Netflix आणि JioHotstar सारख्या ॲप्सचं सब्सक्रिप्शन खरेदी करणं महाग पडतंय? पैसे वाचवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
ओटीटी प्लॅटफॉर्मच्या आगमनानंतर, आता कंटेंट पाहण्याची पद्धत बदलली आहे. कारण यापूर्वी केवळ टिव्हीच्या माध्यामातून आपण टिव्ही सिरीयल आणि चित्रपट पाहण्याची मजा घेऊ शकत होतो. मात्र आताच्या डिजीटल जगात कंटेंट पाहण्याची पद्धत बदलली आहे. त्यामुळे आता लोकांना कोणताही चित्रपट किंवा टिव्ही सिरीयल पाहण्यासाठी जास्त वाट पाहण्याची गरज नाही. कारण तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर डाऊनलोड केलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही अगदी कधीही आणि कुठेही तुमचे आवडते चित्रपट किंवा टिव्ही सिरीयल पाहू शकता.
आता लोकांना त्यांचा आवडता चित्रपट पाहण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आता नेटफ्लिक्स, जिओहॉटस्टार आणि अमेझॉन प्राइम व्हिडिओसह अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत, जे चित्रपटांपासून ते क्रीडा आणि लाईव्ह टीव्ही चॅनेल ते टीव्ही सिरीयल घरी बसून आणि अगदी तुम्हाला प्रवासातही कंटेट पाहण्याची सुविधा प्रदान करतात. तथापि, त्यांच्या महागड्या सबस्क्रिप्शन प्लॅनमुळे तुमच्या खिशावरचा भार वाढू शकतो. आज आम्ही काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्या फॉलो करून तुम्ही या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन कमी किंमतीत खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
बहुतेक ओटीटी प्लॅटफॉर्म त्यांच्या वार्षिक प्लॅनवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर करतात. अशाप्रकारे, मंथली प्लॅनऐवजी वार्षिक प्लॅन घेऊन पैसे वाचवता येऊ शकतात. उदाहरणार्थ, JioHotstar च्या एका महिन्याच्या प्रीमियम प्लॅनची किंमत 299 रुपये आहे, तर त्याचा वार्षिक प्लॅन फक्त 1,499 रुपये आहे. जर कोणी मंथली प्रीमियम प्लॅन घेतला तर त्याला 12 महिन्यांसाठी 3588 रुपये द्यावे लागतील, तर वार्षिक प्लॅन घेतल्यास तो 2000 रुपयांपेक्षा जास्त बचत करू शकतो. त्यामुळे ओटीटी प्लॅनच्या सबस्क्रिप्शनसाठी वार्षिक प्लॅनची निवड करू शकता, ज्यामुळे पैशांची देखील बचत होणार आहे.
JioHotstar आणि Netflix सह जवळजवळ सर्व प्लॅटफॉर्म अकाउंट शेअरिंगची सुविधा प्रदान करतात. अशाप्रकारे, तुमचे अकाउंट तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करून पैसे वाचवता येतात. JioHotstar च्या प्रीमियम प्लॅनमध्ये, एकाच वेळी 4 डिव्हाईसवर कंटेंट अॅक्सेस करता येतो. अशा प्रकारे 1499 रुपये चार लोकांमध्ये स्प्लिट केले जाऊ शकतात. अशा प्रकारे खर्चही कमी होईल.
Aadhaar Card Update: स्कॅमर्सपासून वाचण्यासाठी वापरा ही ट्रीक, अशा प्रकारे लॉक करा तुमचं आधार कार्ड
जिओ, व्होडाफोन आणि एअरटेल त्यांच्या अनेक रिचार्ज प्लॅनसह ओटीटी सबस्क्रिप्शन देखील देत आहेत. अशाप्रकारे, सबस्क्रिप्शन न घेताही या प्लॅटफॉर्मवर कंटेंट अॅक्सेस करता येतो. जिओच्या 1029 रुपयांच्या रिचार्जमध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएससह 3 महिन्यांची अमेझॉन लाईट मेंबरशिप मिळते. त्याचप्रमाणे, एअरटेलचा 1798 रुपयांचा प्लॅन डेटासह 84 दिवसांसाठी बेसिक नेटफ्लिक्स प्लॅन देतो.