7,500mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले... नव्या Honor स्मार्टफोनने केली कमाल, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Honor X6e स्मार्टफोन एका सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB + 128GB याचा समावेश आहे. या स्मार्टफोन व्हेरिअंटची किंमत RM 699 म्हणजेच सुमारे 16,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन मलेशियात मिडनाइट ब्लॅक आणि सनराइज गोल्ड कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Honor)
कंपनीने लाँच केलेला हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित मॅजिकओएस 10 वर चालतो आणि यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1010 निट्स पीक ब्राइटनेससह 6.61-इंच (720×1,604 पिक्सेल) टीएफटी एलसीडी पॅनल देण्यात आला आहे. डिस्प्ले आई कम्फर्ट आणि डायनॅमिक डिमिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करतो. स्क्रीनमध्ये एलुमिनोसिलिकेट ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
नवा स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो G81 अल्ट्रा चिपसेटने सुसज्ज आहे, ज्याला एआरएम माली-जी52 एमसी2 जीपीयू, 4GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. ऑनबोर्ड रॅम वर्चुअल रॅम फीचरच्या मदतीने 8GB पर्यंत वाढवले जाऊ शकते.
Honor X6e मध्ये f/1.8 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यासोबत एक ऑक्सिलरी सेंसर उपलब्ध आहे. रिअर कॅमेरा 10x डिजिटल झूमपर्यंत सपोर्ट करतो, स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी f/2.2 अपर्चरसह 5-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. हे 2D फेस रिकग्निशन ऑफर करतो. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP64 रेटिंग दिली आहे.
Honor स्मार्टफोनमध्ये वायफाय 802.11 a/b/g/n/ac, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, एजीपीएस, गॅलीलियो, ग्लोनॅस, बेइडौ, ओटीजी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट समाविष्ट आहे. ऑनबोर्ड सेंसर्समध्ये एम्बिएंट लाइट सेंसर, ग्रेविटी सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि फिंगरप्रिंट सेंसर समाविष्ट आहे.
स्मार्टफोनमध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,500mAh बॅटरी दिली आहे. एकदा चार्ज केल्यावर ही बॅटरी 29.6 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक वेळ देते, असा दावा केला जातो. याचे आकारमान 163.9 × 75.9 × 8.29mm असून, त्याचे वजन अंदाजे 207 ग्रॅम आहे.






