Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारचा मोठा इशारा! व्हॉट्सॲप आणि ई-मेलवरून सुरू आहे ‘Boss Scam’; तुमची एक चूक अन् होईल मोठं नुकसान

सायबर गुन्हेगार आता फसवणुकीसाठी 'Boss Scam' नावाची नवी पद्धत वापरत असल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. गृह मंत्रालयाच्या I4C ने नागरिकांसह सरकारी अधिकारी आणि कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संशयास्पद ई-मेल, व्हॉट्सॲप संदेश आणि लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 28, 2026 | 01:38 PM
सरकारचा मोठा इशारा! व्हॉट्सॲप आणि ई-मेलवरून सुरू आहे 'Boss Scam'; तुमची एक चूक अन् होईल मोठं नुकसान

सरकारचा मोठा इशारा! व्हॉट्सॲप आणि ई-मेलवरून सुरू आहे 'Boss Scam'; तुमची एक चूक अन् होईल मोठं नुकसान

Follow Us
Follow Us:
  • सायबर गुन्हेगार CEO किंवा RBI अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करत आहेत.
  • .ZIP, .EXE आणि .DLL फाइल्सद्वारे डिव्हाइस हॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
  • आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी कॉल किंवा प्रत्यक्ष पडताळणी करणे अत्यावश्यक आहे.
सरकारने पुन्हा एकदा इशारा जारी करत लोकांना नव्या सायबर फ्रॉडबाबत सावध केले आहे. सायबर गुन्हेगार आता लोकांची फसवणूक करण्यासाठी कोणत्या नवीन पद्धतीचा वापर करत आहेत, याबाबत गृह मंत्रालय सूचना जारी केल्या आहेत. यामुळे आता लोकांना सावध राहण्यास सांगितलं असून कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत तुमची वैयक्तिक माहिती शेअर न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Vi यूजर्सची लागली लॉटरी! 3 महिन्यांचे Spotify Premium मिळणार मोफत… कसं? जाणून घ्या सविस्तर

सरकारी विभागांमधील अधिकाऱ्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न

खरं तर सायबर गुन्हेगार आता सामान्य लोकांना नाही तर सरकारी विभागांमध्ये बसलेल्या मोठ्या अधिकाऱ्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न करत आणि त्यांच्याकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करण्याची योजना आखत आहेत. लोकांना व्हॉट्सअ‍ॅप मेसेज किंवा एसएमएसद्वारे खोट्या लिंक पाठवून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  (फोटो सौजन्य: istock) 

बॉस स्कॅम

गृह मंत्रालयाच्या सायबर सिक्योरिटी विंग I4C ने याला बॉस स्कॅम (Boss Scam) असे नाव दिले आहे. I4C ने त्यांच्या एडवाइजरीमध्ये लोकांना सावधगिरीचा इशारा देत सांगितलं आहे की, खोटे ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅप मेसेज इत्यादींपासून सावध राहा. सायबर गुन्हेगार आरबीआयचे अधिकारी किंवा कंपन्यांचे सिईओ असल्याचे भासवून ईमेल किंवा खोटे मेसेज पाठवतात आणि लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात.

व्हॉट्सअ‍ॅप मेसेज, ईमेल किंवा एसएमएसद्वारे सुरु आहे स्कॅम

राष्ट्रीय सायबर गुन्हे धोके विश्लेषण युनिट (NCTAU) आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) यांनी बॉस स्कॅम नावाच्या या फसवणूकच्या नवीन पद्धतीबाबत शोध लावला आहे. यामध्ये सायबर गुन्हेगार उच्चपदस्थ अधिकारी आणि कार्यकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. साायबर गुन्हेगार यांना व्हॉट्सअ‍ॅप मेसेज, ईमेल किंवा एसएमएसद्वारे मालवेयर असलेल्या खोट्या लिंक पाठवतात. ही अतिशय चिंतेची बाबत आहे.

कारण उच्चपदस्थ अधिकारी आणि कार्यकारी अधिकाऱ्यांचा कोणताही डेटा लीक झाला तर राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. याच कारणामुळे I4C ची चिंता देखील वाढली आहे. एजेंसीने म्हटलं आहे की, मालवेयरद्वारे एग्जीक्यूटिव्सच्या व्हिंडोज डिव्हाईस आणि अ‍ॅक्टिव्ह व्हॉट्सअ‍ॅप वेब सेशनचा वापर करून सायबर गुन्हेगार मोठे आर्थिक व्यवहार करू शकतात.

असा होतो स्कॅम

सर्वात आधी सायबर गुन्हेगार सिईओ किंवा उच्च पदावरील अधिकाऱ्यांना ई-मेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क करतात. सायबर गुन्हेगार सिईओ किंवा उच्च पदावरील अधिकाऱ्यांना आरबीआय किंवा इतर नियामक असल्याचे भासवून ईमेल पाठवतात. संपर्क प्रस्थापित झाल्यानंतर सायबर गुन्हेगार एग्जीक्यूटिव्सच्या ईमेल किंवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर .zip, .exe किंवा .dll एक्सटेंशवाल्या फाईल्स पाठवतात. या फाईल्समध्ये मालवेअर लपलेला असतो. जो यूजरच्या डिव्हाईसमध्ये प्रवेश करू शकतो.

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करताना झाली गडबड? चिंता करू नका… अशी दुरुस्त करा तुमची चूक

तुमच्या डिव्हाईसचा अ‍ॅक्सेस गुन्हेगारांच्या हाती

सायबर गुन्हेगारांचा मालवेअर तुमच्या फोनमध्ये एंटर होताच त्यांच्याकडे तुमच्या डिव्हाईसचा संपूर्ण अ‍ॅक्सेस जातो. कार्यकारी अधिकारी फाईल एक्स्ट्रॅक्ट करताच ट्रोजन सुरू होतो. I4C ने इशारा दिला आहे की कोणतेही तातडीचे आर्थिक व्यवहार पुन्हा पडताळून पाहावेत. केवळ थेट कॉल करून किंवा प्रत्यक्ष भेटून खात्री करूनच व्यवहार करा. हल्लेखोर सीईओच्या व्हॉट्सॲप आणि बँक खात्यांमध्येही प्रवेश मिळवतात, ज्यामुळे मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते.

Web Title: Government warns against boss scam i4c issues fresh cyber security advisory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • scam
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.