Vi यूजर्सची लागली लॉटरी! 3 महिन्यांचे Spotify Premium मिळणार मोफत... कसं? जाणून घ्या सविस्तर
कंपनीच्या या निर्णयानंतर पात्र यूजर्सना 3 महिन्यांसाठी स्पॉटिफाय प्रिमियमचा मोफत ॲक्सेस मिळणार आहे. यामुळे यूजर्स कोणत्याही जाहिरातीशिवाय म्यूजिक स्ट्रीमिंग, ऑफलाइन डाउनलोड आणि हाय-क्वालिटी ऑडियो प्लेबॅक सारख्या फीचर्सचा अनुभव घेऊ शकणार आहेत. कंपनीची ही ऑफर 26 जूनपासून निवडक Vi इंडिविजुअल आणि फॅमिली पोस्टपेड प्लॅनवर उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य: istock)
टेलीकॉम सर्विस प्रोवाइडर (TSP) ने दिलेल्या माहितीनुसार, पात्र ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय तीन महिन्यांचे स्पॉटिफाय प्रिमियमचे सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे. हा फायदा अशा यूजर्ससाठी उपलब्ध आहे जे Vi पोस्टपेड प्लॅन्स सक्रिय करतात किंवा ते सुरू ठेवतात. यूजर्स व्हिआय ॲपद्वारे स्पॉटिफाय प्रिमियमचे सब्सक्रिप्शन क्लेम करू शकतात. पण ही ऑफर अशा यूजर्ससाठी आहे, ज्यांनी यापूर्वी स्पॉटिफाय प्रिमियमचे सब्सक्रिप्शन खरेदी केले नाही.
या भागिदारीबाबत भाष्य करताना, व्हिआयचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अवनीश खोसला यांनी सांगितलं की, ‘स्पॉटिफायसोबत भागिदारी करत आम्ही आशयाचे एक उत्कृष्ट मिश्रण उपलब्ध करून देत आहोत, ज्यामुळे ‘Vi’ ही ग्राहकांसाठी पहिली पसंती ठरत आहे.’
स्पॉटिफाय प्रिमियमचे मोफत सब्सक्रिप्शन 451 रुपये, 551 रुपये, 751 रुपये आणि 1,201 रुपये (REDX) किंमतीच्या इंडिविजुअल पोस्टपेड प्लॅनसोबत एक फिक्स्ड बेनिफिट स्वरुपात ऑफर केले जात आहे. तर 701 रुपये, 751 रुपये, 871 रुपये, 1,201 रुपये, 1,301 रुपये, 1,401 रुपये, 1,526 रुपये आणि 1,601 रुपये (REDX Family) किंमतीच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनसोबत देखील स्पॉटिफाय प्रिमियमचे मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन… सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना
व्हिआयचे असं म्हणणं आहे की, फॅमिली प्लॅन खरेदी केल्यानंतर केवळ प्रायमरी यूजरला स्पॉटिफाय प्रिमियमचे मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे. प्रमोशनल कालावधी संपल्यानंतर यूजर्सना व्हिआयच्या ‘एड टू बिल’ फॅसिलिटीचा वापर करून त्यांचे स्पॉटिफाय प्रिमियम सब्सक्रिप्शन सुरु ठेवण्याचा पर्याय मिळणार आहे. ज्यासाठी यूजर्सना दर महिना 139 रुपये खर्च करावे लागणार आहेत.






