Tech Tips: अरेरे! स्मार्टफोनमधून फोटो झाले डिलीट? काळजी करण्याची गरज नाही, या टीप्स करणार तुमची मदत
लोकं स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी त्याची कॅमेरा क्वालिटी चेक करतात. कुठेही फिरायला जाताना आपल्यासोबत मोठा कॅमेरा घेऊन जाणं, शक्य नसतं. अशावेळी आपण आपल्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याच्या मदतीने फोटोग्राफी करतो. आपण एक- एक फोटो क्लिक करतो आणि आपल्या फोनमध्ये सेव्ह करत जातो. पण असं करताना आपल्या फोनमध्ये आधीपासून सेव्ह असलेले फोटो आपल्याकडून चुकून डिलीट होऊ शकतात.
स्मार्टफोनमधून फोटो डिलीट झाले तर अनेक लोकं टेंशनमध्ये येतात. हे फोटो कसे रिकव्हर करायचे, हेच अनेकांना माहिती नसते. तुम्ही देखील याच समस्येचा सामना करत आहात का? फोनमधून डिलीट झालेले फोटो कसे रिकव्हर करायचे, याबद्दल आता आपण जाणून घेऊया. जर तुम्ही तुमच्या फोनमधून डिलीट केलेले फोटो रिकव्हर करण्याचा मार्ग शोधत असाल, तर ही बातमी तुमची समस्या सोडवू शकते. येथे आम्ही तुम्हाला फोनमधून डिलीट केलेले फोटो कसे रिकव्हर करायचे याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत. ही प्रोसेस अगदी सोपी आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
जर तुम्ही तुमचे फोटो गुगल फोटोजमध्ये सेव्ह केलेले असतील आणि ते डिलीट झाले तर काही सोप्या स्टेप्सच्या मदतीने ते रिकव्हर केले जाऊ शकतात.
वर सांगितलेल्या पद्धतीचा वापर करून तुम्ही फोनमधून डिलीट केलेले फोटो रिकव्हर करू शकता. तथापि, या पर्यायाचा वापर करून तुम्ही 60 दिवसांपूर्वी डिलीट केलेले फोटो रिकव्हर करू शकणार नाही.
जर तुमच्या फोनमध्ये गुगल फोटो अॅप नसेल तर तुमचे सर्व फोटो गॅलरीमध्ये सेव्ह होत असतील. जर तुम्ही या अॅपऐवजी फोनच्या फोटो गॅलरी अॅपचा वापर केला तर तुम्ही तुमच्या फोनमधून डिलीट केलेले फोटो देखील काही सोप्या पद्धतीने रिकव्हर करू शकता. तथापि, येथे तुम्ही 30 दिवसांपेक्षा जुने डिलीट केलेले फोटो रिकव्हर करू शकणार नाही.
WWDC 2025: Apple CarPlay साठी लाँच केले 3 नवीन फीचर्स, लाईव्ह अॅक्टिव्हिटीजसह होणार हे मोठे बदल