नवीन अवतारात येणार Ducati DesertX, टेस्टिंग दरम्यान झाली स्पॉट
ऑटो बाजारात बाईकच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. यातही अनेक जणांची पहिली पसंत ही ॲडव्हेंचर बाईकला असते. तरुणांना तर स्टायलिश आणि हाय परफॉर्मन्स बाईकची तर भुरळ असते. अशातच आता लोकप्रिय सुपरबाईक ब्रँड Ducati त्यांची बाईक नवीन अवतारात अपडेट करत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
इटालियन सुपरबाइक ब्रँड Ducati आपली प्रसिद्ध ॲडव्हेंचर बाईक DesertX नव्या अवतारात आणण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच ही बाईक टेस्टिंगदरम्यान कॅमोफ्लाजमध्ये दिसली, जिथून याच्या डिझाइन आणि इंजिनमधील मोठे बदल उघड झाले आहेत. कंपनीने जुन्या 937cc Testastretta इंजिनऐवजी आता नवीन आणि हलके 890cc V2 इंजिन दिले आहे, जे केवळ अधिक पॉवरफुलच नाही तर अधिक इंधन कार्यक्षम देखील आहे.
तुमच्या कारमध्ये Dashcam का असला पाहिजे? खरेदी करण्याअगोदर फायदे जाणून घ्या
Ducati DesertX 2025 मध्ये वापरलेले 890cc V2 इंजिन आधीपेक्षा अधिक डायनॅमिक आणि कार्यक्षम आहे. हेच इंजिन Multistrada V2 मध्ये दिले जाते, जिथे ते 115.6 bhp पॉवर आणि 92.1 Nm टॉर्क निर्माण करते. सध्याच्या DesertXच्या तुलनेत हे इंजिन सुमारे 5 bhp अधिक पॉवरफुल आणि जवळपास 5.8 किलो हलके आहे. त्यामुळे बाईकची हँडलिंग, ऑफ-रोड परफॉर्मन्स आणि हाय-स्पीड क्रूझिंग क्षमतांमध्ये सुधारणा होईल. Ducati ने या मॉडेलसाठी नवीन चेसिस आणि फ्रेम डिझाइनवरही काम केले आहे, ज्यामुळे ती अधिक संतुलित आणि लाइटवेट वाटते.
नवीन DesertX चे एकूण डिझाइन जुन्या मॉडेलप्रमाणेच राहील, पण काही छोटे अपडेट्स तिला आणखी स्टायलिश बनवतात. टेल सेक्शन पुन्हा डिझाइन करण्यात आले आहे, ज्यामुळे ती अधिक स्पोर्टी आणि मॉडर्न दिसते. नवीन स्विंगआर्म या बाईकला उत्तम स्टॅबिलिटी प्रदान करते आणि वजनही कमी करतो. फ्रंट ट्विन-हेडलॅम्प सेटअप पूर्ववत ठेवत Ducati ने आता उंच विंडस्क्रीन दिली आहे, ज्यामुळे तिचा ॲडव्हेंचर लूक अधिक खुलतो. तसेच, रायडिंग पोझिशन आणि सीट डिझाइनमध्येही बदल केले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लांब प्रवास आणि ऑफ-रोड राइडिंगदरम्यान अधिक आराम मिळेल.
Renault च्या 3 नवीन कार मार्केटमध्ये एंट्री मारण्याच्या तयारीत, कोणत्या सेगमेंटमध्ये होईल लाँच?
नवीन Ducati DesertX सध्या टेस्टिंग स्टेजमध्ये आहे आणि याचा ग्लोबल डेब्यू 2025 च्या शेवटी EICMA शो दरम्यान होण्याची शक्यता आहे. भारतात ही बाईक 2026 च्या सुरुवातीस लाँच होऊ शकते. सध्याच्या DesertX ची किंमत 17.9 लाख रुपये आहे, तर नवीन मॉडेलची किंमत 18 ते 19 लाखांदरम्यान असण्याची अपेक्षा आहे.
भारतीय मार्केटमध्ये नवीन Ducati DesertX चे स्पर्धक Triumph Tiger 900, BMW F 850 GS, आणि Honda Africa Twin सारख्या प्रीमियम ॲडव्हेंचर बाईक्स असतील.