Tech Tips: कशी काम करते Dish TV ची छत्री? 99 टक्के लोकांना नाही माहिती यामागील तंत्रज्ञान
प्रत्येक घराच्या छतावर तुम्ही एक गोलाकार आकाराची डिश अँटिना नक्कीच पाहिला असेल. ही तीच डिश टीव्हीची छत्री आहे. ज्याच्या मदतीने टीव्ही चॅनल आपल्या स्क्रीनपर्यंत पोहोचतात. अनेक लोकांना केवळ ही एक सामान्य छत्री वाटते. मात्र यामागील तंत्रज्ञान खूपच कठीण आणि गुंतागुंतीचे आहे. ही डिश टीव्हीची छत्री कशी काम करते, याबाबत अद्याप अनेकांना माहिती नाही. आता आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला या कठीण आणि गुंतागुंतीचे तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळणार आहे.
डिश टीव्हीच्या छत्रीचे मुख्य काम सॅटेलाईटद्वारे येणारे सिग्नलला पकडणे आहे. टिव्ही चॅनलचे प्रसारण सर्वात आधी जमिनीपासून हजारो किलोमीटर वर उपस्थित असलेल्या जिओ स्टेशनरी सॅटॅलाइटपर्यंत पोहोचवले जातं. हे सॅटॅलाइट त्याच वेगाने पृथ्वी सोबत फिरते, ज्यामुळे ते नेहमी एकाच ठिकाणी पाहायला मिळते. डिश अँटिना या सॅटलाईटद्वारे येणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीला कॅप्चर करते. यानंतर तुमच्या टीव्हीचा स्क्रीन वरती चित्रपट, सिरीज किंवा स्पोर्ट्स पाहायला मिळतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
डिश टीव्हीद्वारे आपल्या टीव्हीवर चित्रपट, स्पोर्ट्स आणि वेब सिरीज कसे दिसतात, हे तर आपल्याला समजलं. मग डिश टीव्हीचा आकार गोल का असतो, याबाबत अनेकांना माहिती नाही. या आकाराची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे येणाऱ्या कमजोर सिग्नल्सला देखील एका बिंदूवर केंद्रित करते. या बिंदूला फोकल पॉईंट असं म्हटलं जातं आणि हेच डिशमध्ये लावलेल्या LNB (Low Noise Block Converter) सिग्नलला रिसीव्ह करते. LNB डिश एक महत्त्वपूर्ण भाग आहे. याचं काम सॅटेलाईटद्वारे येणाऱ्या हाय फ्रिक्वेन्सी तरंगांना कॅप्चर करणे असा आहे. ते या सिग्नलना आवाज कमी करणाऱ्या, कमी-फ्रिक्वेन्सी सिग्नलमध्ये रूपांतरित करते. ते रूपांतरित सिग्नल कोएक्सियल केबलद्वारे तुमच्या सेट-टॉप बॉक्समध्ये पाठवते.
जेव्हा सिग्नल सेट टॉप बॉक्सपर्यंत पोहोचतात तेव्हा ते डिजिटल कोडच्या स्वरूपात असतात. सेट टॉप बॉक्स या कोड्सना डीकोड करतात. त्यानंतर हे कोर्स तुमच्या टीव्हीवर समजले जातील, अशा ऑडिओ आणि व्हिडिओ सिग्नलमध्ये रूपांतरित केले जातात. छत्री+ LNB + सेट-टॉप बॉक्स टिश टीव्ही वर येणाऱ्या चित्र आणि आवाजाची खरे कारण आहे.
तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल जेव्हा पाऊस किंवा वादळ येतो तेव्हा टीव्ही वरील सिग्नल जातो. यामागील कारण आहे की पावसाचे थेंब आणि ढग मायक्रोवेव्ह सिग्नल शोषून घेतात. यामुळे सॅटेलाइट्समध्ये येणारे सिग्नल्स कमजोर होतात आणि डिश टीव्ही सिग्नल पकडत नाही.आज Dish TV मध्ये HD आणि 4K ब्रॉडकास्टिंग देखील या टेक्नॉलॉजी शक्य आहे. येणाऱ्या काळात आणखी ऍडव्हान्स सॅटेलाईट आणि IPTV (Internet Protocol TV) टेक्नॉलॉजी मिळून आणखी वेगवान स्थिर आणि चांगला सिग्नल तयार करू शकतील.