विरोधात देखील कठीण कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, जे वारंवार पाइरेटेड कंटेंट शेअर करतात. यामध्ये केवळ पर्सनल अकाऊंटच नाही तर चॅनल, ग्रुप, बॉट, एडमिन आणि यासंबंधित अनेक नेटवर्क्सचा देखील समावेश आहे. जे लोकं सतत चित्रपट आणि वेब सिरीजची पाइरेटेड कॉपी लोकांपर्यंत पोहोचवतात, अशा लोकांचे नेटवर्क पूर्णपणे नष्ट करण्याचे सरकारचे उदिष्ट आहे.

बजेटचा बादशाह अन् फीचर्सचा सुपरस्टार! iQOO च्या नव्या स्मार्टफोनची सर्वांनाच पडली भुरळ; सुरुवातीची किंमत केवळ 18 हजार रुपये

15 दिवसांत सादर करावा लागणार अहवाल

सरकारने टेलिग्रामला 15 दिवसांची मुदत दिली आहे. या 15 दिवसांत टेलिग्रामला एक सविस्तर कारवाई अहवाल (एटीआर) सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या अहवालात टेलिग्रामला सांगावे लागेल की, पाइरेटेड कंटेंटची ओळख, त्यांच्यावर रोख आणि असा कंटेट हटविण्यासाठी कोणती पाऊलं उचलली आहेत.

Web Title: Government issues notice to telegram seeks stronger anti piracy measures within 15 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • Telegram
  • Telegram App

संबंधित बातम्या

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार
1

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
2

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास
3

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या
4

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.