
ChatGPT ला कामं सोपवा आणि विसरून जा! रिमाइंडरपासून रोजच्या कामांपर्यंत सगळं होणार ऑटोमॅटिक... जाणून घ्या कसं काम करणार 'हे' फीचर
या फीचरमध्ये यूजर्सना वेगवेगळी काम शेड्यूल करण्याटी सुविधा मिळणार आहे. समजा, तुम्ही चॅटजीपीला सांगतले की, रोज सकाळी 8 वाजता ताज्या बातम्या सांग. तर तुम्हाला पुन्हा रिमाईंडर देण्याची किंवा कमांड देण्याची गरज नाही. चॅटजीपीटी रोज सकाळी स्वत:हून तुम्हाला ताज्या बतम्या सांगेल. अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळी काम देखील चॅटजीपीटीला सोपवू शकता. यामुळे तुमच्यावरील कामाचा भार हलका होणार आहे. तसेच अनेक काम ऑटोमॅटिक पद्धतीने केली जातील. ज्यामुळे तुम्हाला दररोज काम लक्षात ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. (फोटो सौजन्य: Pinterest)
मिळालेल्या माहितीनुसार, शेड्यूल टास्क आता चॅटजीटीपीमधील एक नवीन सेक्शन आहे. या सेक्शनमध्ये यूजर्स ऑटोमॅटिकली त्यांची कामं मॅनेज करू शकणार आहेत. या अपडेटमध्ये चॅटजीपीटीला काही खास वेळ आणि अटींच्या आधारावर काम करण्यासाठी सेट केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्ही चॅटजीपीटीला एखादी मिटींगची आठवण करून देण्यासाठी, रोज कोणत्या रिपोर्टची माहिती देण्यासाठी किंवा एखाद्या विषयावरील महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर नोटिफिकेशन पाठवण्यासाठी या शेड्यूल फीचरचा वापर करू शकता.
या फीचरची विशेषत: म्हणजेच चॅटजीपीटी बॅकग्राऊंडमध्ये काम करताना देखील महत्त्वाच्या कामांची आठवण करून देऊ शकतो. यूजरने एकदा टास्क सेट केले की एआय त्यानंतर आपोआप नोटिफिकेशन पाठवणार आहे.
वन-टाइम टास्क, रिकरिंग टास्क आणि मॉनिटरिंग टास्क असे तीन पर्याय यूजर्सना मिळणार आहेत. वन-टाइम टास्क म्हणजेच कोणत्याही एका विशिष्ट वेळेसाठी सेट करण्यात आलेले टास्क. तर रिकरिंग टास्क म्हणजेच रोज, साप्ताहिक किंवा नेहमीसाठी सेट करण्यात आलेले टास्क. एखाद्या विशिष्ट विषयावर किंवा माहितीवर लक्ष ठेवणारी आणि केवळ आवश्यक बदल घडल्यासच सूचना अलर्ट पाठवणारे टास्क म्हणजे मॉनिटरिंग टास्क.