Tech Tips: किती असतं Gaming Laptop चे आयुष्य? खरेदी करण्यापूर्वी वाचा सत्य, नाहीतर कराल पश्चाताप
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सहसा एका चांगल्या गेमिंग लॅपटॉपचे आयुष्य 5 ते 7 वर्षांचे असते. पण नेहमी लक्षात ठेवा की कोणत्याही डिव्हाईसचे आयुष्य यूजर्सच्या वापरावर अवलंबून असते. तुम्ही कशी पद्धतीने लॅपटॉपचा वापर करता, यावर गेमिंग लॅपटॉपचे आयुष्य अवलंबून असतं. सहसा लोकं गेमिंग लॅपटॉपचा नेहमी वापर करतात, मात्र वेळोवेळी लॅपटॉपच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. यासोबतच अनेकदा लोकं गेमिंग लॅपटॉप पलंगावर किंवा अशा ठिकाणी ठेवतात, जिथे हवेचा प्रवाह योग्य नसतो. यामुळे डिव्हाईसचे आयुष्य कमी होऊ शकते. (फोटो सौजन्य: Pinterest)
गेमिंग लॅपटॉपचे आयुष्य केवळ त्याची किंमत ठरवत नाही. यामागे अनेक कारणं असतात. याबद्दल आता जाणून घेऊया.
तुम्ही काही सोप्या टिप्सचा वापर करून गेमिंग लॅपटॉपचे आयुष्य आणखी काही वेळासाठी वाढवू शकता. लॅपटॉपचे व्हेंट्स आणि फॅन्स नियमितपणे स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच, सिस्टिम नेहमी एका कठीण, सपाट पृष्ठभागावरच वापरली पाहिजे. लॅपटॉपचा वापर करताना हवेचा प्रवाह योग्य असेल याची खात्री करा. आवश्यक असल्यास, कूलिंग पॅडचा वापर करणं डिव्हाईससाठी फायदेशीर ठरू शकते. बॅटरी सतत 100% चार्ज करू नये. यामुळे डिव्हाईसची बॅटरी लाईफ खराब होऊ शकते, परिणाम गेमिंग लॅपटॉपचे आयुष्य देखील कमी होऊ शकते.
जर तुम्ही नवीन गेमिंग लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, अशा मॉडेलची निवड करा ज्यामध्ये तुम्हाला लेटेस्ट प्रोसेसर, चांगली कूलिंग सिस्टिम, जास्त रॅम आणि एसएसडी स्टोरेज मिळेल. यासोबत, भविष्यात डिव्हाईसचे रॅम किंवा स्टोरेज अपग्रेड करण्याच्या पर्याय मिळणार असल्याची खात्री करा. यामुळे तुमच्या लॅपटॉपची कार्यक्षमता पुढील अनेक वर्षे टिकून राहील याची खात्री होईल.






