पिंपरी-चिंचवड महापालिकेत दिवाळी बोनस जाहीर; अधिकारी-कर्मचारी होणार आनंदात
PCMC News: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीच मोठा आनंदाची बातमी आहे. महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिवाळी बोनस जाहीर केला असून, यामध्ये महापालिकेत कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत. यामध्ये सेवानिवृत्त, निलंबित किंवा मानधनावर कार्यरत कर्मचारीही लाभार्थी आहेत.