Aadhaar Card Update: स्कॅमर्सपासून वाचण्यासाठी वापरा ही ट्रीक, अशा प्रकारे लॉक करा तुमचं आधार कार्ड
आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. नवीन सिम कार्ड खरेदी करण्यापासून ते नवीन बँक अकाऊंट ओपन करण्यापर्यंत आधार कार्ड आपल्याला आपल्या प्रत्येक कामांसाठी आवश्यक आहे. इतकंच नाही तर ऑफीस असो किंवा कॉलेज आपल्याला सर्वच ठिकाणी सर्वात आधी आधार कार्ड विचारलं जातं. त्यामुळे प्रत्येक भारतीयासाठी आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. त्यामुळे आपल्या सर्व कामांसाठी गरजेचं असणार आधार कार्ड सुरक्षित ठेवणं आपली जबाबदारी आहे.
आधार कार्डची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. त्यात नाव, पत्ता, बायोमेट्रिक्स आणि मोबाईल नंबर सारखी माहिती असते, जी एखाद्या चुकीच्या व्यक्तिच्या हाती पडल्यास आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आपलं आधार कार्ड लॉक करण्याच्या फीचरचा तुम्ही वापर करू शकता. आता आम्ही तुम्हाला बायोमेट्रिक तपशील ऑनलाइन लॉक करण्याची संपूर्ण पद्धत सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचं आधार कार्ड सुरक्षित राहण्यासाठी मदत होईल आणि तुमची माहिती कोणत्याही चुकीच्या व्यक्तिच्या हाती पडणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
UIDAI आधार बायोमेट्रिक लॉक नावाची एक विशेष सुविधा प्रदान करते. हे वैशिष्ट्य तुमचे फिंगरप्रिंट, आयरिस आणि फेस डेटा लॉक करते. हे फीचर सक्रिय केल्यानंतर, तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमचा आधार वापरू शकत नाही. आधारवर आधारित बनावट पडताळणी आणि बनावट बँकिंग व्यवहार रोखण्यासाठी हे वैशिष्ट्य एक अतिशय प्रभावी मार्ग आहे.
अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड लॉक करू शकता आणि चुकीच्या व्यक्तिंपासून तुमचं आधार कार्ड सुरक्षित ठेऊ शकता. यामुळे तुमचं नुकसान होणार आणि तुमच्या आधार कार्डचा गैरवापर देखील केला जाणार नाही.