WhatsApp Update: iPad वर व्हॉट्सॲप वापरणे झाले आणखी सोपे! QR कोड स्कॅन करण्याची गरज संपली, असं वापरा नवं फीचर
व्हॉट्सॲपने आयपॅड यूजर्ससाठी एक नवीन अपडेट रोलआऊट करण्यास सुरुवात केली आहे. WABetaInfo ने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, हे फीचर आयपॅडओएसच्या लेटेस्ट वर्जन 26.25.74 वर मिळणार आहे. आतापर्यंत व्हॉट्सॲप वापरताना आयपॅड केवळ ‘कंपॅनियन मोड’ मध्ये काम करत होता. म्हणजे तुम्हाला फोनमध्ये लिंक करून आयपॅडवर व्हॉट्सॲप वापरावा लागत होता. मात्र आता नवीन अपडेट रोलआऊट झाल्यानंतर यूजर्स व्हॉट्सॲप वापरण्यासाठी त्यांच्या आयपॅडला प्रायमरी डिव्हाईस बनवू शकता. म्हणजेच आयफोन किंवा अँड्रॉईडशिवाय थेट आयपॅडवर व्हॉट्सॲप वापरू शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
कंपॅनियन मोडमध्ये अनेक मर्यादा होत्या. जसे, यूजर्स आयपॅडवरून त्यांचे लाईव्ह लोकेशन कोणासोबत शेअर करू शकत नव्हते. याशिवाय ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करण्यात किंवा पाहताना अडचण येत होती. सर्वात मोठी समस्या म्हणजेच आयपॅडमध्ये व्हॉट्सॲप वापरताना जर तुम्ही 14 दिवसांपर्यंत तुमच्या मुख्य फोनमध्ये व्हॉट्सॲप ओपन केले नाही. तर आयपॅडमधून व्हॉट्सॲप आपोआप लॉगआऊट केले जात होते. मात्र आता असं होणार नाही. कारण आता यूजर्स आयपॅडला प्रायमरी डिव्हाईस म्हणून सेट करू शकणार आहेत. यामुळे कंपॅनियन मोडमधील मर्यादांचा सामना करावा लागणार नाही. आयपॅडमधून लाईव्ह लोकेशन शेअर केले जाऊ शकते. तसेच ब्रॉडकास्ट लिस्टचा वापर केला जाऊ शकतो आणि बिजनेस अकाउंट्ससोबत देखील संभाषण करू शकता.
आयपॅडमध्ये नवीन व्हॉट्सॲप अपडेट सेटअप करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. ही प्रोसेस अगदी फोनमध्ये व्हॉट्सॲप वापरण्यासारखीच आहे.
व्हॉट्सॲपचे हे नवीन फीचर सध्या काही मर्यादित यूजर्ससाठी रोलआऊट करण्यात आले आहे. कंपनी टप्प्याटप्प्याने हे फीचर सर्व यूजर्ससाठी रोलआऊट करणार आहे. येत्या काही आठवड्यांत एका अपडेटद्वारे हे तुमच्या आयपॅडवरही उपलब्ध होईल, त्यामुळे ॲप स्टोअर तपासत राहा.






