Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: पावसाळ्यात इन्व्हर्टर-बॅटरीची कशी कराल योग्य देखभाल? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

पावसाळ्यात वारंवार वीज खंडित होत असल्याने घरातील इन्व्हर्टर आणि बॅटरीचे महत्त्व अधिक वाढते. मात्र योग्य देखभाल न केल्यास त्यांचा बॅकअप कमी होऊ शकतो आणि दुरुस्तीसाठी अतिरिक्त खर्चही करावा लागू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 31, 2026 | 12:49 PM
Tech Tips: पावसाळ्यात इन्व्हर्टर-बॅटरीची कशी कराल योग्य देखभाल? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

Tech Tips: पावसाळ्यात इन्व्हर्टर-बॅटरीची कशी कराल योग्य देखभाल? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात इन्व्हर्टर आणि बॅटरी नेहमी कोरड्या, हवेशीर आणि ओलाव्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात.
  • बॅटरीचे टर्मिनल, वायरिंग आणि कनेक्शन वेळोवेळी स्वच्छ व व्यवस्थित तपासल्याने कार्यक्षमता टिकून राहते.
  • फ्लॅट प्लेट किंवा ट्यूबलर बॅटरीमध्ये फक्त डिस्टिल्ड पाण्याची पातळी नियमित तपासावी आणि गरज असल्यास तेच पाणी वापरावे.
राज्यभरात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाळा सुरु झाल्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली असली तरी पावसाळ्यादरम्यान विजेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. वारंवार वीज गेल्यामुळे नागरिक प्रचंड हैराण होतात. अशा परिस्थितीत इन्वर्टर, बॅटरी अतिशय महत्त्वाची ठरते.

नव्या सॅमसंग Galaxy Z सीरीजने बनवला रेकॉर्ड! 72 तासांत 2.71 लाखांहून अधिक प्री-ऑर्डर… जाणून घ्या सविस्तर

जर पावसाळ्यात इन्वर्टर, बॅटरी यांसारख्या वस्तूंची योग्य काळजी घेतली नाही, तर त्यांचा परफॉर्मंस खराब होऊ शकतो आणि दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागू शकतो. यासोबतच, बॅटरीचे बॅकअप देखील कमी होऊ शकते. पण जर तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि योग्य पद्धतीने इन्वर्टर आणि बॅटरीचा वापर केला तर बॅटरी बॅकअप मजबूत होऊ शकतो. पावसाळ्यात इन्वर्टर आणि बॅटरीची योग्य पद्धतीने काळजी कशी घ्यायची, याबाबत आता जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – AI Created) 

ओलावा आणि पाण्यापासून संरक्षण करा

पावसाळ्यात हवेमध्ये आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे लक्षात ठेवा की, इन्वर्टर आणि बॅटरी नेहमी सुक्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवा. ज्या ठिकाणी पावसाचे पाणी अगदी सहज पोहोचू शकते अशा ठिकाणी या वस्तू ठेऊ नका. अन्यथा त्यांच्या परफॉर्मंसवर परिणाम होऊ शकतो. जास्त आर्द्रतेमुळे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स डॅमेज होऊ शकतात आणि बॅटरीची फंक्शनॅलिटी देखील खराब होऊ शकते.

वेळोवेळी स्वच्छता करा

जर बॅटरीच्या टर्मिनलवर धूळ किंवा गंज जमा झाला असेल तर यामुळे चार्जिंगवर परिणाम होऊ शकतो. यामुळे वेळोवेळी टर्मिनलची योग्य पद्धतीने स्वच्छता करा आणि वायरिंग देखील वेळोवेळी तपासत राहा. जर एखाद्या ठिकाणी कनेक्शन ढिले झाले असेल किंवा कोणता दोष आढळला तर, ते त्वरित दुरुस्त करून घ्या. यामुळे शॉर्ट सर्किटसारख्या समस्यांचा धोकाही कमी होईल.

7,500mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले… नव्या Honor स्मार्टफोनने केली कमाल, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

बॅटरीचे पाणी तपासा

जर तुमच्या घरात फ्लॅट प्लेट किंवा ट्यूबलर बॅटरी असेल तर त्यामधील डिस्टिल्ड पाण्याची पातळी नियमितपणे तपासा. गरज असल्यास केवळ डिस्टिल्ड वॉटरचा वापर करा. साध्या पाण्याचा वापर केल्यास बॅटरी खराब होण्याची शक्यता असते. मात्र, जर बॅटरी ‘मेंटेनन्स-फ्री’ (देखभालीची गरज नसलेली) असेल, तर तुम्हाला ही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही.

Web Title: How to take care of inverter and battery in monsoon season here are some tips tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

तुम्ही फक्त बोलून iPhone करू शकता ऑपरेट; Siri ची पडणार नाही गरज
2

तुम्ही फक्त बोलून iPhone करू शकता ऑपरेट; Siri ची पडणार नाही गरज

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
3

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
4

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.