
Refrigerator Electricity Bill: फ्रीजमधील ‘हा’ आकडा ठरवतो (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आपल्या फ्रीजमध्ये आतमध्ये 1 ते 7 किंवा 1 ते 5 पर्यंत नंबरचा एक गोल बटण असतात. फ्रीजमध्ये 90 टक्के लोकांना वाटतं की 1 नंबरवर जास्त थंडी होते आणि 7 नंबरवर कमी. पण हे एकदम उलट आहे. फ्रीजमध्ये नंबर जेवढा मोठा, तेवढी थंडी जास्त होते. तुम्ही 7 नंबरवर ठेवलं तर फ्रीज जास्त थंड होईल. त्यासाठी त्याचं इंजिन म्हणजे कॉम्प्रेसर जास्त वेळ चालेल आणि जास्त लाईट खाईल.हिवाळ्यात बाहेर थंडी असते, तरी पण जर तुमचा फ्रीज 6 किंवा 7 नंबरवर असेल तर तो उगाचच जास्त बर्फ बनवत राहतो आणि वीज फुकट घालवतो. जरी जास्त थंड केलं तरी 5 ते 10 टक्के लाईट जास्त लागते.
बाहेरच्या हवामानानुसार फ्रीजचा नंबर बदला.हिवाळ्यात: बाहेर आधीच थंडी असते, त्यामुळे फ्रीजला जास्त काम करायची गरज नाही. त्याला 1 किंवा 2 नंबरवर ठेवा, पावसाळ्यात थोडी दमट हवा असते, त्यामुळे फ्रीज 3 किंवा 4 नंबरवर ठेवायला पाहिजे. उन्हाळ्यात जेव्हा खूप गरम होतं तेव्हाच फ्रीज 5 ते 7 नंबरवर ठेवा. म्हणजे जेवण खराब होणार नाही. डिजिटल फ्रीज असेल तर 3 ते 5 डिग्रीवर ठेवा. त्यामुळे तुमचे वीज बिल वाचू शकते.
फक्त नंबर बदलूनच नाही तर या 4 गोष्टी केल्या तरी फायदा होईल.
1. गरम जेवण थेट फ्रीजमध्ये ठेवू नका: बऱ्याच बायका गरम भाजी किंवा गरम दूध थेट फ्रीजमध्ये ठेवतात. असं करू नका. आधी ते बाहेर थंड होऊ द्या, मगच आत ठेवा. गरम वस्तू ठेवल्याने फ्रीजला थंड करण्यासाठी 24 टक्के जास्त लाईट लागते.
2. बर्फ साचला तर काढून टाका: फ्रीजरमध्ये जर बर्फाचा जाड थर साचला असेल तर डिफ्रॉस्ट बटण दाबा. बर्फामुळे फ्रीजला डबल काम करावं लागतं.
3. फ्रीज खचाखच भरू नका: फ्रीज गच्च भरला तर त्यात थंड हवा फिरत नाही. थोडा मोकळा ठेवा म्हणजे हवा सगळीकडे जाईल आणि जेवण पण चांगलं राहील.
4. दाराचं रबर चेक करा: फ्रीजच्या दाराला जे रबर असतं ते सैल झालंय का बघा. ते खराब झालं तर आतली थंड हवा बाहेर जाते आणि फ्रीज कधीच बंद होत नाही. त्यामुळे बिल खूप जास्त येतं. एखादा कागद दारात लावून बघा, जर कागद सहज निघत असेल तर रबर बदलायची वेळ आली आहे.तर मग आजच जा आणि तुमच्या फ्रीजचा नंबर बघा. कोणत्या ऋतूत कोणता नंबर ठेवायचा हे आता तुम्हाला कळलंच आहे. ही छोटीशी सवय तुम्हाला वर्षाला हजारो रुपये वाचवून देईल.