Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना! ‘या’ अ‍ॅप्सवरून करा घरबसल्या पूर्ण E-KYC

LPGछ घरगुती एलपीजी गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे आता अत्यावश्यक झाले आहे. वेळेत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढील गॅस सिलेंडर बुकिंगमध्ये अडचणी येऊ शकतात किंवा पुरवठा उशिरा होण्याची शक्यता आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 02, 2026 | 11:24 AM
LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना!(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना!(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • LPG कनेक्शनधारकांसाठी e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • e-KYC न केल्यास गॅस सिलेंडर बुकिंगमध्ये अडचणी येऊ शकतात.
  • अधिकृत अ‍ॅप किंवा वितरकाकडे जाऊन ही प्रक्रिया लवकर पूर्ण करा.
E-KYC LPG Cylinder: घरगुती गॅस वापरणाऱ्या लाखो ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. आता एलपीजी कनेक्शनधारकांनी वेळेत ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे आवश्यक झाले आहे. ही प्रक्रिया न केल्यास पुढील गॅस सिलेंडर बुक करताना अडचणी येऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये बुकिंग स्वीकारले जाणार नाही किंवा उशिरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करणे फायदेशीर ठरेल.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी गॅस एजन्सीच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. स्मार्टफोनच्या मदतीने काही मिनिटांत ही प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करता येते. त्यामुळे वेळही वाचतो आणि अनावश्यक त्रासही टळतो.

ई-केवायसीची गरज का निर्माण झाली?

गॅस कनेक्शनचा गैरवापर थांबवणे आणि खरी ग्राहक माहिती अद्ययावत ठेवणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. अनेक ठिकाणी चुकीच्या नावाने किंवा बनावट माहितीच्या आधारे गॅस कनेक्शन वापरले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाची ओळख निश्चित करण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे.

सरकारच्या या उपक्रमामुळे योग्य लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोणत्या ग्राहकांनी काय करावे?

देशातील प्रमुख गॅस कंपन्यांनी ग्राहकांसाठी स्वतंत्र मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले आहेत. संबंधित कंपनीचे अधिकृत अॅप डाउनलोड करून ई-केवायसी सहज करता येते.

इंडियन ऑइलचे ग्राहक IndianOil One अॅप वापरू शकतात. भारत गॅसचे ग्राहक Hello BPCL अॅपचा वापर करू शकतात, तर एचपी गॅसचे ग्राहक HP Pay अॅपच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. ही सर्व अॅप्स प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहेत.

घरातूनच ई-केवायसी कशी कराल?

प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी तयार ठेवा. आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक, गॅस ग्राहक क्रमांक आणि नोंदणीवेळी दिलेली माहिती जवळ असणे आवश्यक आहे.

यानंतर संबंधित गॅस कंपनीचे अॅप डाउनलोड करून त्यात मोबाईल नंबर किंवा ग्राहक क्रमांकाच्या मदतीने लॉगिन करा. अॅपमध्ये ई-केवायसीचा पर्याय निवडा. पुढे चेहऱ्याची पडताळणी करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन अॅप वापरण्याची सूचना दिसेल. आवश्यक स्टेप्स पूर्ण केल्यानंतर तुमची माहिती तपासली जाईल आणि ई-केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण होईल.

संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होत असल्यामुळे एजन्सीमध्ये जाण्याची गरज राहत नाही.

वेबसाइटद्वारेही मिळते सुविधा

ज्यांना मोबाईल अॅप वापरणे सोयीचे वाटत नाही, त्यांच्यासाठी ऑनलाइन वेबसाइटचाही पर्याय उपलब्ध आहे. वेबसाइटवर आवश्यक माहिती भरून ओळख पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करता येते. विशेषतः ग्रामीण भागातील किंवा उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही सुविधा खूप उपयोगाची ठरू शकते.

स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना

प्रक्रिया पूर्ण न केल्यास काय होऊ शकते?

  • ई- केवायसी वेळेत न केल्यास गॅस बुकिंग कोणत्या अडचणी येऊ शकतात.
  • गॅस बुकिंग करताना अडचणी
  • गॅस येण्यास अडचणी
  • बुकिंग प्रलंबित राहू शकते

अडचण आल्यास काय कराल?

कधी कधी इंटरनेटचा वेग कमी असणे किंवा तांत्रिक कारणांमुळे प्रक्रिया पूर्ण होत नाही. अशा वेळी घाबरण्याची गरज नाही. जवळच्या गॅस वितरकाशी संपर्क साधून प्रत्यक्ष बायोमेट्रिक पडताळणीद्वारे ई-केवायसी करता येते. तसेच ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क करूनही आवश्यक मदत मिळू शकते.

Friendship Day 2026: फ्रेंडशिप डे होईल आणखी खास! Gemini AI च्या मदतीने बनवा मित्रांसोबतचे अनोखे फोटो, वापरा हे प्रॉम्प्ट्स

शेवटी…

ई-केवायसी ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आणि गॅस वितरण अधिक पारदर्शक करण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. काही मिनिटांचा वेळ देऊन ही प्रक्रिया पूर्ण केल्यास भविष्यातील गॅस बुकिंग कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहील. त्यामुळे अजून ई-केवायसी केली नसेल, तर आजच मोबाईलवरून ती पूर्ण करा आणि पुढील त्रास टाळा.

Web Title: How to complete e kyc of lpg cylinders at home useful apps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • Gas Cylinder
  • LPG
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung India चा मोठा धमाका! 2026 Bespoke AI Appliances ची नवी श्रेणी लॉन्च
1

Samsung India चा मोठा धमाका! 2026 Bespoke AI Appliances ची नवी श्रेणी लॉन्च

iPhone 18 Pro साठी मुंबईकरांची क्रेझ! Apple Store बाहेर रात्रीपासूनच चाहत्यांची रांग
2

iPhone 18 Pro साठी मुंबईकरांची क्रेझ! Apple Store बाहेर रात्रीपासूनच चाहत्यांची रांग

22 तारखेपर्यंत थांबा! OnePlus चा सर्वात स्वस्त फोन येतोय, 7,000mAh बॅटरीसह फीचर्सही दमदार
3

22 तारखेपर्यंत थांबा! OnePlus चा सर्वात स्वस्त फोन येतोय, 7,000mAh बॅटरीसह फीचर्सही दमदार

Online Shopping Safety Tips:  एका चुकीच्या क्लिकने खाते होऊ शकते रिकामे; ऑनलाईन खरेदीपूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 3 गोष्टी
4

Online Shopping Safety Tips: एका चुकीच्या क्लिकने खाते होऊ शकते रिकामे; ऑनलाईन खरेदीपूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 3 गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.