रिचा घोषची तुफानी खेळी (Photo Credit- X)
कोलंबो: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना रविवारी, ५ ऑक्टोबर रोजी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने (IND-W) निर्धारित ५० षटकांत सर्व गडी गमावून २४७ धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर २४८ धावांचे आव्हान ठेवले. भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले, तर पाकिस्तानी गोलंदाजांनीही अनेक महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
𝗜𝗻𝗻𝗶𝗻𝗴𝘀 𝗕𝗿𝗲𝗮𝗸!#TeamIndia post 2⃣4⃣7⃣ on the board with a strong finish! 👏 4⃣6⃣ for Harleen Deol
3⃣5⃣* for Richa Ghosh
3⃣2⃣ for Jemimah Rodrigues
3⃣1⃣ for Pratika Rawal Over to our bowlers! 👍 Scorecard ▶ https://t.co/9BNvQl3J59#WomenInBlue | #CWC25 pic.twitter.com/ImHZyMBY6m — BCCI Women (@BCCIWomen) October 5, 2025
टीम इंडियाच्या फलंदाजांनी सुरुवातीला संथ गतीने खेळ केला असला तरी, मधल्या फळीतील खेळाडूंनी संघाची धावसंख्या सन्मानजनक स्तरावर नेली. हरलीन देओलने सर्वाधिक ४६ धावा (६५ चेंडू) केल्या. जेमिमा रॉड्रिग्जने ३७ चेंडूत ३२ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. सर्वात प्रभावी ठरली ती यष्टिरक्षक रिचा घोष. तिने शेवटच्या षटकांमध्ये १७५.० च्या जलद स्ट्राईक रेटने फलंदाजी करत नाबाद ३५ धावा केल्या, ज्यामुळे संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. सलामीवीर प्रतिका रावल (३१ धावा) आणि स्मृती मानधना (२३ धावा) यांनी संघाला चांगली सुरुवात दिली होती, मात्र कर्णधार हरमनप्रीत कौर (३४ चेंडूत १९ धावा) अपयशी ठरली.
पाकिस्तानी गोलंदाजांनी भारताला ५० षटके खेळू दिले असले तरी, वेळोवेळी महत्त्वपूर्ण विकेट्स घेत भारताचा धावगती नियंत्रित ठेवला. डायना बेगने १० षटकांत ६९ धावा देत २ विकेट्स घेतल्या. सादिया इक्बालने १० षटकांत ४७ धावा देत २ विकेट्स मिळवल्या.कर्णधार फातिमा सना हिने केवळ ३८ धावा देत २ विकेट्स घेऊन प्रभावी गोलंदाजी केली. नशरा संधू आणि रमीन शमीम यांनीही आपापल्या षटकांत बळी मिळवले. आता पाकिस्तान महिला संघ २४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आहे. भारतीय गोलंदाजांच्या कडक लाईन आणि लेंथचा सामना करणे पाकिस्तानी फलंदाजांसाठी एक मोठे आव्हान असणार आहे.